‘मनोबोधा’च्या ८४व्या श्लोकात समर्थानी दोन रूपकं वापरली आहेत. एक रूपक आहे ते मस्तकी शिवलिंग धारण केलेल्या विठ्ठलाचं आणि दुसरं रूपक आहे ते मस्तकी चंद्रकोर धारण केलेल्या शिवाचं! ही दोन्ही रूपकं अर्थगर्भ आहेतच, पण या रूपकांपलीकडेही विचार केला तर नवनव्या अर्थछटा प्रकट होतात. हा श्लोक पुन्हा एकवार वाचू.. समर्थ म्हणतात :

विठोनें शिरीं वाहिला देवराणा।

Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…

तया अंतरीं ध्यास रे त्यासि नेणा।

निवाला स्वयें तापसी चंद्रमौळी।

जिवां सोडवी राम हा अंतकाळीं।। ८४।।

विठोने शिरी वाहिला देवराणा.. मनाच्या श्लोकांमधला विठ्ठलाचा हा पहिला उल्लेख आहे! रामदास पंढरपूरला गेले तेव्हा त्यांनी पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहून एक भावकाव्यच निर्माण केलं आणि विचारलं.. येथे का रे उभा श्रीरामा.. त्यांनी श्रीरामरूपातंच विठ्ठलाला पाहिलं.. पण इथं मात्र विठ्ठलानं मस्तकी जे शिवलिंग धारण केलं आहे त्याचाच उल्लेख आहे.. हे शिवलिंग का धारण केलं गेलं? तर पूर्वीच्या काळी हरिभक्त आणि हरभक्त अर्थात विष्णूभक्त आणि शिवभक्तांमध्ये फार टोकाचं शत्रुत्व होतं.. अगदी रक्तपातही घडे.. हरिहरांमधला हा भेद मिटवण्यासाठी विठ्ठलानंच थेट शिवांना मस्तकी धारण केलं होतं.. मनोबोधाच्या श्लोकांच्या चिंतनप्रवाहानुसार हा चरण सांगतो की भक्त जसजसा परमात्ममय होत जातो तसा परमात्माही भक्तमय होत जातो! भक्ताच्या अंत:करणात परमात्म्याचा ध्यास असतो तर परमात्म्याच्या अंत:करणात भक्ताचा ध्यास असतो! दोघांना एकमेकांचा ध्यास माहितही नसतो, पण प्रेम उसळत असते.. इथं पहिल्या चरणाची आणखी एक अर्थछटा अशी की भौतिक प्रपंचाचा पूर्ण विट आलेला हा जो भक्त आहे त्याच्या नसानसांतून तो देवराणा.. म्हणजे त्याची भक्तीच वाहात असते.. प्रवाहित होत असते! आता पुढचं रूपक आहे ते मस्तकी चंद्रकोर धारण करणाऱ्या शिवाचं! चंद्र म्हणजे मन.. भक्तानं आपल्या सर्व मनोभावना मस्तकी धारण केल्या असतात म्हणजे त्यांना सर्वोच्च मूल्य दिलं असतं असं नव्हे, तर आपल्या डोक्यातून त्या काढून टाकल्या असतात.. त्या डोक्यावर असतात, डोक्यात नसतात! मस्तकातून सर्व मनोभावना काढून टाकल्यानं हा भक्त निवाला असतो.. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात ना? सर्वधर्मान् परित्यज्ज मामेकं शरणं व्रज.. तर इथं वेगवेगळे धर्म त्यागून मला शरण ये, असं भगवंतांना सांगायचं नाही.. हे धर्म म्हणजे मनोधर्म.. मनाच्या सवयी, मनाच्या आवडी-निवडी या सर्व सोडून मला शरण ये.. तर मनोभावना, मनोधर्म, मनाची खळबळ ज्याला सोडून देता येते.. त्यातलं अडकणं ज्याला सोडून देता येतं तोच खऱ्या अर्थानं निमाला असतो.. त्याचंच अंत:करण खऱ्या अर्थानं स्थिर झालं असतं.. असा जो भक्त आहे त्याला अंतकाळची काळजीच नसते.. परमात्मभावात तो सदास्थित असतो आणि आपला अंतकाळही तो रामच साधेल, हे त्याला माहीत असतं.. अर्थात जीवनभर जो परमात्मभाव टिकून आहे तोच अंतकाळीही टिकेल, हे तो जाणून असतो.

तर परमात्ममय अशा भक्ताचं हे वर्णन समर्थ करतात ते आपण आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवावं, यासाठी आहे.. ध्येय मोठं बाळगलं, तर निदान चार पावलं अधिक चालून जाऊ, हा हेतू त्यामागे आहे.. त्यामुळे हा आदर्श, हे ध्येय बाळगायची प्रेरणा देत समर्थ मनोबोधाच्या पुढील म्हणजे ८५व्या श्लोकात साधकांना सांगतात..

भजा राम विश्राम योगेश्वरांचा।

जपू नेमिला नेम गौरीहराचा।

स्वयें नीववी तापसी चंद्रमौळी।

तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं।।