स्वयंपाकघरातील एखादा गोड पदार्थ बनविण्यासाठी काजू; तर परीक्षेदरम्यान अनेकदा आई आपल्याला बदाम खायला देते. त्यामुळे काजू, बदाम, अक्रोड, मनुका, अंजीर असे वेगवेगळे सुक्या मेव्याचे प्रकार प्रत्येकाच्या घरात हमखास दिसून येतात. या सुक्या मेव्यामध्ये अनेक पोषक घटक असतात; ज्यामुळे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने याचा डाएटमध्येही उपयोग करून पाहतात. तर आज आपण बदाम आणि बटरचा उपयोग एक खास पदार्थ बनवणार आहोत. या पदार्थाचे नाव आहे ‘बदाम कुकीज’.चला तर पाहू बदाम कुकीज या पदार्थाची सोपी रेसिपी.

साहित्य –

१. बटर – ५० ग्रॅम
२. साखर – ३० ग्रॅम
३. व्हॅनिला इसेन्स – १/२ चमचे.
४. कॉर्न फ्लोअर – १० ग्रॅम
५. मैदा
६. दूध
७. केशर
८. बदाम
९. मीठ

हेही वाचा…

व्हिडीओ नक्की बघा…

कृती –

१. एका भांड्यात बटर घ्या.
२. छोट्याश्या बाउलमध्ये दूध आणि चिमूटभर केशर घाला.
३. बटररचा रंग फिकट होईपर्यंत फेटून घ्या.
४. बारीक केलेली साखर व व्हॅनिला इसेन्स त्यामध्ये टाका.
५. नंतर मैदा, कॉर्न फ्लोअर, मीठ, दूध आणि चिमूटभर केशराचे तयार केलेलं मिश्रण घालून व्यवस्थित फेटून घ्या.
६. त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीचा एक कोन तयार करा. त्यात हे मिश्रण घाला.
७. एक ट्रे घ्या त्यात हे मिश्रण आणि त्याचा वर एक बदाम असं करून घ्या.
८. ओव्हनमध्ये १२ ते १५ मिनिटे सोनेरी होईपर्यंत बेक करून घ्या.
९. अशाप्रकारे तुमचे ‘बदाम कुकीज’ तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @madambutterfingers या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजर नेटकऱ्यांच्या इच्छेनुसार विविध पदार्थच बनवत असते व सोशल मीडियावर रेसिपीचा व्हिडीओ शेअर करत असते. फक्त बदाम भिजवून खाण्यापेक्षा किंवा सुक्के बदाम चघळण्यापेक्षा असा झटपट होणारा पदार्थ तुम्ही देखील बनवून पाहा. जो सकाळी व संध्याकाळी चहाबरोबर खाण्यासाठी सुद्धा अगदीच बेस्ट ठरेल. ऑफिसमध्ये दुपारच्या वेळी भूक लागल्यावर खाण्यासाठी तुम्ही हे कुकीज नक्की घेऊन जाऊ शकता.