इनडिफिजॅटिबिलिटी.. शेडेनफ्रुएड.. माहूत.. बारुख्जी.. शेजरे. फॅण्टासिनी.. यांपकी माहूत हा सोडला तर अन्य कोणताही शब्द आपल्या ओळखीतला नाही. मग त्यांचा उच्चार आणि स्पेलिंग हे तर दूरच राहिले. मात्र, या सर्व शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ माहीत असलेल्या एका जोडगोळीने परीक्षकांना अक्षरश: अचंबित केले. इतके की, परीक्षकांनाच प्रश्न पडला की आता या स्पर्धकांना कोणत्या शब्दांचे स्पेलिंग विचारायचे! अखेरीस परीक्षकांनीच माघार घेत पुढील महिन्यात पुन्हा नव्याने स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आणि स्पध्रेला स्वल्पविराम दिला..
हे वृत्त आहे कुश शर्मा आणि सोफिया हॉफमन या अनुक्रमे १३ आणि ११ वष्रे वयाच्या विद्यार्थ्यांसंदर्भातील. अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये स्पेलिंगची स्पर्धा घेतली जाते. त्याला स्पेलिंग बी स्पर्धा असे म्हणतात. १५ वर्षांच्या आतील आणि नववीच्या अलीकडील विद्यार्थ्यांना या स्पध्रेत सहभागी होता येते. मिसौरी राज्यातील कन्सास शहरात परवाच झालेल्या या स्पध्रेत कुश आणि सोफिया या दोन विद्यार्थ्यांमधील सामना अनिर्णितावस्थेत राहिला. अखेरीस परीक्षकांनीच स्पर्धा तात्पुरती थांबवून पुढील महिन्यात पुन्हा दोघांना स्पध्रेसाठी बोलावले आहे.
सर्वात कठीण आणि बुद्धीचा कीस पाडणाऱ्या अशा या स्पध्रेत कुश शर्मा हा अनिवासी भारतीय विद्यार्थी अजिंक्य राहावा ही आपल्या दृष्टीने नक्कीच अभिमानाची बाब. इयत्ता सातवीत असलेला कुश कन्सास शहरातील फ्रण्टियर स्कूल ऑफ इनोव्हेशन या शाळेचा विद्यार्थी. सोफियाबरोबरचा सामना खरोखर खूप आव्हानात्मक होता. मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा हे सर्वच आव्हानात्मक होते. २५ स्पर्धकांपकी २३ स्पर्धक पहिल्या दहा फेऱ्यांतच माघारी परतले. मात्र, आम्ही अखेपर्यंत उत्तरे देत होतो. तब्बल चार तास अथक बोलल्यानंतर शिणवटा जाणवत होता, असे कुश सांगतो. वॉिशग्टनमधल्या स्पध्रेत जागा पटकावयची असेल तर याहून आणखी जास्त कष्ट घ्यावे लागतील याची जाणीव असल्याचे कुश आवर्जून सांगतो.
शाळेत दुसरीपासूनच कुशने इंग्रजीकडे अधिकाधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. अनेक स्पर्धाही त्याने जिंकल्या आहेत. पालकांबरोबरच शाळेतील शिक्षकही कुशला विविध स्पर्धासाठी उत्तेजन देत असतात.  मुख्य स्पध्रेसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे कुशने. सोफिया दोन वर्षांनी लहान असूनही तिच्याकडे शब्दभांडार खूप आहे, तिची स्पेिलग लक्षात ठेवण्याची आणि त्याचे अर्थ समजून सांगण्याची हातोटी विलक्षण असल्याचे कुश म्हणतो. पुढील महिन्यातील स्पध्रेत आपण नक्कीच बाजी मारू, असा विश्वास त्याला आहे. त्याला शुभेच्छा..