बॉलीवूडचा प्रेक्षक आता सजग झाला आहे. करमणुकीच्या नावाखाली कलाकारांचा आचरटपणा प्रेक्षकांना नको आहे. त्यामुळेच तांत्रिकदृष्टय़ा परिपूर्ण चित्रपटसुद्धा चालत नाहीत. प्रेक्षकांना आता समतोल कथाबीज लागते. कलाकारांची अभिनयक्षमता व चित्रपटनिर्मितीचे तंत्रज्ञानही पारखले जाते. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की बॉलीवूडमधील अर्थकारण कशाच्या जोरावर चालते? चित्रपटांमध्ये गुंतवणूक करणारे कुठल्या निकषाचा विचार करतात? चित्रपट कलाकार त्यांच्या कामासाठी वारेमाप पैसे कशाच्या आधारे मागतात व ते त्यांना मिळतातसुद्धा?

योगेश सावंत, मुंबई

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीची प्रतीक्षा!

‘बिछडे सभी..’ हा अग्रलेख (५ सप्टेंबर) वाचला. बॉलीवूडमध्ये चांगले कथानक, उत्तम संगीत आणि दिग्दर्शनाचे कौशल्य लोप पावत आहे. एखाद-दुसरा चित्रपट उत्कृष्ट पद्धतीने सादर केला जातो आणि पुढे तोच चित्रपट गर्दी खेचतो. परंतु अशा चित्रपटांची संख्या आता तुरळक झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक स्टार अभिनेत्यांचेदेखील चित्रपट सपशेल अपयशी ठरताना दिसतात. तुलनेने दाक्षिणात्य चित्रपट अधिक प्रयोगाच्या भानगडीत न पडता प्रेक्षकांना काय हवे हे ओळखूनच कथेचे सादरीकरण करतात आणि तेच भाव खाऊन जातात. करोनाकाळात प्रेक्षकांना ‘ओटीटी’ची सवय लागली. त्यामुळे चित्रपटगृहांतील गर्दी कमी झाली असेल, मात्र चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणाराही प्रेक्षकवर्ग मोठा आहे. या वर्गाला प्रतीक्षा आहे, एका चांगल्या चित्रपटाची!

श्रीकांत शंकरराव इंगळे, पुणे

भाबडे प्रेक्षक ते चोखंदळ ग्राहक!

‘बिछडे सभी..’ हा अग्रलेख (५ सप्टेंबर) वाचला. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच देशातील वातावरणाचा प्रभाव चित्रपटांच्या कथानकावर दिसत होता. नव्वदीच्या दशकात जागतिकीकरण, शहरीकरण होत गेले, संधी वाढल्या आणि स्पर्धाही वाढली. प्रेक्षकांचा भाबडेपणा जागतिकीकरणाच्या रेटय़ात खूप कमी झाला. त्यांचे विचारक्षितिजही विस्तारले. हे बदल आणि त्यांची गती ज्या चित्रपटांनी टिपली ते यशस्वी झाले. प्रादेशिक चित्रपटांनी यात बाजी मारली हे खरे असले तरी बॉलीवूडमध्येही कलात्मकता, कालसुसंगत आशय आणि व्यावसायिक गणिते यांचा उत्तम मेळ दिसला. इंग्लिश विंग्लिश, वेक अप सिड, लक बाय चान्स, लव आजकल, ये जवानी हैं दिवानी, पिकू, दिल चाहता हैं, थ्री इडिअट्स अशी अनेक नावे घेता येतील. विशिष्ट कलाकारांवर जीव ओवाळून टाकणारे आणि त्यांचे सुमार चित्रपटही डोक्यावर घेणारे भाबडे प्रेक्षक मात्र आता चोखंदळ ग्राहक झाले आहेत. आपल्या नावावर आपण जमाना गाजवू  अशी अपेक्षा आता कुठल्याच क्षेत्रातील कलाकारांनी ठेवू नये. आपल्या ग्राहकांना नक्की काय हवे आहे ह्याचा शोध घेत त्यानुसार स्वत:मध्ये सतत बदल करण्याची कसरत आता अटळ आहे.

विनिता दीक्षित, ठाणे

एकीकडे महाशक्ती’, दुसरीकडे तारखा..

सेटलवाड यांच्या जामिनावरील सुनावणीस विलंब का, असा संतप्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने गुजरात न्यायालयाला केला, तसेच त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे त्वरित सादर करण्याचे आदेश गुजरात सरकारला दिले, हे उत्तमच केले.

आता सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष, ज्यात महाराष्ट्र सरकार घटनेची पायमल्ली करून स्थापन केले गेले आहे, असे म्हटले आहे त्या खटल्याची सुनावणीही तातडीने घ्यायला हवी, असे वाटते. एक महिना झाला, तारखांवर तारखा पडत आहेत, महाराष्ट्र सरकार धोरणात्मक, आर्थिक निर्णय घेत आहे. गुवाहाटीत एकनाथ िशदे म्हणाले होते, ‘आपल्यामागे महाशक्ती आहे, जिने पाकिस्तानवर हल्ला केला, तेव्हा घाबरू नका,’ त्याचा प्रत्यय येतो आहे. खरेतर हा खटला माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा निवृत्त होण्यापूर्वीच निकालात निघायला हवा होता.

माधव ल. बिवलकर, गिरगाव (मुंबई)

एकदाचे राजकीय खटले हातावेगळे करा

अनेक गोरगरिबांचे प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालय सध्या राजकीय नेत्यांची पात्रता- अपात्रता, निवडणूक चिन्ह, मेळाव्याचे ठिकाण यासंदर्भातील निर्णय देण्यातच व्यग्र आहे. त्यामुळे न्यायालयाने राजकीय पक्षांच्या प्रकरणांचे निकाल विनाविलंब द्यावेत.  वाद खरे की खोटे यात आता सामान्यांना काहीही स्वारस्य उरलेले नाही. त्यापेक्षा महानगरपालिका निवडणुका लवकर घ्याव्यात म्हणजे अनेक राजकीय प्रश्न आपोआपच निकाली निघतील.

अमोल करकरे, पनवेल

विरोधी पक्षांनी कामाला लागण्याची गरज आहेच

‘लालकिल्ला’ या सदरातील ‘विरोधक खरोखर कामाला लागले का?’ हा लेख (५ सप्टेंबर) वाचला. आज देशातील विरोधी पक्षांपुढील आव्हाने दुहेरी आहेत. एका बाजूला विरोधी पक्षांचे ऐक्य हा कळीचा मुद्दा आहेच, पण त्याबरोबर भाजपने सुरू केलेल्या पक्षफोडीच्या नवनवीन तंत्रामुळे विरोधी पक्षांपुढे रोज नवीन आव्हाने उभी राहात आहेत. सत्तेच्या या साठमारीत लोकशाहीचे सर्व नियम पायदळी तुडवून व साम-दाम-दंड-भेदाची सर्व अस्त्रे वापरून भाजप विरोधी पक्षांना कमकुवत करत आहे. पण या लढाईत भाजपने सर्वसामान्य जनतेला मात्र गृहीत धरले असावे असे दिसते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत देशात वाढलेली गरिबी, सर्वसामान्यांना भेडसावणारी महागाई, बेरोजगारी, सीमेच्या आत घुसलेला चीन सारखे प्रश्न जणू देशात अस्तित्वातच नाहीत अशा आविर्भावात भाजप वागत आहे.

सतत निवडणुकीच्या तयारीत असलेल्या भाजपच्या दृष्टीने हे प्रश्न गौण आहेत. कारण निवडणुकीसाठी धार्मिक ध्रुवीकरण व राष्ट्रवादाचे भांडवल पुरेसे आहे. देशापुढील प्रश्नांची भाजपला व जनतेलादेखील जाणीव करून देण्याचे कार्य राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतून व्हायला हवे. विरोधी पक्षांची एकजूटदेखील तितकीच महत्त्वाची आहे. हा विरोधी पक्षांच्या अग्निपरीक्षेचा काळ आहे. त्यामुळे व्यापक जनहितासाठी व देशहितासाठी आपसांतील मतभेद विसरून एकत्र येत विरोधकांनी खरोखरच कामाला लागायला हवे. अन्यथा देशापुढे व लोकशाहीपुढे एकपक्षीय राजवटीचा धोका संभवतो.

हेमंत सदानंद पाटील, नालासोपारा