मुंबई शहराचा स्वत:चा साहित्य महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टाटा लिटरेचर लाइव्ह २०२३’ या महोत्सवातील पुरस्कार नुकतेच घोषित झाले. सर्वोत्कृष्ट पुस्तक, प्रकाशक, काव्य अशा विविध पुरस्कारांचा समावेश यात होता. ‘द सिक्रेट ऑफ मोअर’ हे तेजस्विनी आपटे- रहम यांचे पुस्तक ‘फिक्शन’ प्रकारातील सर्वोत्कृष्ट पुस्तक ठरले. ‘नॉन फिक्शन’ प्रकारातील ‘बुक ऑफ द इअर’चा पुरस्कार सारा राई यांच्या ‘रॉ अंबर’ या पुस्तकाला देण्यात आला.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : सलीमुल हक

‘वर्किंग टू रिस्टोअर’ या एशा छाब्रा यांच्या पुस्तकाला ‘बिझनेस बुक ऑफ द इअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘पॅन मॅकमिलन इंडिया’ या प्रकाशन संस्थेला सर्वोत्कृष्ट प्रकाशक या वर्गातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘रोटरी रायटिंग फॉर पीस अवॉर्ड’ने संजॉय हजारिका यांना गौरविण्यात आले. याच महोत्सवात लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ सी. एस. लक्ष्मी यांना ‘टाटा लिटरेचर लाइव्ह जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘पोएट लॉरिएट’ पुरस्कार मामांग दाई या अरुणाचल प्रदेशातील कवयित्रीला जाहीर झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.