‘‘जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी । कि परिमळ माझी कस्तुरी ।। तैसी भाषा माझी साजिरी । मराठी असे ।।  – श्री संत ज्ञानेश्वर’’ हा गेल्या वर्षीच्या २७ फेब्रुवारीचा संदेश आज पुन्हा का आला? म्हणून चंचलाताई व्हॉट्सअ‍ॅप पाहू लागल्या. तो संदेश होता वसईच्या सॅव्हिया ब्रिटो हिनं पाठवलेला. बोरिवलीच्या पुढले कार्यक्रम लांब पडतात म्हणून हिलाच चंचलाताईंनी कधीकाळी सूत्रसंचालनाचा ‘ब्रेक’ दिला होता. पण मराठी भाषा दिनाच्या दोन दिवस आधीच वसईहून आलेला सॅव्हियाचा संदेश केवळ शुभेच्छांचा ‘फॉरवर्ड’ नव्हता. ‘‘पुष्पा माझी? की तुझं ते माझं? संत ज्ञानेश्वर हे संतश्रेष्ठ आहेत, पण फादर स्टीफन्सचं श्रेय त्यांना का देताहात?’’ – अशी मल्लिनाथी सॅव्हियानं केली होती. शिवाय ‘‘तुम्हीच सांगा मॅडम, हे पटतं का तुम्हाला? मी विनंती करते की, यंदा मराठी दिनाला तुमचा कार्यक्रम जिथे कुठे असेल, तिथे हा क्रिस्तपुराणातल्या मराठीस्तुतीचा मुद्दा जरूर मांडा’’ असा आग्रहसुद्धा सॅव्हियानं धरला होता. चंचलाताईंना आजकाल सूत्रसंचालक म्हणून कार्यक्रम फारसे मिळत नसत, त्यामुळे मुद्दा मांडण्याचा प्रश्नच नव्हता. पण सॅव्हिया त्यांना लख्ख आठवली. मराठी इतकं बोलायची की, ‘बाई नको म्हणू, मॅडमच बरं वाटतं,’ असं सांगावं लागलं होतं तिला. पण चंचलाताईंना त्या ओळी नक्की कुणाच्या, हे काही आठवेना! नाही म्हटलं तरी त्या मराठीच्या जुन्या बीए. स्टीफन्सचे क्रिस्तपुराण २५ मार्काना होतं त्यांना. आणि २५ मार्काला संत ज्ञानेश्वरसुद्धा!  त्याच पावली त्या नातीकडे वळल्या. नात तिच्या रूममध्ये लॅपटॉप उघडूनच काहीतरी पाहात होती. ‘निटी, विल यू डू मी अ फेवर?- जरा प्लीज हे सर्च कर ना.. र्अजट आहे..’’ म्हणत त्यांनी फादर स्टीफन्स, क्रिस्तपुराण, मराठी असे कीवर्ड तिला सांगितले. कुठल्याही पुस्तकाची पीडीएफ हुडकण्यात हुशार असलेल्या नेत्रावती ऊर्फ निटी या नातीनं, ‘ओक्के दादीमां..’ म्हणत तसं केलं आणि काही क्षणांत, ‘‘जैसी पुस्पांमाजि पुस्प मोगरी ।

किं परिमळांमाजि कस्तुरी ।

Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
Government decision not to increase read reckoner for elections
रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?
Thailand House of Representatives approves same sex marriage
समलैंगिक विवाहाला आता थायलंडमध्येही मान्यता… हा प्रवास आव्हानात्मक कसा ठरला?

तैसी भासांमाजि साजिरी  । मराठिया।।’’

या मूळ ओळीच जुन्या टायपात समोर आल्या!

चंचलाताईंना वाटलं, खरंच की सॅव्हियाचं. कुठेतरी मांडला पाहिजे हा मुद्दा. पण कुठे? फेसबुकवर तर नकोच. उगाच ‘तुम्हाला ज्ञानेश्वरांपेक्षा ते फादरच दिसणार’ वगैरे कॉमेंटी यायच्या. मग व्हॉट्सअ‍ॅपवर? – पण तिथे तर सॅव्हियानं आधीच कुणाकुणाला हाच संदेश पाठवला असणार! आपण सॅव्हियासारखं भांडखोर नाही दिसलं पाहिजे, आपण फक्त मराठी भाषा गौरव दिनाचा एक ‘युनिक’ मेसेज पाठवतोय, इतकंच दिसलं पाहिजे, एवढा ‘प्रेझेन्स ऑफ माइन्ड’ अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलेल्या चंचलाताईंकडे नक्कीच होता. कवितांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तर त्या असं काही करत की क्या कहने! मराठी भाषा गौरव दिनाचा युनिक संदेश काय पाठवायचा, याचा विचार दोन दिवस आधीपासून करण्याची आठवण मात्र सॅव्हियामुळेच झाली, या विचारानं त्या सुखावल्या..

.. आणि व्हॉट्सअ‍ॅप उघडून, आदल्या वर्षीच्या संदेशांपैकी एखादा ‘युनिक’ वाटतोय का, हे स्वत: शोधून पाहू लागल्या.