Video of Mattha Recipe : मठ्ठा (Mattha) हे महाराष्ट्रीयन आहारातील एक लोकप्रिय आणि थंड पेय आहे. सहसा घरगुती कार्यक्रमात पंगतीमध्ये मठ्ठा सर्व्ह केला जातो. सध्या तापमान खूप वाढलंय. कडकडत्या उन्हात थंड पेय प्यावसं वाटतं. अशात तुम्ही थंडगार मठ्ठा घरीच बनवू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की थंडगार मठ्ठा कसा बनवावा, टेन्शन घेऊ नका. सध्या युट्युबवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मठ्ठाची अगदी सोपी रेसिपी सांगितली आहे. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही मठ्ठा बनवू शकता.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण मठ्ठा कसा बनवायचा याविषयी सांगतो. तो म्हणतो, “उकाडा वाढलाय, मग लग्नाच्या पंगतीतला थंडगार मठ्ठा तुम्ही ट्राय करा, ज्याची चव आहे अप्रतिम आहे”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणाने सांगितलेली रेसिपी खालीलप्रमाणे –

साहित्य

  • भाजलेले जिरे
  • लसणाचे तुकडे
  • मिरची
  • पुदिना
  • मीठ
  • दही
  • काळे मीठ
  • साखर
  • कोथिंबीर
हेही वाचा

कृती

  • हलके भाजलेले जिरे घ्या. हे जिरे वाटून त्याची पूड तयार करा.
  • त्यानंतर लसणाचे तुकडे, मिरची, पुदिना आणि मीठ घाला आणि चांगलं ठेचून घ्या आणि ठेचा तयार करा.
  • त्यानंतर मस्त मातीचा माठ घ्या. त्यामध्ये दही टाका. त्यानंतर रवीने नीट मिसळून घ्या.
  • दही मिसळल्यानंतर त्यात ठेचा घाला. चवीनुसार काळे मीठ, साखर आणि चवीपुरतं मीठ घ्या. आणि पुन्हा एकदा चांगलं घुसळून घ्या. त्यानंतर त्यात भरपूर पाणी घाला आणि रवीच्या साहाय्याने नीट घुसळून घ्या.
  • शेवटी कोथिंबीर घाला आणि त्यावर झाकण ठेवून मुरत ठेवा. मठ्ठा थंड झाला की पंगतीमध्ये वाढा.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

YouTube wala Sam या यु्ट्युब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कधी असा लग्नाच्या पंगतीतला थंडगार मठ्ठा प्यायला आहे का? अशा पध्दतीने बनवाल तर पितच रहाल”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूपच छान…. प्रत्येक व्हिडिओ मध्ये सादरीकरण खूप सुंदर असत….. रेसिपी सुद्धा छान असतात…” तर एका युजरने लिहिलेय, “फार छान पाककृती प्रस्तुत केली आपलं मनपूर्वक आभार” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.