How To Make Healthy Dry Fruits Laddu : जेवणानंतर काही गोड खावंसं वाटलं, कधी संध्याकाळी भूक लागल्यावर किंवा प्रवासादरम्यान आपण नेहमीच काही तरी पौष्टीक डब्यातून घेऊन जाण्याचा विचार करतो. कोणाला बेसनाचे, तर कोणाला रव्याचे, तर कोणाला शेंगदाण्याचे लाडू खायला प्रचंड आवडतात. तर आज सोशल मीडियावर एका युजरने एका पौष्टीक लाडूची रेसिपी दाखवली आहे; जी शाळेच्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला देऊ शकतात. नक्की काय आहे या लाडूची रेसिपी चला पाहुयात…
साहित्य
- बदाम
- काजू
- बदाम
- पिस्ता
- खजूर
- मखाणा
- सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया
व्हिडीओ नक्की बघा…
कृती
- मखाणा, बदाम, काजू, बदाम, पिस्ता, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बियाएका प्लेटमध्ये घ्या.
- प्रत्येक ड्रायफ्रूट एकेक करून मंद आचेवर थोड्या वेळासाठी भाजून घ्या.
- कढईत थोडं तूप घालून त्यावर खजूर परतवून घ्या.
- भाजलेले सगळे ड्रायफ्रूट थंड करून मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- नंतर खजूर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि मिश्रण एकजीव करून घ्या.
- त्यानंतर मग लाडू वळण्यास सुरुवात करा.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @duskycurlygirl या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच युजरने कॅप्शनमध्ये लाडूमध्ये वापरलेल्या प्रत्येक पदार्थाचे फायदे सुद्धा लिहिले आहेत.
- बदाम – कॅल्शियम व हेल्दी फॅट्समुळे हाडे व दात मजबूत होतात.
- काजू – पटकन ऊर्जा देतो, वाढणाऱ्या बाळांसाठी उपयुक्त.
- मखाणा – पचायला सोपा, कॅल्शियम आणि प्रोटीनचा चांगला स्रोत.
- पिस्ता – रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, त्वचा व केसांसाठी उपयुक्त.
- अक्रोड – ओमेगा-३ फॅटी ॲसिडमुळे मेंदूचा विकास वेगाने होतो.
- सूर्यफूल बिया – आयर्न व व्हिटॅमिन ई भरपूर, रक्तनिर्मितीस मदत करतात.
- भोपळ्याच्या बिया – झिंक व मॅग्नेशियममुळे झोप आणि पचन सुधारते.