फिक्शन
१) नो मॅन्स लँड : नीलेश श्रीवास्तव, पाने : ३५२२५० रुपये.
सध्या भारतातली मेट्रो सिटीज म्हटली जाणारी शहरं ज्या गतीनं आणि रीतीनं विस्तारत आहेत, त्यामुळे तेथील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. ही कादंबरी दिल्लीजवळच्या आणि तिचाच भाग होऊ घातलेल्या गुरगावमधल्या रिअल इस्टेटची चित्तचक्षुचमत्कारिक कहाणी सांगते. त्यातून भारतीय रिअल इस्टेटची दुनिया साक्षात व्हायला मदत होते.
२) जीव्हज् अँड वेडिंग बेल्स : सॅबॅस्टिअन फॉल्क्स, पाने : २५२५९९ रुपये.
प्रसिद्ध ब्रिटिश विनोदी लेखक पी. जी. वुडहाऊस यांची जीव्हज् आणि वूस्टर ही पात्रं घेऊन वेगळ्या पद्धतीने लिहिलेली ही कादंबरी लेखनाचा एक वेगळा नमुना आहे. तो वुडहाऊसच्या चाहत्यांना अधिक आवडेल. इतरांना मात्र मूळ पात्रं जाणून घेतल्याशिवाय तिची खुमारी फारशी कळणार नाही.
३) डेलिरिअम : सौम्या अजी,  पाने : २४४२९९ रुपये.
लग्न झालेल्या स्त्री-पुरुषांना इतर स्त्री-पुरुषांविषयी वाटणारं आकर्षण हा अलीकडच्या काळात चलनी नाण्यासारखा भारतीय इंग्रजी लेखकांच्या आवडता विषय झाला आहे. बंगळूरुच्या पत्रकार लेखिकेची ही कादंबरी विवाहित महिला पत्रकार व विवाहित क्रिकेटपटू यांच्याविषयी आहे.
नॉन-फिक्शन
१) सेव्हिंग कॅपिटॅलिझम फ्रॉम द कॅपिटॅलिस्टस: रघुराम राजन, लुइजी झिंगल्स, पाने : ४०८४९९ रुपये.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन (आणि सहलेखक) यांचं हे मूळ २००४ सालचं पुस्तक. पण त्याचं आजच्या परिस्थितीला अनुसरून पुनर्लेखन करून ते नव्या स्वरूपात प्रकाशित केलं आहे. गेली दोन दशकं अभ्यासक आणि राजकारणी भांडवलशाहीच्या भवितव्याविषयी चर्चा करत आहेत. वित्तीय बाजारातून निर्माण होणारी संपत्ती आणि संधी यांची उत्तम मांडणी हे पुस्तक करतं.
२) सचिन-बॉर्न टु बॅट : खालिद अन्सारी, पाने : ३६९४९९ रुपये.
हल्लीच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या निवृत्तीची बरीच चर्चा झाली. त्यानंतर प्रकाशित झालेलं हे पुस्तक सचिनच्या समग्र कारकिर्दीचा आढावा घेतं. क्रीडा पत्रकारानं लिहिलेलं, क्रीडा संपादकानं संपादित केलेलं आणि खुद्द सचिनने गौरवलेलं, असं हे पुस्तक.
३) द बॅड टच- द ट्रू स्टोरी ऑफ हरिश अय्यर अँड अदर थ्रायव्हर्स ऑफ चाइल्ड सेक्स अब्यूज : पायल शहा कारवा, पाने : २५६/२९९ रुपये.
आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमामुळे माहीत झालेल्या हरिश अय्यर या सामाजिक कार्यकर्त्यांविषयीचं हे पुस्तक बाललैंगिक शोषणाची भयावहता मांडतं.