भारतात आर्थिक सुधारणा होऊन २२ वर्षे उलटून गेली. या काळात भारतीय मध्यमवर्गाची मोठय़ा झपाटय़ाने वाढ झाली. त्याचबरोबर साहित्यिक-उपयुक्त पुस्तकांचा खपही जोरदार म्हणावा अशा प्रकारे वाढला आहे. आपल्या कायम पुढे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनमध्ये आर्थिक सुधारणा होऊन तीस वर्षे उलटून गेली आहेत. पण या काळात चिनी लोकांचं वाचन दिवसेंदिवस खालावतच चाललं आहे.
एकीकडे चीन सरकार माध्यमिक आणि उच्च शिक्षणावर भर देत आहे, तर दुसरीकडे साहित्याची मोठी परंपरा चीनमध्ये आहे. पण आजच्या चिनी मध्यमवर्गाला पुस्तकांबाबत, वाचनाबाबत फारसं देणंघेणं उरलेलं नाही. भौतिक सोयीसुविधांच्या मागे तो मोठय़ा प्रमाणावर जात आहे.
त्याविषयीचा एक सव्‍‌र्हे नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यानुसार एक चिनी माणूस दिवसभरात फक्त पंधरा मिनिटे वाचनासाठी देतो, तर सर्वाधिक वेळ टीव्ही पाहण्यात घालवतो. त्यानंतर इंटरनेट पाहण्यात.
वाचन ही अतिशय गैरवाजवी गोष्ट चीनमध्ये मानली जाऊ लागली आहे. गेल्या वर्षी एका चिनी माणसाने फक्त चार पुस्तके वाचली तर त्याच वर्षांत अमेरिकन माणसाने सात, फ्रेंच-जपानी आठ तर कोरियन माणसाने ११ पुस्तके वाचली. निदान वाचनाच्या बाबतीत तरी भारत चीनच्या पुढे असेल का?

फ्रंटशेल्फ
टॉप  ५ फिक्शन
द ककूज कॉलिंग : रॉबर्ट गालब्रेथ, पाने : ४९४५९९ रुपये.
द लोलँड : झुम्पा लाहिरी, पाने : ३५२४९९ रुपये.
अ कूल डार्क प्लेस : सुप्रिया द्रविड, पाने : २५६४५० रुपये.
वाइज इनफ टू बी फुलिश : गौरी जयराम, पाने : २१६८५० रुपये.
होल्ड माय हँड : दुजरेय दत्ता, पाने : २१६१४० रुपये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
जस्ट इन टाइम : संपा. जुग सुरैया, नीलाभ बॅनर्जी, अजित निनान, पाने : २१२६९९ रुपये.
द रेस ऑफ माय लाइफ : मिल्खा सिंग, पाने : २४०२५० रुपये.
द न्यू बिहार-गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट : निकोलस स्टेर्न, एन. के. सिंग, पाने : ३६०७९९ रुपये.
हिच्ड- द मॉडर्न वूमन अँड अरेंज्ड मॅरेज : नंदिनी कृष्णन, पाने : २७२२९९ रुपये.
लेडी, यू आर नॉट अ मॅन-द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ अ वूमन अ‍ॅट वर्क : अपूर्वा पुरोहित, पाने : १९२१९५ रुपये.