अजित रानडे

‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक अहवाल’ उपक्रमासाठी योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे मी खूप आभारी आहे. या अहवालाचे प्रकाशन होत आहे, हा खूप मोठा आणि महत्त्वाचा क्षण आहे. जिल्ह्यांची सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाचा शास्त्रशुद्ध आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने नोंद करत ‘लोकसत्ता’ने लोकसत्ता जिल्हा निर्देशांक अहवाल तयार केला. लोकसत्ता जिल्हा निर्देशांक तयार करताना कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटले वा समोर आले हे मी इथे मांडण्याचा प्रयत्न करतो.

article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
changes in temperature and inflation marathi news, temperature change impact on inflation marathi news
विश्लेषण : उष्णतेच्या झळांमुळे अन्नधान्य महागाई? नवीन संशोधनामध्ये कोणते गंभीर इशारे?
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार
Prepared primary textbooks in 52 vernacular languages of 17 states so that students have access to all study materials in their mother tongues
आपल्या बोलीतून शिकता यावे म्हणून..

हेही वाचा >>> जिल्ह्यांच्या नजरेतून विकास

हा अहवाल संशोधनावर आधारित आहे. तो तयार करताना  जाणवलेला पहिला मुद्दा असा की हा अहवाल तयार करणे ही एक जोखीम होती, ती अशी की, विकासाचे अनेक निकष आकडयात सामावून घेणे अवघड होते. दुसरा मुद्दा असा की हा अहवाल करताना खासगी-सार्वजनिक सहभागाची मोठी मदत झाली. राज्याच्या सांख्यिकी विभागाने अनेक प्रकारची माहिती, डाटा उपलब्ध करून दिला. त्यामुळे माहिती उपलब्ध करून घेणे सोपे झाले. तर तिसरा मुद्दा असा की हा केवळ एक पुरस्कार नाही ही बाब लक्षात घ्यायला हवी. हा पुरस्कार जिल्ह्याची क्षमता दर्शविणारा आहे. दोन जिल्ह्यांतील वस्तुनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्देशांक ठरविणे हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या अहवालामुळे जिल्ह्याच्या, राज्याच्या विकासाला चालना मिळत आहे. त्यामुळे असा हा उपक्रम राज्याबाहेरही राबविणे गरजेचे आहे. लेखक ‘गोखले इन्स्टिटय़ूट, पुणे’चे  कुलगुरू  आहेत.