नौशाद उस्मान
‘मुंबई स्वयंपाकघर’ नावाच्या ग्रुपमध्ये रमज़ाननिमित्त मुस्लीम खाद्यपदार्थ पोस्ट करण्यावरून जे ट्रोलिंग झालं, मुस्लिमांविषयी आणि इस्लामविषयी जे म्हटलं गेलं, ते सगळं वाचून मन खूपच खिन्न झालं होतं. असंच काही महिन्यांपूर्वी ‘वाचन वेडा’ नावाच्या ग्रुपमध्येही मुस्लिम समाज व इस्लामविषयीच्या मराठी पुस्तकांविषयीची एक पोस्ट ग्लोबल लाईट पब्लिशर या अकाऊंटवरून बुशरा नाहीद यांनी केली होती, त्यांनाही ट्रोल केलं गेलं. हे सगळं होतं ते सर्वसामान्यांच्या मनात मुस्लिमांविषयी असलेल्या गैरसमजुतीतून. या गैरसमजुती असतात कारण हे दोन्ही समाज जोडणारा पूलच अस्तित्त्वात नाही. आणि याचाच वेगवेगळ्या गटांकडून फायदाही घेतला जातो. खरं म्हणजे जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांकडे दुर्लक्ष करण्यासाठी मुस्लिम समाजाविषयी, त्यांच्या संस्कृती व विचारसरणीविषयी अपप्रचार केला जातो आहे. अशावेळी मुस्लिम समाजाविषयीच्या गैरसमजुती दूर करुन त्या अपप्रचाराचा प्रतिवाद होणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे आज मुसलमान समजून घेणे आवश्यक आहे. सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात कुणी मुसलमान समजून सांगत असेल तर तो एकप्रकारे माणसं जोडण्याचे, समाज जोडण्याचे, पर्यायाने देश जोडण्याचेच काम करत असतो.

म्हणून माणसाला माणूस जोडणार्‍यांनी या महत्कार्यासाठी संदर्भ म्हणून क़ुरआन किंवा पैगंबरी शिकवणीचे दाखले दिले तर अशा देशकार्य करणाऱ्यांना धर्मांध, बुरसटलेले म्हणून हिणवू नये. यांच्याशी संबंध ठेवले तर आपले पुरोगामीत्व ‘खतरे मे’ येईल अशी वृथा भीती बाळगून त्यांना वैचारिक अस्पृश्य ठरवू नका. तो धर्मप्रचार नसतो, तर प्रेमप्रचार असतो, माणसं जोडण्याचा प्रयत्न असतो. तसं याबाबतीत बऱ्याच मुस्लिमांचीही चूक आहे. मुस्लिम समाज व संस्कृतीविषयी ते मराठीत फारसे व्यक्त होतांना दिसत नाहीत. काही जण मराठीत व्यक्त झाले तरी आपलं पुरोगामीत्व उजळून दिसावं म्हणून ते सुधारणांच्या नावाखाली मुस्लिमांचे खलनायिकीकरणच करतांना दिसतात. ट्रोलर्सना ते एकप्रकारे रसदच पुरवित असतात.

article about income tax reforms in india
लेख : राजकीय-वित्तीय लोकशाहीच्या मिलाफासाठी..
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका

हेही वाचा : स्वामी स्मरणानंद यांचे अनंत प्रस्थान

मुस्लिम समाज व संस्कृतीविषयी सर्वांना अधिक माहिती व्हावी, त्यांच्याविषयीचे गैरसमज दूर व्हावेत आणि मना-मनांची तार जोडता यावी, याकरिता एका संस्थेने एका टोल फ्री नंबरची हेल्पलाईनच सुरू केली आहे – १८०० ५७२ ३०००. हैद्राबादच्या मेहदीपटनम परिसरात ही संस्था आहे – इस्लामिक इर्न्फामेशन सेंटर. या संस्थेतर्फे इंग्रजी, हिंदी, मराठी, तेलगू, बंगाली, ओरीया, कन्नड व तामिळ अशा आठ भाषेत इस्लामविषयी माहिती देणारे एक केंद्र चालविते जाते. प्रत्येक भाषेसाठी दोन – दोन कॉल प्रतिनिधी आठ + आठ असे दररोज सोळा तास काम करतात. उपरोक्त टोलफ्री नंबरवर डायल केल्यास अमूक भाषेसाठी अमूक नंबर दाबा, असे कस्टमर केअरच्या धर्तीवर संभाषण ऐकू येते. मराठीसाठी २ नंबर दाबावा लागतो. त्या नंबरवर इस्लामविषयी माहिती विचारल्यास तिकडून कॉल प्रतिनीधींद्वारे त्याच्या उत्तरादाखल ससंदर्भ माहिती देण्यात येते.

हेही वाचा : पाकिस्तानात चिनी प्रकल्पांवर वारंवार हल्ले का होताहेत?

देशभरात प्रबोधनाद्वारे व्यवस्था परिवर्तनासाठी चळवळ राबविणार्‍या जमाअत ए इस्लामी हिंद या संघटनेतर्फे सन २०१३ मध्ये सुरू झालेल्या या माहिती केंद्राचे वहाज हाशमी हे प्रमुख असून मतीन अहमद हे सचिव म्हणून काम पाहतात. लोकवर्गणीतून या संस्थेचे कार्य चालते. फोन कॉल्सवर संबंधित विषयांवर पुस्तकांची मागणी केल्यास तीदेखील संस्थेमार्फत पुरविली जातात. फक्त फोन कॉल्सच्या माध्यमांतूनच नव्हे तर फेसबूक, ट्वीटर, यु ट्युब, कोरा, व्हाट्स अ‍ॅप व इतर समाजमाध्यमांद्वारेही माहिती पुरविली जाते, प्रश्नांची उत्तरे दिली जातात. यासाठी विविध वृत्तपत्रे व इतर माध्यमांवर जाहिरातींद्वारेही संस्थेची माहिती दिली जाते. ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या पूर्णपणे विनामू्ल्य असलेल्या या हेल्पलाईनची शैली मात्र व्यावसायिक (प्रोफेशनल) आहे. भ़डक, कटू प्रश्नांवरही राग न मानता, भावूक न होता शांतपणे एखाद्या कॉल सेंटरच्या प्रतिनिधीसारखे सविस्तर उत्तर दिले जाते. जिहाद, तलाक, हलाला, बहुपत्नीत्त्व, शरीयत, बुरखा, काबागृह याव्यतिरीक्त एकेश्वरवाद, मरणोत्तर जीवन आणि प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या जीवनाविषयी तसेच इतर तत्सम विषयाच्या अनुषंगाने या नंबरवर दररोज प्रश्न विचारले जातात आणि कॉल प्रतिनिधी त्यांची उत्तरे देतात.

हेही वाचा : मविआने ‘वंचित’ला सोबत न घेतल्याचे परिणाम काय होऊ शकतात?

मुस्लिम व इस्लाम विषयासंबंधी संशोधन करणार्‍या संशोधकांना तर ही हेल्पलाईन म्हणजे वाळवंटात पाण्याचा झराच सिद्ध होतेय. कारण संबंधित विषयावर अनेक संदर्भग्रंथ कुठे मिळतील, काही संदर्भ अधिकृत आहेत की नाही याविषयी इत्यंभूत माहितीही देण्यात येत असते. सांगीवांगीवरून किंवा समाज माध्यमांवरून खरी खोटी माहिती घेण्यापेक्षा बर्‍याच लोकांनी या नंबरवर कॉल करून अधिकृत माहिती मिळवून आपल्या गैरसमजुती दूर केल्या आहेत. या संस्थेत मराठी भाषेसाठी कॉल प्रतिनिधी म्हणून काम करण्याची मला स्वत:ला संधी मिळाली. खरं म्हणजे हा एक असा नंबर आहे जो माणसाला माणूस जोडतोय. एकदा हा नंबर फिरवून तुम्ही खात्री करून घेऊ शकता.

naushaadusmaan@gmail.com