काही वर्षांपूर्वी, समाजमाध्यमे नसताना, अभिनेता आमीर खानचे एक वक्तव्य प्रसिद्ध झाले होते. “शाहरूख माझ्या पायाशी गोंडा घोळत आहे, माझे पाय चाटत आहे” अशा अर्थाचे तो काही बोलला होता. हे प्रसिद्ध झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे गहजब उडाला. नंतर, “शाहरूख हे माझ्या कुत्र्याचे नाव आहे”, अशी खुलासावजा सारवासारव आमीरने केली होती. पण शाहरूखचे चाहते नाराज झाले ते झालेच. आमीरच्या चाहत्यांनाही ते फारसे रुचले नव्हते. ‘आमीर नावाच्या मुस्लीम सुपरस्टारने आपल्या कुत्र्याचे नाव शाहरूख या दुसऱ्या सुपरस्टारच्या नावावरून ठेवले आणि त्यामुळे शाहरूखचे बहुसंख्य हिंदू चाहते नाराज झाले’, असा आचरट अर्थ कोणी लावला नव्हता, ना त्यावरून कोणी न्यायालयात गेल्याची माहिती आहे. पण आता काळ बराच बदलला आहे. कलाकारांचे जात आणि धर्म यावरून त्यांना जात-धर्माच्या राजकारणात ओढण्याचे प्रकार अलीकडे पाहायला मिळतात. त्यामध्ये आता प्राण्यांचीही भर पडली आहे.

पश्चिम बंगालमधल्या दार्जीलिंगच्या पायथ्याशी वसलेल्या सिलिगुडी इथल्या बंगाल सफारी पार्कमध्ये अलिकडेच, १२ फेब्रुवारीला नर आणि मादी सिंहाची जोडी आणली आहे. नराचे नाव अकबर आणि मादीचे नाव सीता. ‘हिंदू नावाच्या सिंहिणीला मुस्लीम नाव असलेल्या सिंहाबरोबर ठेवल्यामुळे तमाम हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत’, असे म्हणत विश्व हिंदू परिषदेने कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि सिंहिणीचे नाव बदलावे अशी मागणीही केली आहे. उच्च न्यायालयाच्या जलपैगुडी खंडपीठासमोर या याचिकेवर २० फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
I will continue to question the system through my songs Neha Rathod
मी माझ्या गाण्यांतून व्यवस्थेला प्रश्न विचारत राहणार – नेहा राठोड

हेही वाचा – समतोल विकासासाठी निर्देशांक उपयुक्त!

ही बातमी आल्यापासून त्यावर अपेक्षेप्रमाणे विविध प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे, हा प्रकार ‘अति झालं आणि हसू आलं’ या श्रेणीत मोडणारा आहे, दुसरीकडे तितकाच संतापजनक आहे. मुळात सिंहांना किंवा अन्य कोणत्याही प्राण्यांना जात-धर्म असतो का? माणूस सोडून जगात कोणत्याही सजीवाला जात-धर्म नसतात, असतात ते केवळ गुणधर्म! सिंहाला अकबर म्हणा, अमर म्हणा किंवा अँथनी म्हणा, तो सिंहच राहणार आहे. ना तो डोक्यावर गोल टोपी घालणार आहे, ना कपाळाला गंध किंवा भस्म लावणार आहे, ना गळ्यात क्रॉस घालणार आहे.

प्राण्यांना आपल्या आवडीची किंवा सोयीची नावे देणे ही अगदी सर्वत्र रुळलेली पद्धत आहे. घरच्या मांजर, कुत्र्यांपासून प्राणिसंग्रहालये, अभयारण्ये, नॅशनल पार्कमधील प्राणी, पक्ष्यांना विविध नावे दिली जातात. त्यावरून आतापर्यंत कोणी त्यांचे धर्म शोधायला गेले नव्हते. विश्व हिंदू परिषदेने तेही करून दाखवले आहे. आपण असे करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना कुठून आला, या प्रश्नाचे उत्तर देशाच्या विद्यमान राजकीय आणि सामाजिक स्थितीत सापडेल. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून न लावता दाखल कशी करून घेतली असाही प्रश्न पडतोच.

अकबर आणि सीता ही नावे एकत्र आल्यामुळे सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचा विंहिपचा दावा आहे. त्यांनी या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कोणतीही आकडेवारी, तथ्ये सादर केलेली नाही. २०११च्या जनगणनेनुसार भारतामध्ये ९६ कोटींपेक्षा जास्त हिंदू लोक राहतात. या सर्वांच्या भावना विहिंपला कशा काय समजल्या? आणि या दुखावलेल्या भावना कशा मोजल्या? भावना दुखावल्याचे मोजमाप काय असते? यामध्ये मेख अशी की, भावना दुखावल्या हा अतिशय सापेक्ष शब्दप्रयोग आहे. कित्येक वर्षांपासून कोणतीही संघटना अमुक एका समूहाच्या भावना दुखावल्या अशी तक्रार करते, कधीकधी त्यावरून हिंसा घडवली जाते आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे ते सहन केले जाते.

हेही वाचा – हा उपक्रम आता इतर राज्यांमध्येही राबविला जावा

विहिंपच्या सोयीसाठी असे गृहीत धरू की खरोखर त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. ‘अकबरा’वरील आक्षेप जरा नजरेआड करून या संघटनेला सीतेबद्दल वाटणारा आदर, सन्मान, आपुलकी हेच सत्य आहे असेही गृहीत धरूया. याचा अर्थ भारतामध्ये, खरं तर ‘विश्व हिंदू परिषद’ असल्यामुळे ‘विश्वा’मध्ये असलेल्या यच्चयावत सीता नावाच्या महिला सर्वसुखी, सुरक्षित, आनंदी, समाधानी राहतील यासाठी विश्व हिंदू परिषदेने काय केले आहे? हजारो, लाखो सीतांवर अन्याय होत असेल, त्यांच्यावर अत्याचार होत असतील, गुन्हे घडत असतील, लैंगिक शोषण होत असेल, फसवणूक होत असेल, प्रसंगी हत्या होत असतील; हे सर्व थांबवण्यासाठी विहिंप काय करत आहे? किंवा आतापर्यंत काहीच केले नसेल तर यापुढे का होईना काही करण्याची कोणती योजना आहे? विश्व हिंदू परिषदेची स्थापना १९६४मध्ये झाली. या संघटनेच्या ६० वर्षांच्या इतिहासात सीता नावाच्याच काय पण अन्य कोणत्याही स्त्रियांवर घरात/ कुटुंबांतही होणाऱ्या अत्याचारापासून त्यांच्या संरक्षणार्थ काहीही कार्यक्रम हाती घेतल्याचे दिसत नाही. हिंदू धर्माचे संरक्षण करणे, संघटन करणे आणि समाजसेवा करणे हे विहिंपचे उद्दिष्ट असल्याचे त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. यापैकी कोणत्या उद्दिष्टामध्ये प्राण्यांचा धर्म शोधण्याचा प्रकार बसतो?

वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील याची शक्यता जवळपास नाहीच. आपल्याला कोणी काही प्रश्न विचारूच शकत नाही असा दांडगा आत्मविश्वास असल्याशिवाय सिंहांच्या नावावरून भावना दुखावून घेतल्या जात नाहीत. त्यासाठी न्यायालयात जाणाऱ्या विहिंपच्या पदाधिकाऱ्यांना हे बरोबर ठाऊक असणार.

nima.patil@expressindia.com