इराक युद्ध ते जागतिक ऊर्जा क्षेत्र, पर्यावरण असा मोठा आवाका असलेली पत्रकारिता करीतअसताना जनहिताचे अनेक प्रश्न मांडणाऱ्या अमेरिकेतील भारतीय वंशाच्या पत्रकारांपकी एक म्हणजे नीला बॅनर्जी. त्यांना नुकताच व्हाइट हाऊस करस्पाँडंट असोसिएशनचा प्रतिष्ठेचा एडगर पो पुरस्कार अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार अमेरिकी सहकाऱ्यांबरोबर पर्यावरण पत्रकारितेसाठी विभागून मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील पत्रकारिता ही वेगळ्या अभ्यासपूर्ण बातम्या देण्यामुळे आपल्या देशाच्या तुलनेत प्रगल्भ आहे. प्रसंगी मोठे धोके पत्करणाऱ्या पत्रकारांमुळे ती टिकाऊ आहे. सध्या नीला बॅनर्जी या इनसाइड क्लायमेट या पुलित्झर पुरस्कारप्राप्त संस्थेसाठी बातमीदारी करतात. स्वच्छ ऊर्जा, कार्बनमुळे होणारे प्रदूषण, अणुऊर्जा व पर्यावरण विज्ञान यांसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात काम करतानाच त्यांना कायदा व धोरणे यांचेही उत्तम ज्ञान आहे. इनासाइड क्लायमेट या संस्थेत येण्यापूर्वी त्यांनी ‘लॉस एंजल्स टाइम्स’मध्ये ऊर्जा व पर्यावरण विभागाच्या वॉिशग्टन येथील वार्ताहर म्हणून काम केले. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये असताना त्यांनी जागतिक ऊर्जा व त्या अनुषंगाने असलेली आव्हाने तसेच इराक युद्ध व इतर विषयांचे वार्ताकन केले. काही काळ त्या ‘दी वॉल स्ट्रीट जर्नल’च्या मॉस्कोतील प्रतिनिधीही होत्या. बॅनर्जी यांनी येल विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर पत्रकारितेचा पेशा स्वीकारला. अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी हवाप्रदूषणाचा संबंध हवामान बदलाशी जोडणाऱ्या वैज्ञानिकांना सतत दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, वैज्ञानिक पुराव्यात फेरफार करून त्यांना नाउमेद केले, पृथ्वीच्या पृष्ठीय तापमानात जे बदल झाले ते नसíगक कारणांनी झाले, त्याचा प्रदूषणाशी काही संबंध नाही असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पक्षाने केला. वसुंधरेच्या मारेकऱ्यांच्या विरोधात लढणाऱ्या वैज्ञानिकांच्या पाठीशी नीला बॅनर्जी खंबीरपणे उभ्या राहिल्या. १९७७ मध्ये एक्झॉन कॉर्पोरेशन या तेल कंपनीच्या वैज्ञानिकांनी जीवाश्म इंधनांमुळे पृथ्वीचे तापमान वाढत असल्याचा इशारा दिला होता, पण तो दाबून टाकीत कंपनीने हवामान बदल होत असल्याची बाबच नाकारली; पण नीला बॅनर्जी यांनी याबाबत वार्ताकन केल्याने त्या कंपनीला न्यायालयाने सगळी माहिती उघड करण्यास सांगितले. त्यामुळे या कंपनीने कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले होते. ‘एक्झॉन- दी रोड नॉट टेकन’ हे याच विषयावरचे पुस्तक त्यांनी जॉन एच. कुशमन यांच्यासमवेत लिहिले आहे. आपल्याकडे पर्यावरण, ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांत अशी जनहिताची कामगिरी करणारी पत्रकारिता अभावानेच दिसते.  नीला बॅनर्जी यांची सत्याला पाठबळ देणारी ही पत्रकारिता मानवी कल्याणाच्या रक्षणासाठी मोठे काम उभे करणारी आहे यात शंका नाही.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neela banerjee
First published on: 07-05-2016 at 03:31 IST