राजेश बोबडे

‘ग्रामगीते’तून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खेडय़ांची समस्या मांडून तिची उकल करण्याचा मार्ग दाखवला. भूदान चळवळीआधी, १९४६ पासून पूर्व विदर्भातील आदर्श आमगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ‘भूमि विश्वस्त योजना’ सुरू होती. ‘भूदान’ १९५१ मध्ये सुरू झाली. तेव्हा आचार्य विनोबा भावे यांनी महाराजांची भेट घेऊन भूदान योजनेविषयीची व्यापक संकल्पना महाराजांना सांगून, ‘आपल्या भजनांचा जनमानसांवर प्रभाव असल्याने आपण आपले एक वर्ष द्यावे आणि एक हजार एकर जमीन भूदान चळवळीला मिळवून द्यावी,’ अशी विनंती केली. ग्रामसमृद्धीसाठी जमीनधारणेची समस्या व्यापकपणे हाताळणे महाराजांना आवश्यक वाटले. विनोबांच्या भूदान योजनेची व्यापकता कळल्यावर महाराजांनी उदात्त भावनेने श्रीगुरुदेव सेवा मंडळाची ‘भूमि विश्वस्त योजना’ भूदान चळवळीत विलीन केली. महाराजांनी आपला पूर्ण पाठिंबा व सहकार्य भूदान चळवळीला दिले. २३ एप्रिल १९५३ रोजी यवतमाळातील श्रीमंत आबासाहेब पारवेकर यांच्याकडून २१०० एकर जमिनीचे दान स्वीकारून, ११ दिवसांत ११४१० एकर जमीन महाराजांनी विनोबांना मिळवून दिली.

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

हेही वाचा >>> लालकिल्ला :  गेहलोत, वसुंधराराजे, की आणखी कोणी?

यवतमाळ येथे जमीनदारांना उद्देशून महाराज म्हणतात : कोणताही सांप्रदायिकांसारखा मताग्रह न धरता अथवा कोणाच्या व्यक्तित्वाला बळी न पडता, लोकहिताचे ध्येय दृष्टीपुढे ठेवून कोणाच्याही योग्य अशा योजनेला सर्व शक्तीयुक्तीनिशी उचलून धरणे हे सेवा मंडळाचे व सर्वांचे कर्तव्य आहे; आणि भूमिदान यज्ञाची योजना ही अशीच महत्त्वाचे ध्येय साध्य करून देणारी असल्याने तिचा पुरस्कार मी करीत आहे. परंतु त्या वेळी माझी अशी खात्री झाली नव्हती की या मार्गाने जनतेच्या जीवनाचा मौलिक प्रश्न सुटू शकेल. उलट अशी शंका वाटत होती की, भांडवलदारांना आराम देण्याचीच ही योजना ठरणे शक्य आहे. वितरण कसे केले जाणार हा प्रश्न समाधानकारक रीतीने सुटलेला नव्हता आणि असे वाटत होते की, कुटुंबाला पाच एकर जमीन  मिळाली तरी तेवढय़ाने जीवनमान उंच कसे होणार? कारण २५ एकर जमीन घरी असणारेसुद्धा शहरात जातात व नोकरी पाहतात. मात्र भूदानात जमीन कसणारांनाच दिली जाईल. त्यामुळे जमिनीचा कस व जीवनमानाची उंचीही वाढेल. जमिनीचा प्रश्न अशा रीतीने ताबडतोब सोडविला नाही तर भारताचे जीवन असह्य होणार आहे. कारण भांडवलदार जमीन कसणार नाहीत आणि निराश झालेले व आळसावलेले मजूरही शेतीचा कस कायम राखणार नाहीत. पर्यायाने ही राष्ट्राचीच फार मोठी हानी आहे. हृदयपरिवर्तनाद्वारे भांडवलदार/जमीनदारांकडून भूमिदान यज्ञ यशस्वी करून घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. पाच किंवा पन्नास कोटी एकर जमीन मिळविणे खरे महत्त्व नाही; तर तसे संस्कार निर्माण करणे, हृदयपरिवर्तन करणे, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. धनिकांच्या व भांडवलशाहीच्याच हातून भांडवलशाही नाहीशी करून समाजाला सुखी करण्याचा उद्देश आहे.

महाराजांनी भूदानावर शेकडो भजने रचली. त्यापैकी एक :

तुकडय़ाची हाक ऐकुनी, येऊ द्या मनी।

भाव बंधूंनो। भूमिदान द्या भूपतींनो।।

rajesh772@gmail.com