सुरज मिलिंद एंगडे

ब्रिटनच्या, किंबहुना जगाच्याच अलीकडच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्ता गाजवणाऱ्या राणी एलिझाबेथ विंडसर यांचे ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. वयाच्या २५ व्या वर्षी एलिझाबेथ ब्रिटिश साम्राज्याच्या प्रमुख बनल्या होत्या. ब्रिटिशांचे त्यांच्या राणीसोबत निराळेच नाते आहे. त्यांनी या ‘सम्राज्ञी’ला तिची स्वतःची म्हणून स्वीकारले परंतु म्हणून त्या सर्वांना ‘साम्राज्यवाद’ मान्यच असतो असे नाही. त्यामुळेच, एलिझाबेथ यांनीही वसाहती विस्तारवादात भाग कसा घेतला होता, याच्या आठवणी काढून आता टीका करणारे बरेच जण आहेत.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?

सम्राट म्हटले ती तो अथवा ती शोषक असणार, हे जणून जगाने मान्यच केलेले असते. त्याला व्याख्यात्मक अपवाद केवळ भारताने दिला, कारण नैतिकतेचा – धम्माचा – पाया हाच भूमीचा कायदा म्हणून मान्य करण्याचे धोरण सम्राट अशोक यांचे होते. मात्र अशोकानंतर कुठे सम्राटांच्या परोपकारी कथा सापडत नाहीत.

सध्या ब्रिटनमध्ये ‘रिपब्लिक’ नावाच्या एका गटाच्या नेतृत्वाखाली एक मोहीम आहे. राजेशाहीच्या जागी संसदीय प्रजासत्ताकाची त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी त्यांना लिखित राज्यघटनाही हवी आहे, जी यूकेच्या सरकारकडे नाही. ‘मेक एलिझाबेथ द लास्ट’ असे आवाहन करताच त्यांची सार्वजनिक मोहीम लक्ष वेधून घेऊ लागली. याकडे लवकरच यूके आणि बाहेरूनही लक्ष वेधले गेले. पूर्वीच्या वसाहतीत असलेल्या देशांना आजही ब्रिटिश साम्राज्यवादाचा तिरस्कार वाटतो, हे खरेच आहे.

भारतात, ब्रिटिश वसाहतीच्या क्रूरतेमुळे एक दशकापूर्वीपर्यंत लोकांमध्ये जितका संताप निर्माण होत असे, तितका तो आज दिसत नाही. तो राग आता मुकुट नसलेल्या पण घराणेशाहीत अव्वल मानल्या जाणाऱ्या गांधी कुटुंबावर काढला जात असावा! भारतीय परकीय आक्रमकांचा तिरस्कार नक्कीच करतात पण इतिहास असे सांगतो की, भारतीय लोक सम्राटांवर प्रेम करतात. त्यामुळेच वसाहतवादाच्या आधी काही या भूमीवर न्यायाचे राज्यच होते अशी स्थिती नसली तरी, त्या काळातल्या दमनाची चर्चा फारशी होत नाही.

एकेकाळी ब्रिटिश वसाहत असलेल्या (अन्य) देशांमधून एलिझाबेथच्या निधनानंतर समाजमाध्यमांवर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यातून असे दिसते की, वसाहतवादाचे ओरखडे वरवर दिसत नसले तरी ते आहेत. रंग-आधारित समाज आणि जागतिक उच्चभ्रूंच्या राजवटीने भूतकाळाशी समेट करणे अवघड ठरते आहे. त्यातच आजची आर्थिक विषमता आणि राजकीय अस्थैर्य यांमुळे जगभरचेच बिगर-गोरे सामान्यजन हे त्यांच्या सध्याच्या दडपशाहीचा दूरस्थपणे गौरव करणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल अधिक असहिष्णु बनले आहेत. त्यांच्या राणी ही पूर्वीच्या साऱ्याच शासकांचे प्रतीक ठरते.

पण याच राणीमुळे ब्रिटनच्या पर्यटन व्यवसायाला एक आकर्षण मिळाले होते. भूतपूर्व वसाहतींना आज ‘राष्ट्रकुल’ किंवा कॉमनवेल्थ म्हणून ओळखले जाते अशा कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आणखी बारा आशियाई-पॅसिफिक आणि कॅरिबियन देशांमध्ये राणीच्या देणगीतून अनाथाश्रम चालतात. राजघराणे अजूनही यूकेमध्ये आणि काही राष्ट्रकुल देशांमध्येही प्रिय आहे. वसाहतवाद संपला असला तरी ब्रिटिश राणी अथवा राजा हे यापैकी अनेक देशांचे घटनात्मक प्रमुख आजही आहेत. यापैकी बार्बाडोसने अलीकडेच ब्रिटिश राजेशाही झुगाली. जमैका केवळ राजेशाहीचा अस्वीकार करण्याचे ठरवत नसून, या बेटवजा देशाने नुकसानभरपाईसाठी ब्रिटिश राजवटीला विनंतीही केली आहे.

अशा वेळी यूकेमध्ये राजघराण्याविरुद्धचा निषेध उकळू लागला आहे, परंतु राजघराण्यावरच विश्वास असणारे अविचल आहेत. बाल्कनीतून किंवा रथातून जाणाऱ्या सम्राटाला पाहण्यात त्यांना आनंद वाटतो. ते राजघराण्याचा राजनैतिक प्रभाव अधोरेखित करतात.

थोडक्यात, एका ‘प्रतीकात्मक प्रमुखा’भोवती देखील इतकी चर्चा आजही होते आहे.

( सुरज एंगडे हे हार्वर्ड विद्याापीठात संशोधक व ऑक्सफर्ड विद्याापीठामध्ये डॉक्टरेट पदवीचे अभ्यासक आहेत. )

suraj.loksatta@gmail.com