Dhudhi Bhopla Dhirde : दुधीची भाजी सगळ्यांनाच आवडते, असं नाही. काही जण भाजी पाहिल्यानंतरच खाण्यास नकार देतात. पण, जर दुधीचा हलवा बनवला, तर मात्र ते अगदी आवडीने खातात. पण, ही भाजी एकंदरीतच आरोग्यदृष्ट्या भरपूर फायदेशीर असते. तर यासाठी तुम्ही दुधी भोपळ्याचे धिरडे बनवू शकता. तर कसे बनवले जातात हे धिरडे चला जणूं घेऊयात…

साहित्य

  • १ कप रवा
  • १/२ कप दही
  • १/२ कप पाणी
  • १/२ कप किसलेला दुधी
  • १/२ कप किसलेला गाजर
  • १ कांदा चिरलेला
  • २ चमचा चिरलेली कोथिंबीर
  • १/२ आले आणि २ हिरव्या मिरच्या
  • १/२ चमचा हळद
  • चवीनुसार मीठ
  • १/२ इनो फ्रूट सॉल्ट

व्हिडीओ नक्की बघा…

तडक्यासाठी

  • २-३ चमचा तेल
  • १ चमचा मोहरी
  • १ चमचा तीळ
  • कढीपत्ता

कृती

  • दुधी स्वच्छ धुवून घ्या, त्याची साल काढा आणि मग किसून घ्या.
  • त्यानंतर एका भांड्यात रवा,दही,पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या आणि काही वेळ तसंच ठेवून द्या.
  • नंतर त्यात किसलेला दुधी, गाजर, कांदा, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या, हळद, मीठ, इनो फ्रूट सॉल्ट त्यात घाला.
  • नंतर कढईत तेल, मोहरी, तीळ, कढीपत्ता टाकून फोडणी घाला आणि मिश्रण कढईत व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे टाका.
  • अशाप्रकारे तुमचे दुधी भोपळ्याचे धिरडे तयार.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @purna_recipes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.