अनेकदा शासन व विद्यापीठामार्फत अधिसूचना काढली जाऊनही अनेक महाविद्यालये नॅकची प्रक्रिया गांभीर्याने घेत नाहीत.

अनेक महाविद्यालयें कोणत्याच पायाभूत सुविधा नसतांना उघडली गेली. अनेक आमदार आणि मंत्र्यांनी आपल्या साम्राज्याचा भाग म्हणून ती मिळवली. राजकीय नेते आज किती शैक्षणिक संस्था आहेत व किती साखरकारखाने आहेत यावरून ओळखले जातात. विद्यापीठाचा मास्टर प्लॅन कागदावरच राहिला व मंत्र्यांना एका सहीवर महाविद्यालये मिळत गेली.  विनाअनुदानचे पेव फुठले तेव्हा शिक्षणतज्ञांना न विचारता कोणालाही महाविद्यालये दिली गेली. याचे उत्तरदायित्व कोणाचे? हे कोण कोणाला विचारणार?

obscene posts on social media of state women s commission chief rupali chakankar
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Avinash Deshmukh
एकाच इमारतीत चालतात तीन शाळा? शिक्षणाधिकाऱ्यांचे नातलगच त्या शाळेत शिक्षक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपानंतर खळबळ
maharashtras public universities face clamor over vacant professor posts recruitment planned through psc
प्राध्यापक भरती प्रस्ताव अर्थखात्याकडे, पण प्राचार्य फोरम म्हणते…
university professors selection promotion and vice chancellor appointment
विद्यार्थीच नसतील, तर प्राध्यापकभरती कशाला?
chairperson state women commission rupali chakankar on alandi unauthorized warkari educational institution
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर दोन दिवसांत करवाई करा; राज्य महिला आयोगाच्या सूचना
विद्यापीठातील निकालांची रखडपट्टी; नव्याने निकाल तयार करण्याची वेळ
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार

राजकीय वरदहरस्ताने महाविद्यालये उघडली गेली. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी व्यवस्थापनात व प्राध्यापक भरतीमध्ये नातेवाईकांचा भरणा केला गेला. भौतिक सुविधा नसतानाही महाविद्यालये दिली गेल्यामुळे आज नॅकमध्ये असलेली पूर्तता ते करूच शकत नाहीत.

अनेक महाविद्यालयांत पूर्णवेळ प्राचार्य नाहीत, प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत हे शासनाला दिसत नाही कां? त्या जागा भरण्याच्या जबाबदारी कोणाची?

ज्या जागेत महाविद्यालये सुरू झाली, त्यात ती मुळात सुरुच कशी झाली, हे नॅकमधील पूर्तता पाहून कळते, आता आज काहीच करता येत नाही. मग नॅक कसे होणार? पात्रता नसतानाही नातेवाईकांचीच भरती केली गेली आहे. नॅकमध्ये त्याबद्दल काय दाखवणार? या अशा अनेक अडचणीमुळे महाविद्यालयें नॅकला सामोरे जात नाहीत.

अनेक विनाअनुदानित व इतर महाविद्यालये सोयी नसताना उभी राहिली आणि नंतर अनुदानित म्हणून झाली. पण मग ते सोय आणणार कुठून? अनेक महाविद्यालयांनी देणग्या घेऊन संस्था चालवल्या, सुविधा मात्र कोणत्याच दिल्या नाहीत. शासन व विद्यापीठ यांनी अशा महाविद्यालयांना काय करता येईल याचा आराखडा तयार करायला हवा. महाविद्यालयांनी नॅक करण्याआधी आयएसओ करायला हवे म्हणजे त्यांना नॅक प्रक्रिया सोपी जाईल.

नॅक (NAAC) म्हणजे ‘राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद’ (National Assessment and Accreditation Council) ही भारतात उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि त्यांना मानांकन देण्यासाठी जबाबदार असलेली संस्था आहे. NAAC मानांकन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संस्थांना काही आवश्यकतांचा आणि निकषांचा अभ्यास करावा लागतो. त्यात मुख्यतः खालील गोष्टी आवश्यक असतात:

१. स्वायत्तता आणि मान्यता

संबंधित विद्यापीठाची किंवा प्राधिकरणाची मान्यता असणे आवश्यक आहे.

उच्च शिक्षण संस्थेने किमान पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला असावा.

२. स्वमूल्यांकन अहवाल (Self-Study Report – SSR)

संस्थेने SSR तयार करून NAAC ला सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय, आणि संशोधनाशी संबंधित माहिती असते.

३. मूल्यमापनासाठी निकष (Assessment Criteria)

अभ्यासक्रमातील गुणवत्ता: शैक्षणिक अभ्यासक्रमांचे डिझाईन, अंमलबजावणी आणि परिणाम.

शिकविण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धती: अध्यापन पद्धती, शिक्षकांची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा सहभाग.

संशोधन, नवकल्पना आणि विस्तार उपक्रम: संशोधन प्रकल्प, प्रकाशने, पेटंट्स आणि नवीन उपक्रम.

मूल्यांकन प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांचे निकाल: परीक्षांची पद्धत आणि निकालांची गुणवत्ता.

विद्यार्थी समर्थन आणि प्रगती: विद्यार्थी सेवांचे व्यवस्थापन, मार्गदर्शन, आणि प्लेसमेंट्स.

संस्था नेतृत्व आणि व्यवस्थापन: संस्थेचे प्रशासन, धोरणे आणि निर्णय प्रक्रिया.

सततचा विकास आणि सर्वोत्तमता: संस्थेच्या प्रगतीसाठी राबवलेले उपक्रम आणि सुधारणा.

४. प्रस्तुत प्रक्रिया

संस्थेने ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागतो.

आवश्यक ती कागदपत्रे आणि पुरावे सादर करावे लागतात.

NAAC च्या निरीक्षकांची टीम प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन करते.

५. नियोजित सुधारणा योजना (Post-Accreditation Initiatives)

मूल्यांकनानंतर मिळालेल्या अहवालाच्या आधारे संस्था सुधारणा योजना तयार करते आणि पुढील मानांकनासाठी तयार राहते.

NAAC मानांकन उच्च शिक्षण संस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते कारण ते संस्थेच्या गुणवत्ता आणि विश्वासार्हतेचा दाखला असतो.

अनेक महाविद्यालयांमध्ये फक्त निकाल चांगला लागला की पालक व विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतात त्यामुळे बाकीच्या सुविधांची व त्यांच्या पूर्ततेची तितकी आवश्यकता वाटत नाही.

प्राध्यापक पालक विद्यार्थी या सर्वांना निकाल हा एकच निकष महाविद्यालयासाठी महत्त्वाच्या वाटतो.

जागतिक गुणवत्तेत आपण कोठे आहोत, आयएसओ मानांकनामध्ये आपण कुठे आहोत, आंतरराष्ट्रीय पातळीवर जे निकष शैक्षणिक संस्थांना आवश्यक असतात ते आपल्यामध्ये असले काय नसले काय, आपला निकाल चांगला लागतो तेवढे पुरे असा विचार करून अनेक महाविद्यालये या पासून दूर राहतात.

महाविद्यालयांना श्रेणी देताना आता बरेच निकष लावले जातात महाविद्यालय समाजासाठी काय करतं, हे पाहिलं जातं.  भौतिक सुविधा म्हणजे केवळ रंगरंगोटी केलेली इमारत नव्हे तर तिथे स्वच्छतागृह कशी आहेत, महिलांसाठी वेगळी आहेत का, स्टाफ रूम, विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्था, पुरेपूर प्रकाश, खेळाचं मैदान, सुसज्ज ग्रंथालय इत्यादी गोष्टी पाहिल्या जातात. 

या सगळ्या गोष्टी जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे आहेत का, तज्ञ प्राध्यापक आहेत का, नेट,सेट, पीएचडी झालेले किती आहेत, प्राध्यापक आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत भाग घेतात का, त्यांचे संशोधन पेपर किती आहेत? संशोधनाकडे महाविद्यालय किती लक्ष देते या व इतर अशा अनेक बाबी केवळ करून चालत नाही तर त्यांचे दस्तावेजीकरण पद्धतशीर रित्या करणे हे नॅकमध्ये अपेक्षित आहे.

आपलं महाविद्यालय जागतिक पातळीच्या तुलनेत असायला पाहिजे याची जाणीव जागृती प्राध्यापकामध्ये व्हायला हवी. शिवाय केवळ व्याख्यान पद्धतीवर चालणारी महाविद्यालय आता  मंजूर नाहीत. एक-दोन वर्षापासून अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश बंद केले जातील असे सांगितले गेले आहे. पण अशा पद्दतीने प्रवेश बंद केले तर अनेक अडचणी येणार आहेत त्याचाही विचार व्हायला हवा.. शासन व विद्यापीठांनी अनेक उद्बोधन वर्ग, कार्यशाळा येऊन टप्प्याटप्प्याने एक एक सुधारणा महाविद्यालयांना विश्वासात घेऊन करायला  हव्यात. तसे झाले तर अनेक महाविद्यालये नॅकची प्रक्रिया आनंदाने पार पाडतील. शासन विद्यापीठ व महाविद्यालयांचे व्यवस्थापन या सर्वांनी एकत्र येउन प्रत्येक महाविद्यालयाच्या एक आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने त्यांना नेटच्या प्रक्रियेकडे न्यायला हवे तरच महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता दिसेल.

Story img Loader