हैदराबाद मुक्ती संग्रामात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्या फारशा ज्ञात नसलेल्या मात्र महत्त्वपूर्ण कार्यावर प्रकाश टाकणारे, विचारांची चिकित्सा स्वत:पासून व्हावी हे तत्त्व सांभाळणारे स्वातंत्र्यसैनिक भगवानराव देशपांडे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. जात, धर्म, वर्गसंघर्षाच्या लढ्यात विकास प्रक्रियेला गती कशी द्यावी, याविषयी परखडपणे व्यक्त होणारे भगवानराव देशपांडे यांनी लातूर जिल्ह्यात वकिली केली. विचारांनी कम्युनिस्ट, त्यामुळे दलित, शोषित वर्गाचे अनेक न्यायालयीन लढे त्यांनी मोफत लढले. हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात आणि मराठवाड्याच्या विकासप्रश्नी गोविंदभाई श्रॉफ यांचे ते महत्त्वाचे सहकारी होते.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: मेजर जनरल राजेंदर नाथ (निवृत्त)

Tanaji Sawant News
तानाजी सावंतांचा अजित पवारांसमोरच मोठा इशारा; म्हणाले, “…तर आम्ही सहन करणार नाही”
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
kalyan lok sabha marathi news, vaishali darekar latest news in marathi
वैशाली दरेकर : उत्तम वक्त्या आणि आक्रमक चेहरा, कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून महिला उमेदवार रिंगणात
bhavana gawali
“भावना गवळी यांना उमेदवारी न दिल्यास सामूहिक राजीनामे देणार,” शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

मार्क्सवादावर त्यांची अढळ निष्ठा होती. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील गुंजोटी या मूळ गावी शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी हैदराबादला गेल्यानंतर भगवानराव देशपांडे यांचा डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क आला. हैदराबादला महाविद्यालयात असताना डॉ. बाबासाहेबांचे व्याख्यान त्यांनी घडवून आणले होते. जागतिकीकरण आणि त्याचे न्यायव्यवस्थेवर झालेले परिणाम असा त्यांच्या चिंतनाचा भाग होता. त्यावर त्यांनी काही लेखही लिहिले. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने त्यांच्या लिखाणात इंग्रजी भाषेतील अनेक संदर्भ ते देत. मूळ पिंडच अभ्यासकाचा होता. पण तो पोथीनिष्ठ नव्हता. त्यामुळे मराठवाड्यातील शिक्षणाच्या प्रश्नावर तसेच अन्य प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्यायासाठी कशा आणि कोणत्या भूमिका घ्याव्यात, यासाठी ते आग्रही होते.

हेही वाचा >>> चिप-चरित्र:‘इंटिग्रेटेड सर्किट’चा जन्म!

विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण हे दोघे मुख्यमंत्री असताना त्यांना भेटून भगवानरावांनी अनेक वेळा चर्चा केली. मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. लातूर येथे दुसरे विचारवेध संमेलन घडवून आणताना त्यासाठी निधी उभारताना कोणत्याही बड्या व्यक्तीकडून तो नको अशी त्यांची भूमिका होती. या संमेलनासाठी प्रत्येक कामगाराकडून ११ रुपयांची वर्गणी त्यांनी सहकाऱ्यामार्फत गोळा केली. मूल्यांचा ऱ्हास होण्याच्या काळात ती टिकवून ठेवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार महत्त्वाचा, असे ते मानत. घटनेपेक्षा कोणताही पक्ष, व्यक्ती मोठी नाही, असे प्रतिपादन मांडत भगवानराव देशपांडे यांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यातून आदर्श निर्माण केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठवाड्याचे योगदान, निजामशाहीविरुद्ध कम्युनिस्टांचा लढा, समाजक्रांतीचे चिंतन या विषयावर भरभरून बोलणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती.