विजय थलपती म्हणजेच जोसेफ विजय चंद्रशेखर या तमिळनाडूमधल्या सुपरस्टारने आपल्या नव्या पक्षाची घोषणा करून फिल्मी सिताऱ्यांनी राजकारणात उतरण्याची द्रविडी परंपरा एक पाऊल पुढे नेली आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता या राजकारणात कमालीच्या यशस्वी झालेल्या अभिनेत्यांची फळी जशी तमिळ राजकारणात आहे, तशीच अपयशी झालेल्या अभिनेत्यांचीही मालिका तिथं आहे. सुपरस्टार कमल हसन हे त्यामधलं अलिकडचं नाव. विजय थलपती यांचा समावेश पहिल्या यादीत होणार की दुसऱ्या यादीत हे तमिळनाडूमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये कळेलच. पण थलपती म्हणजेच कमांडर हे आपलं नाव राजकारणात सार्थ करण्याची संधी आणि जबाबदारी सध्या विजय थलपती यांच्यावर आहे. 

पन्नाशीच्या जवळ आलेले विजय थलपती आजच्या घडीला तमिळ सिनेमामधले सुपरस्टार आहेत. त्यांचे वडील चंद्रशेखर हे तमिळ सिनेमासृष्टीमधले प्रसिद्ध दिग्दर्शक होते, तर आई गायिका. आपल्या वडिलांच्या सिनेमांमधूनच विजय थलपति यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी वडिलांच्या १५ आणि इतरांच्या ५० अशा एकूण ६५ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि त्यातले बहुतेक सिनेमे व्यावसायिक पातळीवर प्रचंड यशस्वी ठरले आहेत. विजय थलपतींना त्यांच्या आईकडून गाता गळाही मिळाला आहे. थुपक्की या सिनेमासाठी त्यांनी गायलेलं ‘गूगल गूगल’ हे गाणं नुसतं लोकप्रियच झालं नव्हतं, तर त्यासाठी विजय थलपतींना त्या लोकप्रिय गाण्याचा पुरस्कारही मिळाला होता. 

Manifesto of Shiv Sena Shinde group has not been published
शिवसेना शिंदे गटाचा जाहीरनामा प्रसिद्धच झाला नाही!
hindutva ideology marathi news, hindutva latest marathi news
कोणीही जिंकले तरीही सत्ता हिंदुत्ववादी विचारांचीच!
chhagan bhujbal uddhav thackeray narendra modi
उद्धव ठाकरेंसाठी महायुतीचे दरवाजे खुले? पंतप्रधानांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले, “राजकारणात आजचा शत्रू…”
prajwal revanna case
Scandal: “प्रज्ज्वल रेवण्णाला भगवान कृष्णाचाही रेकॉर्ड मोडायचा होता”, काँग्रेसच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान
Govinda eknath shinde
राजकारणातील पुनरागमनासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचीच निवड का केली? अभिनेता गोविंदा म्हणाला…
bjp leaders goal to get 370 seats in lok sabha poll
३७० जागा मिळाव्यात, असे भाजपनेत्यांना तरी का वाटावे?
Karmayoga, Jambu Dwaipayana,
जंबुद्वैपायनाचा कर्मयोग…
Arun Govil Hema Malini BJP Rajput anger Uttar Pradesh
हेमा मालिनी, अरुण गोविल राजपूत समाजाच्या रोषाला कसं सामोरं जाणार?

हेही वाचा – पंजाबी, बंगाली, मराठी, कानडी… सगळेच एकमेकांना ‘चले जाव’ म्हणू लागले तर या देशाचं काय होईल?

विजय थलपती हे रजनीकांत यांचे जबरदस्त फॅन आहेत. पण आपल्या या व्यावसायिक आदर्शाला त्यांनी व्यावसायिक पातळीवर मागे टाकलं आहे. रजनीकांत यांनी त्यांच्या आगामी ‘दरबार’ या सिनेमासाठी ९० कोटी मानधन घेतले आहे, तर विजय थलपती यांनी ‘थलपति ६५’ या सिनेमासाठी १०० कोटी म्हणजे रजनीकांत यांच्यापेक्षा जास्त मानधन घेतलं आहे, अशा बातम्या आहेत. करोनाकाळात ‘मास्टर’ या त्यांच्या सिनेमाने उत्पन्नाचे सगळे रेकॉर्ड मोडून २०० कोटींची कमाई केली होती, असं सांगितलं जातं.  

आता विजय थलपती चर्चेत आहेत, ते ‘तमिझगा वेत्री कळघम’ म्हणजेच ‘तमिळनाडू विजय पार्टी’ या त्यांच्या नव्या राजकीय पक्षाच्या घोषणेमुळे. २०२६ मध्ये तमिळनाडूत होणाऱ्या विधानसभा निवडणुका त्यांचा हा पक्ष लढवणार आहे. ‘एक्स’वरून आपल्या पक्षाची घोषणा करतानाच विजय थलपती यांनी जाहीर केलं आहे, की त्यांचा पक्ष येत्या लोकसभा निडवणुका लढवणार नाही आणि या निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. सध्या हातात असलेले सिनेमे पूर्ण केल्यानंतर ते नवे सिनेमे घेणार नाहीत आणि त्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणात आणि समाजकारणात पूर्णवेळ सक्रीय होतील. तमिळनाडूच्या लोकांना भ्रष्टाचार, जातीभेद, धर्मभेदमुक्त, निस्वार्थी, कार्यक्षम प्रशासन हवं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असं विजय थलपती सांगतात. विजय थलपती ख्रिश्चन आहेत आणि ते उदयार या मागास समाजातून आले असून ग्रामीण भागांत त्यांना चांगलंच फॅन फॉलोइंग आहे, असं सांगितलं जातं. पण त्यांना अशा कोणत्याही चौकटीत बंदिस्त करता येत नाही, असं त्यांना ओळखणारी मंडळी सांगतात. 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजप विजय थलपती यांच्याशी हातमिळवणी करत असल्याच्या बातम्यांना विजय यांच्या या स्पष्टीकरणामुळे स्पष्टता मिळाली असली तरी तमिळनाडूमधल्या राजकीय विश्लेषकांना मात्र ती मान्य नाही. त्यांच्या मते, आज विजय थलपती अशी भूमिका घेत असले तरी उद्या ते भाजपशी जमवून घेतील आणि त्यांच्यामुळे तमिळनाडूनधल्या राजकारणात भाजपचा प्रवेश सुकर होईल, अशीच शक्यता जास्त आहे. फक्त सिनेक्षेत्रात लोकप्रिय असणं हे तमिळनाडूच्या राजकारणात यशस्वी होण्यासाठी पुरेसं नाही, असं विजय थलपतींच्या बाबतीत राजकीय विश्लेषक सांगतात. त्यांच्या मते फक्त लोकप्रियताच पुरेशी असती तर कमल हसनही यशस्वी झाले असते. एमजीआर तमिळ राजकारणात यशस्वी झाले कारण द्रविड चळवळीत त्यांची पाळंमुळं रुजली होती. थलपती यांची विचारसरणी स्पष्ट झाल्याशिवाय त्यांना इथल्या राजकारणात पाय रोवता येणार नाहीत. 

विजय थलपती तमिळ राजकारणात यशस्वी झाले तर ते अभिनेते एमजीआर म्हणजेच एम. जी. रामचंद्रन, अभिनेत्री जयललिता आणि पटकथा लेखक करुणानिधी यांचा वारसा पुढे चालवतील. हे तिघेही सिनेमाच्या व्यवसायात प्रचंड यश मिळाल्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणात शिरले आणि तिथेही ते तितकेच यशस्वी झाले. खरंतर तमिळनाडूच्या राजकारणाचा चेहरामोहरा देशातल्या राजकारणापेक्षा वेगळा ठरला तो या तिघांमुळे. सध्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे करुणानिधी हे वडील. स्टॅलिनही लोकप्रिय टीव्ही अभिनेते आहेत, तर त्यांचे पुत्र आणि युवक आणि क्रीडामंत्र उदयनिधीदेखील अभिनेते आहेत. 

हेही वाचा – बहरला फळभाजीचा मळा!

तमिळनाडूमधले प्रसिद्ध अभिनेते कमल हसन हे मक्कल निधी मैयन या पक्षाचे प्रमुख आहेत. द्रमुक आणि अण्णा द्रमुकला पर्याय म्हणून त्यांनी २०१८ मध्ये हा पक्ष सुरू केला असला तरी त्यांच्या या पक्षाला म्हणावं तेवढं यश मिळालं नाही. ‘कॅप्टन’ विजयकांत या अभिनेत्याने २००५ मध्ये देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम हा पक्ष काढला होता. सुपरस्टार रजनीकांत यांनी २०१७ मध्ये रजनी मक्कल मंदरम या पक्षाची घोषणा केली होती. पण २०२१ मध्ये त्यांनी हा पक्ष बरखास्त करत असल्याची घोषणा केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे सध्या तमिळनाडूच्या राजकारणातले पक्ष प्रबळ आहेत.  

या सगळ्या गदारोळात विजय थलपतींना तमिळनाडूच्या राजकारणात आपले पाय रोवता येतील का? या प्रश्नाचं उत्तर आत्ताच मिळणार नाही. कारण द्रमुक, अण्णा द्रमुक या दोघांचीही तमिळ राजकारणावर पकड आहेच, त्यात भाजपला तिथे शिरकाव करून घ्यायचा आहे. आजवर कर्नाटक वगळता भाजपला दक्षिणेकडच्या राजकारणात स्थान मिळवता आलेलं नाही. दक्षिणायन यशस्वी करण्यासाठी भाजपचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच विजय थलपतींना आपलं स्थान निर्माण करायचं आहे. आपण जाती- धर्म यांच्या भेदांपलीकडे जाऊ इच्छितो, भ्रष्टाचार निपटू इच्छितो हे त्यांनी त्यांच्या पक्षाचं धोरण म्हणून जाहीर केलं आहे, पण त्यांच्या पक्षात पलीकडे दुसरा कोणताच चेहरा नाही, ही त्यांच्या पक्षाची एक मर्यादा सांगितली जाते. शिवाय काहीसं लाजाळू, मितभाषी व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. अशी व्यक्ती राजकारणात कशी यशस्वी होईल, असा प्रश्न त्यांच्या बाबतीत उपस्थित केला जातो. असं असलं तरी विजय थलपती यांच्या हातात वय आहे. ते पन्नाशीचेदेखील नाहीत. त्यामुळे काळ जे शिकवेल ते शिकायला ते तयार असतील तर कोण जाणे, द्रविडींना कदाचित नवा नेताही मिळू शकेल. 

vaishali.chitnis@expressindia.com