भारतात लोकसंख्येची घनता अधिक असूनही कोविड साथकाळात येथील मृत्युदर पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत पाच ते आठ पट कमी राहिला. यासाठी भारतीयांच्या आहाराचा हातभार लागला का, याचा शोध घेण्यासाठी ‘इंडियन जर्नल फॉर मेडिकल रिसर्च’ने एक अभ्यास केला, त्याचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. अहवालाचे निष्कर्ष या अंदाजाला पुष्टी देणारे आहेत.

या अभ्यासासाठी तीन पाश्चात्त्य देशांतील कोविडग्रस्त रुग्णांच्या रक्तातील घटकांची भारतातील कोविडग्रस्तांच्या रक्तातील घटकांशी तुलना करण्यात आली. ‘न्युट्रोजिनॉमिक्स’ (व्यक्तीच्या आहाराचा त्याच्या जनुकांवर काय परिणाम होतो आणि शरीराचा आहारातील घटकांना मिळणारा प्रतिसाद जनुकांवर कसा अवलंबून असतो, याचा अभ्यास करणारी शाखा) आणि प्रतिव्यक्ती प्रतिदिन आहाराचे प्रमाण या निकषांचा यात विचार करण्यात आला.

iran women hijab
हिजाब न घातल्याने महिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, इराणमध्ये नक्की काय घडत आहे?
Survey, Finds 58 percentage Indians, Suffer from Mosquito Bites, Affecting sleep, Affecting Productivity, Mosquito Bites, Indians Mosquito Bites, gcpl survey,
डासांमुळे निम्म्या भारतीयांची होतेय झोपमोड; महाराष्ट्रासह पश्चिम भारताला बसतोय सर्वाधिक फटका
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती

हेही वाचा – भारतीय ज्ञानप्रणाली हवी की आधुनिक ज्ञानशाखा?

अभ्यासातून भारतीयांच्या आहारविषयक सवयी मृत्युदर कमी राखण्यास साहाय्यभूत ठरल्या असाव्यात, असा निष्कर्ष निघाला आहे. पाश्चिमात्यांच्या आहारात लाल मांस, दुग्धजन्य उत्पादने आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात ‘सायटकिन’ प्रवर्गातील प्रथिनांचे प्रमाण अचानक प्रचंड प्रमाणात वाढते. याला ‘सायटकिन स्टॉर्म’ म्हणून संबोधले जाते. ही सायटकिन्स शरीराच्या प्रतिकारशक्तीवर तसेच, रक्तपेशी आणि अन्य पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवणारी उपयुक्त प्रथिने असतात. मात्र त्यांच्या प्रमाणात अल्पावधीत अतिप्रचंड वाढ झाल्यास प्रतिकारशक्तीवर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. वर नमूद पदार्थांच्या सेवनाने ‘इन्टुससेप्टिव्ह अँजिओजेनेसिस’च्या प्रक्रियेलाही चालना मिळू शकते. यात नव्या रक्तवाहिन्यांची निर्मिती होऊ लागते. ट्युमर तयार होतात तेव्हा हीच प्रक्रिया झालेली असते. याव्यतिरिक्त ‘हायपरकॅप्निया’लाही चालना मिळू शकते. यात शरीरातील कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढते. चयापचय क्रियेतून कार्बनडाय ऑक्साइड निर्माण होतो. पाश्चिमात्यांच्या आहारात समाविष्ट पदार्थांमुळे चयापचयक्रियेत बिघाड होऊन शरीरात निर्माण होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढते. शरीरात घडणाऱ्या या सर्व प्रक्रिया कोविडमधील गुंतागुंत आणि परिणामी मृत्यूची शक्यता वाढवितात.

पाश्चिमात्यांचा आहार भारतीयांपेक्षा बऱ्याच बाबतीत वेगळा आहे. भारताच्या तुलनेत पाश्चात्त्य देशांत कॉफी पिण्याचे आणि मद्यपानाचे प्रमाण मोठे आहे. हे दोन्ही प्रकार शरीरातील झिंक, लोह आणि ट्रायग्लिसराइड्च्या पातळीत गडबड करतात. त्याविरुद्ध भारतात मात्र चहापान करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. नियमित चहापानामुळे शरीरातील एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राहते. भारतीयांच्या आहारात हळदीचा समावेश हमखास असतो. हळद प्रतिकारशक्ती तर वाढवतेच, शिवाय सार्स प्रवर्गातील विषाणूंच्या संसर्गाची तीव्रताही नियंत्रणात ठेवते.

हेही वाचा – यारी भांडवलशाहीच्या हाती पायाभूत विकासप्रकल्प असणे धोक्याते नाही का ?

भारतीयांच्या तुलनेत पाश्चिमात्य लाल मांस १० ते २५ पट, प्रक्रिया केलेले पदार्थ ८ ते १२ पट, दुग्धजन्य पदार्थ पाच ते सात पट, मासे तीन ते आठ पट, कॉफी १० ते १२ पट आणि मद्य दुप्पट अधिक सेवन करतात. भारतीय पाश्चिमात्यांपेक्षा दीड पट अधिक भाज्या, डाळी व कडधान्ये आणि चौपट अधिक धान्यांचे सेवन करतात. पाश्चिमात्यांच्या आहारात चहा आणि हळदीचा समावेश अगदी नगण्य प्रमाणात आहे. भारतात प्रतिव्यक्ती प्रतिदिन सुमारे १.२ ते २.५ ग्रॅम चहा आणि हळदीचे सेवन केले जाते. भारतीयांच्या रोजच्या आहारात काळी मिरी, जिरे, मोहरी, हिंग अशा मसाल्याच्या पदार्थांचा, काळे मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर अशा जिनसांचा सामवेश हमखास असतो.

कोविड संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंमागे झिंक आणि लोहाची कमतरता ही महत्त्वाची कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच कोविडवरील उपचारांत झिंकच्या गोळ्यांचा समावेश केला जात होता. दुग्धजन्य उत्पादनांत लोहाचे प्रमाण कमी असते आणि मद्यपानामुळे झिंकची पातळी घसरते. अभ्यासातून असे निदर्शनास आले की इडलीमध्ये झिंक, लोह आणि तंतूमय पदार्थांचे प्रमाण लक्षणीय आहे. इडलीमधून मिळणारे झिंकचे प्रमाण हे मांसाहारातून मिळणाऱ्या प्रमाणापेक्षा आणि कोविडकाळात ज्या जीवनसत्त्वांच्या गोळ्या देण्यात आल्या त्यापेक्षाही अधिक असते. गहू, तांदूळ, चणे, राजमा यातून झिंक आणि लोह मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचेही स्पष्ट झाले.

हेही वाचा – ‘क्वीअर स्टडीज’च्या वैचारिक बळाची न्यायालयात कसोटी..

अर्थात या अभ्यासात सहभागी व्यक्तींच्या रक्तनमुन्यांचा अभ्यास करताना सहव्याधी, वय, लिंग, धूम्रपानाच्या सवयी, लसीकरण इत्यादी निकष विचारात घेण्यात आलेले नाहीत. शिवाय, सर्वेक्षण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्याही अतिशय मर्यादित होती. त्यामुळे यातील निष्कर्ष सरसकट लागू होतीलच, असे नाही. मात्र त्यातून भारताची लोकसंख्या प्रचंड असूनही आणि येथील आरोग्यविषयक सोयीसुविधा पाश्चिमात्य देशांतील सुविधांएवढ्या मुबलक आणि अत्याधुनिक नसूनही आपल्या खाद्यसंस्कृतीने आपल्याला तारल्याचे दिसते. घरी तयार केलेले ताजे अन्न खावे, व्यसनांपासून दूर राहावे, आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या पाककृतींना फॅड डाएटपायी अंतर देऊ नये हे अधोरेखित होते. आपला खाद्यठेवा जपल्यामुळे कोविडमृत्यूंचा दर कमी राखण्यात हातभार लागला असावा, ही शक्यताही अधिक ठळकपणे समोर येते.

(https://journals.lww.com/ijmr/abstract/9000/indian_food_habit___food_ingredients_may_have_a.99787.aspx)