लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्याची सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे नसबंदी. भारतात अत्यंत संवेदनशील असलेला असा हा विषय. एकीकडे नसबंदी करून घेणाऱ्या पुरुषांकडे ते षंढच (जणू काही शिवीच) झाले असावेत अशा नजरेने पाहण्याची लोकांची मानसिकता असते. त्याच वेळी, स्त्रियांना मात्र दुष्परिणाम माहित असूनही अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी भाग पाडले जाते. जरा विचार करा, तुम्ही रस्त्यावरून चालत आहात आणि पुरुष नसबंदीच्या जाहिरातीवर तुमचे चेहरे झळकत असतील तर मग काय होईल? पायाखालची जमीन सरकेल ना.. हेच घडले आहे जगावर चौधरी, विनय शर्मा आणि अर्जुन सिंह.
श्रेयस तळपदेच्या ‘पोश्टर बॉईज’ या मराठी चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘पोस्टर बॉईज’ची कथा जमघेटी गावात सुरु होते. या गावात सेवानिवृत्त अधिकारी जगावर चौधरी (सनी देओल), शाळा मास्तर विनय शर्मा (बॉबी देओल) आणि क्रेडिट कार्ड कंपनीसाठी वसुली करणारा गुंड अर्जुन सिंह (श्रेयस तळपदे) हे तिघे राहत असतात. नसबंदीशी दूर दूरपर्यंत संबंध नसलेल्या या तिघांचे फोटो पुरुष नसबंदीच्या जाहिरातीच्या पोस्टरवर चुकून छापले जातात. यानंतर एकाच्या वैवाहिक आयुष्यात कलह निर्माण होतो, तर एकाचे ठरलेले लग्न मोडते. अखेर आपले फोटो या जाहिरातीवर कसे आले, याचा शोध लावण्यासाठी हे तिघे बाहेर पडतात. तेव्हा त्यांना प्रशासनाच्या कार्यपद्धतीत असलेले दोष आढळून येतात. या सर्व प्रकारामुळे तिघांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी विनोदी अंदाजात मांडण्यात आल्या आहेत.
वाचा : Daddy movie review मुंबईच्या गल्लीबोळात हरवलेला ‘डॅडी’
विनोदासह सामाजिक संदेश देण्याचा ट्रेण्ड सध्या बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतोय. ‘टॉयलेटः एक प्रेम कथा’, ‘बरेली की बर्फी’, ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटांतून विनोदाला धरून समाजातील महत्त्वाचे विषय मांडण्यात आले. तोच प्रयत्न श्रेयस तळपदे दिग्दर्शित ‘पोस्टर बॉईज’मध्ये करण्यात आलाय. पुरुषांनी नसबंदीकडे कलंक म्हणून पाहू नका, असा संदेश यातून देण्यात आलाय.
वाचा : हार्दिक पांड्यासोबत असलेल्या ‘रिलेशन’वर परिणीती म्हणते..
मुळात मराठीचा रिमेक असलेल्या या चित्रपटाच्या कथेत फारसा काही बदल करण्यात आलेला नाही. चित्रपट पाहताना सनीच्या ढाई किलोच्या हातात अजूनही दम असल्याचे दिसून येते. तीन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या बॉबीचे विनोदी पंच हसायला भाग पाडणारे आहेत. त्याने ‘सोल्जर’ चित्रपटातील गाण्याची ठेवलेली रिंगटोन त्याच्या हिट चित्रपटाची आठवण करून देते. दिग्दर्शनासह अभिनयाची धुरा सांभाळणाऱ्या श्रेयसने विनोदाचा मोर्चा अगदी सहज सांभाळला आहे. कथा चित्रपटाचा पाया असतो. चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत प्रेक्षकांना कसे खळखळून हसवता येईल याची पुरेपूर काळजी लेखक समीर पाटीलने कथा लिहिताना घेतली आहे. कुठेही ओढूनताणून अतिशयोक्ती करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला नाही. त्यामुळे चित्रपट बघताना कंटाळा येत नाही