How To Cook Drumstick Pods : शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले ही अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी समृद्ध आहेत. शेवग्याच्या पानांमध्ये बी ६, फॉलेट, थायमिन असून त्यात अ, क आणि के जीवनसत्त्वे आहेत. शिवाय कॅल्शियम, लोह, कॉपर आणि मँगेनीज आहे. शेवग्याच्या शेंगा घालून केलेले पिठले, आमटी, सांबार, भाजी फारच चविष्ट लागते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये शेवग्याच्या शेंगाची सूप कसे बनवायचे ते दाखवण्यात आले आहे.

साहित्य

  • १ चमचा तेल
  • १ चमचा चिरलेला लसूण
  • १/२ चमचा चिरलेले आले
  • १ चिरलेली हिरवी मिरची
  • १/२ चमचा हळद पावडर
  • ११/२ कप शेवग्याच्या शेंगांची पेस्ट
  • कोथिंबीर
  • मिरपूड
  • मीठ

कृती

  • १ कप शेवग्याच्या शेंगांना प्रेशर कुकरमध्ये २ ते ३ शिट्ट्या द्या .
  • शिट्ट्या दिल्यावर प्रेशर कुकरमधील उरलेले थोडे पाणी घेऊन या मिश्रणाची मिक्सरमध्ये पेस्ट बनवा
  • तयार पेस्ट नंतर एका भांड्यात गाळून घ्या.
  • नंतर भांड्यात एक चमचा तेल घ्या; त्यात लसूण, चिरलेलं आलं, चिरलेली हिरवी मिरची, हळद, शेवग्याच्या शेंगांची पेस्ट घाला.
  • सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यात पाणी घाला.
  • नंतर चवीनुसार मीठ, एक चमचा मीरपूड आणि चिरलेली कोथिंबीर त्यात घाला.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bhaiyajiletscook या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. शेवग्याची शेंग आमटीत दिसली की, अनेकांना रहावत नाही, अगदी तोंडाला पाणी सुटते आणि कधी खातो असे होऊन जाते. तर आज आपण चटपटीत, शेवग्याच्या शेंगाचे सूप कसे बनवायचे हे पहिले; तर तुम्हीसुद्धा घरी बनवून पाहा…