07 July 2020

News Flash

सेन्सॉर सोसणारा बाजार

कुठल्याही लेखकाला वा कलावंताला सेन्सॉरशिप मान्य होत नाही. त्याविरुद्ध तो बंड करून उठतो. पण एझरा एफ. व्होगेल यांचे तसे नाही. त्यांचे 'डेंग जिओपिंग अँड द

| October 26, 2013 12:20 pm

कुठल्याही लेखकाला वा कलावंताला सेन्सॉरशिप मान्य होत नाही. त्याविरुद्ध तो बंड करून उठतो. पण एझरा एफ. व्होगेल यांचे तसे नाही. त्यांचे ‘डेंग जिओपिंग अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ चायना’ हे चरित्र दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत प्रकाशित झाले. त्याच्या अमेरिकेत आतापर्यंत तीन लाख प्रती तर चीनमध्ये तब्बल साडेसहा लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. पण या पुस्तकाची चीनमध्ये विक्री करण्यासाठी त्यांनी चीन सरकारने सुचवलेले बदल पुस्तकाच्या चीन-आवृत्तीमध्ये केले. त्यानंतरच त्यांचे पुस्तक चीनमध्ये विकायला परवानगी मिळाली.
ही बातमी नुकतीच न्यूयॉर्क टाइम्सने दिली. त्यात लेखक व्होगेल म्हणतात की, ‘असा बदल करणे माझ्यासाठी फारसे कठीण नव्हते. पुस्तकाचा ९० टक्के भाग तोच असून फक्त काही किरकोळ बदल केले आहेत.’
गेल्या काही वर्षांत चीनमधील साक्षर वर्गाचे पाश्चात्त्य लेखकांबाबतचे आकर्षण दिवसेंदिवस वाढते आहे. अमेरिकन प्रकाशनजगतासाठी ती मोठी बाजारपेठ आहे.  त्यामुळे प्रकाशक अशा तडजोडीला लेखकांना तयार करत आहेत. त्यामुळे ही चिनी सेन्सॉरशिप अमेरिकन प्रकाशकांकडून मान्यताप्राप्त होत आहे. पण हा जुगार अंगलटही येऊ शकतो, याचे भान ठेवलेले बरे.

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
द प्रॉडिगल सन : कॉलिन मॅकलफ, पाने : ४००२९९ रुपये.
श्ॉडो क्रीक : जॉय फिल्डिंग, पाने : ३८४३२५ रुपये.
द माऊंटन ऑफ लाइट : इंदू सुंदरसन, पाने : ३५२२९९ रुपये.
हिरोज ऑफ ऑलिम्पस- द हाऊस ऑफ हेडस : रिक रिओर्दान, पाने : ५६५४९९ रुपये.
सीता-अ‍ॅन इलस्ट्रेटेड रिटेलिंग ऑफ द रामायणा : देवदत्त पटनाईक, पाने : ३२८४९९ रुपये.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
आय अ‍ॅम मलाला : मलाला युसुफझाई, पाने : २८८३९९ रुपये.
गांधी बिफोर इंडिया : रामचंद्र गुहा, पाने : ६८८८९९ रुपये.
द लाइफ अँड टाइम्स ऑफ कृष्णा : जे. बी. पॅट्रो, पाने : ४७८/४९५ रुपये.
द इनिग्मा दॅट इज पाकिस्तान : शिवेंद्र कुमार सिंग, पाने : १५२१४० रुपये.
द फर्म-द स्टोरी ऑफ मॅकन्झी : डफ मॅकडोनाल्ड, पाने : ४००५९९ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2013 12:20 pm

Web Title: censored book geng jinping and the transformation of china
Next Stories
1 आठवा मान बुकरचा
2 अ‍ॅलिस आजीच्या गोष्टी
3 हारुकी मुराकामींना नोबेल?
Just Now!
X