
‘पुंडलीक’नामक गावपाटलाने वसवलेले नगर म्हणजे पंढरपूर, या तुकोबारायांच्या प्रतिपादनाचा अर्थ उमगण्यास आता अडचण पडू नये.





कीर्तनभक्तीचे जे प्रयोजन लोकमान्य स्पष्ट करतात त्यांद्वारे केळकरांच्या निरीक्षणाला थेट छेद बसतो.






मुळात भगवान श्रीकृष्णांचे अवघे जीवनचरित्र म्हणजेच प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा सुयोग्य, समधात संयोग होय, हेच ते उत्तर.

मी तुजमाजी देवा। घेसी माझ्या अंगें सेवा’ हे तुकोबांचे उद्गार साक्ष पुरवितात अद्वयबोधाच्या त्याच अनुभूतीची.