‘घरौंदा’ चित्रपटातील  ‘दो दिवाने शहर में..’ हे गाणे नक्श लायलपुरींचे! या चित्रपटातील सगळी गाणी खरे तर गुलजार यांची; पण एकमेव गाणे नक्श यांच्या वाटय़ाला आले आणि त्याचे त्यांनी सोने केले. त्या गाण्यातला नायक जसा या शहरात आपला ‘आशियाना’ वसवण्यासाठी धडपडत राहिला; तशीच काहीशी अवस्था इतकी वर्षे िहदी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून वावरलेल्या नक्श लायलपुरी यांची होती. उर्दूचा प्रभाव घेऊन आलेला हा गीतकार कायम व्यावसायिक िहदी चित्रपटांच्या चौकटीबाहेरच राहिला..

‘नक्श’ हे मूळचे पंजाबच्या लायलपूर प्रांतात (आज पाकिस्तानचा भाग) जन्मलेले जसवंत राय शर्मा. त्या काळी पंजाबातून आलेल्या अनेकांनी नशीब अजमावण्यासाठी मुंबापुरीची वाट धरली होती. त्यापैकी एक हे लायलपुरी. उर्दू शायरी ही त्यांची खासियत होती, ते ‘नज्म’ लिहीत राहिले. पण तिचा आंतरिक नाद समजून घेणाऱ्या दर्जेदार संगीतकारांबरोबर काम करण्याची फार कमी संधी त्यांना मिळाली. १९५२ साली त्यांनी गीतकार म्हणून िहदी चित्रपटसृष्टीत सुरुवात केली होती. पण त्यांना खऱ्या अर्थाने यशाची चाखायला मिळाली ती सत्तरच्या दशकात..

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
Who was Ramses II
विश्लेषण: गेल्या अनेक वर्षांपासूनचे कोडे आता उलगडणार? कोण होता रामसेस दुसरा? का आहे जगाला त्याचे आकर्षण?
Archaeological Survey of India
विश्लेषण: भारतीय संस्कृती संबंधित १८ स्मारके चक्क गायब! भारतीय पुरातत्त्व खातं याला किती जबाबदार?

‘मैं तो हर मोडम् पर तुझको दूंगा सदा..’, ‘न जाने क्या हुआ, जो तूने छू लिया’, ‘उल्फत में जमाने की हर रस्म को ठुकराओ’ ही त्यांची काही गाजलेली गाणी लोकांच्या लक्षात राहिली. मात्र ही गाणी ज्या चित्रपटांमधली होती, ते चांगल्या बॅनरचे नव्हते. त्यामुळे त्यांच्या गाण्यांना फार मानसन्मान मिळाला नाही. ‘मैं तो हर मोडम् पर..’ हे गाणे ‘चेतना’ चित्रपटातील होते. रेहाना सुलतान त्याची नायिका. किंवा ज्या एका चित्रपटातील नक्श यांची सर्वच गाणी गाजली, तो ‘कॉलगर्ल’! चित्रपटाच्या नावावरूनच त्याच्या आशयाची, दर्जाची कल्पना यावी. गीतकार म्हणून नक्श अशाच चित्रपटांमध्ये अडकले. पण चित्रपट सवंग, सुमार दर्जाचे आहेत म्हणून त्यांनी आपल्या गाण्यांमध्ये तडजोड केली नाही. उर्दू शायरी ओतप्रोत भरलेल्या त्यांच्या गाण्याचा दर्जा कधीच खाली आला नाही. ‘तुम्हारे लिए’ या चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली होती. या चित्रपटात संजीव कुमार आणि विद्या सिन्हासारखे मोठे कलाकार होते. पण हा चित्रपट चालला नाही, त्यामुळे लायलपुरी यांच्या गाण्यांनाही मार्केट मिळाले नाही.

उर्दूचे अभ्यासक असलेले ‘नक्श’ कधीच रूढार्थाने फिल्मी गीतकार होऊ शकले नाहीत. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही नक्श लायलापुरी यांनी आपली गीतांची शैली, दर्जा कधीच सोडला नाही की कधी तत्त्वांना मुरड घातली नाही. गीतकार-संगीतकारांच्या जोडय़ांचे चक्र भेदणेही त्यांना जमले नाही. काही काळ टपाल खात्यात काम करून त्यांनी आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला. नव्वदनंतर तर िहदी चित्रपटात ज्या प्रकारची गाणी लिहिली जाऊ लागली ते पाहून नक्श यांनी चित्रपट संगीत क्षेत्रातून निवृत्ती घेणे पसंत केले आणि दूरचित्रवाणीकडे आपला मोर्चा वळवला. सन २००५ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा संगीतकार नौशाद यांच्यासाठी ‘ताजमहल’ चित्रपट आणि खय्याम यांच्यासाठी ‘यात्रा’ या चित्रपटाची गाणी लिहिली. पण पुनरागमनाचा त्यांचा अनुभवही फारसा यशस्वी ठरला नाही. एक प्रतिभावंत असा हा गीतकार जणू आपल्या प्रतिभेमुळेच कीर्ती-सन्मानांपासून दूर राहिला. अखेर वयाच्या नव्वदीत त्यांचे निधन झाल्याची वार्ता रविवारी आली.