Vidarbha Special Recipe: विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी. चला तर मग पाहुयात चमचमीत आणि तितकीच चवदार विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी. हिवाळ्यात ही भाजी पौष्टीक मानले जाते.

ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी साहित्य

२०० ग्राम तुरीचे हिरवे दाणे
१ कांदा बारीक चिरून
१ टोमॅटो बारीक चिरून
१/२ टीस्पून आले लसूण पेस्ट
१/२ टीस्पून गरम मसाला
१/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१ टेबलस्पून तेल
मीठ चवीनुसार
कोथिंबीर बारीक चिरून

ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी कृती

तुरीच्या शेंगा तील दाणे काढून स्वच्छ धुवून घ्या.कढ ईत १/२ टिस्पून तेल घालून दाणे ३-४ मिनिटे परतवून घ्या म्हणजे त्याचा कच्चे पणा जाईल.

थंड झाल्यावर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या.एकदाच फिरवून घ्या.

कढईत तेल तापवून त्यात कांदा परतून घ्या. कांदा शिजला की, टोमॅटो, आले लसूण पेस्ट,गरम मसाला, मीठ, तिखट, हळद घालून एकजीव करा. थोडीशी कोथिंबीर घालून तेल सुटेपर्यंत परतावे.

हेही वाचा >> गाजर हलव्याचा चिखल होतो? नेमकं काय चुकतं म्हणून गाजर हलवा नीट होत नाही? करा फक्त ५ गोष्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुरीचे दाणे आणि गरजेनुसार पाणी घालून झाकण ठेवून भाजी नरम शिजवून घ्यावी. तेल वर आले की, भाजी तयार झाली. कोथींबीर घालून गरम गरम सर्व्ह करा.सोबत भाकरी, पोळी, कांदा, लिंबू झक्कास वर्हाडी बेत!!