महाराष्ट्रात अनेक खाद्यपदार्थ असे आहेत जे प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. शेवभाजी महाराष्ट्रात तुम्हाला अनेक ठिकाणी खायला मिळेल पण प्रत्ये ठिकाणी तुम्हाला त्याची वेगळी चव चाखता येईल. या लेखात नाशिकची सुप्रसिद्ध दूध शेवभाजीची रेसिपी सांगितली आहे. शेवभाजी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. शेवभाजी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा असेल ही रेसिपी ट्राय करून पाहा.
साहित्य
तेल – दोन मोठे चमचे
जिरे – पाव चमा
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या – २
आल लसून पेस्ट – २ चमचे
चिरलेला कांदा – एक मोठी वाटी
टोमॅटो – एक वाटी
लाल तिखट – २ चमचे
हळद – अर्धा चमचा
गरम मसाला – एक चमचा
धणे पावडर – १ चमचा
जिरे पावडर – अर्धा चमचा
मीठ – चवीनुसार
हिंग- २ चमचे
मलई- २ चमचे
दूध – २०० मिली
शेव – २०० ग्रॅम
कृती
कढई गॅसवर ठेवून त्यात तेल गरम करून घ्या
जिरे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आल लसून पेस्ट, चिरलेला कांदा, टोमेटो टाकून चांगले परतून घ्या
त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरे पावडर, मीठ आणि हिंग टाकून मसाले परतून घ्या
त्यानंतर त्यात मलाई टाकून परतून घ्या.
थोड्या वेळातने त्यात दूध टाका आणि चांगली उकळी येऊ द्या.
उकळी आल्यानंतर त्यात शेव टाका.
नाशिकची सुप्रसिद्ध दूध शेवभाजी तयार आहे. गरमा गरम भाजीवर ताव मारा. इंस्टाग्रामवर swadeshiblessings पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.