बुलेट ट्रेनच्या पुलाचा भाग कोसळून मंगळवारी तीन कामगारांचा मृत्यू झाला. बुलेटच्या वेगाने प्रगतीचे दावे करणाऱ्या देशातल्या पायभूत सुविधांचा पाया एवढा ठिसूळ का? 

सर्वांत वेगवान, सर्वांत लांबलचक, सर्वांत उंच, सर्वांत भव्य… सारं कसं चकाचक दिसलं पाहिजे. नद्या कितीही प्रदूषित असू देत रिव्हरफ्रन्ट मात्र लख्ख हवा, नव्या कोऱ्या उड्डाणपुलांवर खड्डे पडले तरी चालतील, पण त्यांची ग्राफिटीने वारंवार रंगरंगोटी मात्र झालीच पाहिजे. एखादी जागतिक परिषद होतेय, गरिबी- अस्वच्छता पडदे लावून झाकून ठेवा, परदेशी पाहुण्यांना सारं काही आंतरराष्ट्रीय दर्जाचं दिसलं पाहिजे. भविष्याचा विचार सोडा. वर्तमानात जगा. उद्घाटनापुरतं तरी सारं काही भव्यदिव्य असलं पाहिजे. फोटो व्हिडीओमध्ये सुंदरच दिसलं पाहिजे. घर ते बाजार, शाळा, ऑफिस या रोजच्या ५-१० किलोमीटरमध्ये कितीही खड्डे, गर्दी, विलंब चालेल, प्राधान्य मात्र बुलेट ट्रेनला हवं… देशातल्या पायाभूत सुविधांबाबत असाच काहीसा दृष्टिकोन दिसू लागला आहे.

Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
article about donald trump strategy to win us presidential election 2024
प्रचारात लोकांचे मुद्दे हरले, ट्रम्प जिंकले!
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…

पंतप्रधानांच्याच हस्ते २२ जानेवारी २०२४ रोजी अयोद्धेतल्या बहुप्रतीक्षित राममंदिरात श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भव्य सोहळा झाला. आणि अवघ्या सहा महिन्यांत जून २०२४मध्ये गाभाऱ्यालगतच्या मंडपाला गळती लागली. नूतनिकरण झालेल्या अयोध्या रेल्वे स्थानकाचा परिसर जलमय झाला. राम पथावर खड्डे पडले, पाणी साचलं. पाण्याचा तातडीने उपसा करण्यात आला, मात्र भाविकांना चिखलातून जावं लागलं. मंदिराची संगमरवरी फरशी कळकट तर झालीच शिवाय त्यावरून पाय घसरू लागले. संबंधित यंत्रणांनी मंदिराचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही, वरचे भाग खुलेच असल्यामुळे पाणी वाहून खाली आलं, असं स्पष्टीकरण दिलं. पण बांधकाम अर्धवट असताना प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई का केली हा त्यावेळी शंकराचार्यांनी उपस्थित केलेला प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

४ डिसेंबर २०२३… सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजगड किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते शिवरायांच्या ३५ फुटी पुतळ्याचं अनावरण झालं आणि अवघ्या नऊ महिन्यांत २८ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा कोसळला. महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.

पंतप्रधानांनी १२ जानेवारी २०२४ रोजी मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या, तब्बल १८ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या अटल सेतूचं उद्घाटन केलं. लगोलग छायाचित्रं, चित्रफिती व्हायरल झाल्या. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लांबलचक पुलावरून विहंगम दृश्य पाहत प्रवास करण्यासाठी मुंबई, नवी मुंबईकरांची रिघ लागली आणि पाचच महिन्यांत २१ जून २०२४ रोजी बातमी आली- अटल सेतूला तडे गेले. 

हेही वाचा >>> सुरक्षिततेसाठी पुनर्विकास अपरिहार्य

जबलपूर एअरपोर्टच्या नव्या टर्मिनलचं छत २८ जून २०२४ रोजी कोसळलं. हे छत म्हणजे विमानतळाचं सौंदर्य वाढवण्याच्या दृष्टीने उभारलेली कापडी कानॉपी होती. पावसाचं पाणी त्यावर साठलं आणि ती फाटून खालून जाणाऱ्या वाहनावर कोसळली. गाडीच्या छताचा आणि काचांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या टर्मिनलचं आवघ्या तीनच महिन्यांपूर्वी १० मार्च २०२४ रोजी उद्घाटन झालं होतं- पंतप्रधानांच्याच हस्ते.

२८ डिसेंबर २०१६… पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तब्बल ११ हजार ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या ९०० किलोमीटर लांबीच्या चार धाम महामार्ग प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होता कारण त्यामुळे त्यांच्या पारंपरिक उदरनिर्वाह साधनांवर म्हणजेच वनांवर कुऱ्हाड चालवली जाणार होती, पर्यावरणवाद्यांचा विरोध होता कारण हिमालयातली अस्थिर भौगोलिक परिस्थिती आणि अनेक दुर्मीळ प्रजातींचा धोक्यात येणारा अधिवास. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या पर्यावरण अभ्यासक रवी चोप्रा यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेदेखील या प्रकल्पाविषयी अनेक आक्षेप नोंदवले होते, पण तरीही प्रकल्प पुढे रेटला गेला. प्रचारसभेत पंतप्रधान म्हणाले होते की हे काम पुढची १०० वर्षे स्मरणात राहील… सध्या तरी स्मरणात राहिली आहे ती या प्रकल्पाचा एक भाग असलेल्या सिल्कियारा बोगद्यातली दुर्घटना. तब्बल १६ दिवस ४१ कामगार अंधाऱ्या कोंदट बोगद्यात अडकून पडले होते.

गुजरातमधली मोरबी पूल दुर्घटनाही कोणी विसरू शकणार नाही. ब्रिटिशांच्या काळात बांधलेल्या या पुलाचं नूतनीकरण होऊन तो २६ ऑक्टोबर २०२२ रोजी पुन्हा खुला करण्यात आला. ‘आता या पुलाची वजन पेलण्याची क्षमता वाढली असून लोक आता निश्चिंतपणे इथे फिरू शकतील,’ असं नूतनीकरण करणाऱ्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरने उद्घाटन प्रसंगी म्हटलं होतं, पण अवघ्या पाचव्या दिवशी पूल कोसळला आणि त्यावर उभे असलेले १३५ जण मृत्युमुखी पडले.

१९ जून २०२२ दिल्लीत ९२० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या प्रगती मैदान टनलचं उद्घाटन झालं – अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हस्ते. या भुयारी मार्गामुळे दिल्लीतलं दळणवळण अधिक गतिमान होईल असा दावा केला जात होता. मात्र उद्घाटन झाल्यापासून अवघ्या दोन वर्षांतच हा मार्ग वाहतुकीला मोठा अडथळा ठरू लागला. पावसाळ्यात प्रचंड प्रमाणत पाणी साचल्यामुळे तो वारंवार बंद ठेवणं भाग पाडू लागलं. ८ सप्टेंबर २०२२ – मोदींनी कर्तव्य पथाचं उद्घाटन केलं आणि २८ जून २०२४ रोजी हा रस्ताही जलमय झाला.

हेही वाचा >>> लेख: भयमुक्त व्यापारउद्याोग करण्याची संधी…

१० मार्च २०२४- दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १च्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं, हे ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आणि अवघ्या तीन महिन्यांत २८ जून रोजी याच टर्मिनलच्या अन्य एका इमारतीचं छत अतिवृष्टीमुळे कोसळलं. दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. ही इमारत काँग्रेस काळात २००९ मध्ये बांधण्यात आली होती असं स्पष्टीकरण सरकारकडून लगोलग दिलं गेलं, पण म्हणजे तिच्या देखभालीची जबाबदारीही काँग्रेस वरच आहे का, हा प्रश्न उपस्थित केला गेलाच.

२२ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं- पंतप्रधानांच्या हस्ते. या मार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर १६ तासांवरून ८ तासांवर येईल असा दावा करण्यात आला होता. पण उद्घाटन झाल्यापासून हा मार्ग वेगापेक्षा अधिक चर्चेत राहिला तो सततच्या अपघातांमुळे, चुकीच्या रचनेमुळे आणि सोयीसुविधांचा अभावामुळे.

विश्र्वगुरू, महशक्तीचा कितीही जप केला तरी प्रत्यक्षात अद्यापही विकसनशील असलेल्या आपल्या देशाला काय हवं आहे? रोजचं जीवन सुसह्य, सुरक्षित करणाऱ्या, टिकाऊ पायाभूत सुविधा. जिथे एका तासात पोहोचता येतं तिथे पोहोचण्यासाठी तीन तास लागणार नाहीत याची शाश्वती. घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी हतीपायी धड परत येईल अशी खात्री. कोणी होर्डिंग कोसळून दगवणार नाही, मॅनहोलमधून वाहून जाणार नाही ही निश्चिंतता… अमुक शे किलोमीटरचे बहुपदरी महामार्ग, निसर्गावर मात करणारे भुयारी मार्ग, सर्वांत उंच, सर्वांत जास्त, सर्वांत भव्य, सर्वांत वेगवान, सर्वात कमी कालावधीत… असेल विश्वविक्रम आपल्याला परवडणार आहेत का? त्यांची खरंच गरज आहे का?

vijaya.jangle@expressindia.com

Story img Loader