साहित्य:
पाव किलो ब्रोकोली बारीक चिरून घेणे, मिरची लसूण पेस्ट दोन टेबल स्पून, एक कांदा बारीक चिरून, मोझरेला चीझ १ टीस्पून, मिक्स हर्ब, चवीपुरते मीठ, अर्धा कप शिजवलेला बटाटा, एक कप ब्रेड क्रम्प्स, एक टेबल स्पून कॉर्नफ्लोअर, तळण्यासाठी तेल.

कृती:
गॅसवर फ्राईंग पॅनमध्ये थोडे तेल घालून कांदा, मिरची, लसूण परतून घ्या. त्यात ब्रोकोली घाला. पुन्हा परतून घ्या. हे सगळं थंड करून घ्या. मग त्यात उकडलेला बटाटा घाला. थोडे कॉर्नफ्लॉवर घालून एकजीव करा. मग त्याचे लहान लहान गोळे करून घ्या. त्यात प्रत्येकात चीझचा तुकडा घालून ब्रेड क्रम्प्समध्ये घोळून परत कॉर्नफ्लोअरमध्ये घोळून तळून घ्या.

चीझी कॉर्न ढोकळा

साहित्य:
अर्धा कप रवा, मक्याचे पीठ, एक कप उकडलेले मक्याचे दाणे. हे दाणे मिक्सरमधून जाडसर भरडून घ्या, एक कप दही, आलं-मिरची लसूण पेस्ट १ टेबलस्पून, जरुरीप्रमाणे पाणी, चवीप्रमाणे मीठ, अर्धा टी स्पून फ्रूट सॉल्ट.

कृती:
सर्व साहित्य नीट मिसळून घ्या. वाटल्यास पाणीसुद्धा घाला. फ्रूट सॉल्ट घालून इडली पात्रामध्ये किंवा ढोकळा पात्रामध्ये वाफवून घ्या. वाफवल्यावर १५ मिनिटांनी वडय़ा पाडून तेलाची फोडणी द्या.

बेक्ड पास्ता डिलाइट

साहित्य :
दोन टेबल स्पून बटर, बारीक चिरलेला एक कांदा, ठेचलेला अर्धा लसूण, एक टेबल स्पून मैदा, एक कप दूध, एक टीस्पून मिक्स हर्ब पावडर,

तीन टेबलस्पून मक्याचे दाणे, दोन टेबलस्पून अननस (टीनमधला) बारीक तुकडे करून घेणे, अर्धा ते एक कप पाणी, एक कप कुठलाही पास्ता, मीठ चवीप्रमाणे, एक टेबलस्पून जेलेपीनो, मिरचीचे तुकडे.

कृती :
प्रथम एका कढईमध्ये बटर टाकून त्यात कांदा परतून घ्या. यामध्ये लसूण आणि मैदा टाकून एकत्र चांगले मिसळून घ्या. त्यात एक कप दूध घालून थोडे गरम करून एकजीव होऊ द्या. त्यात लगेच हर्ब पावडर, वाफवलेले मक्याचे दाणे, अननसाचे तुकडे घालून चागंले एकजीव करा. या मिश्रणात पाणी, मीठ व उकडलेला पास्ता टाका. शेवटी त्यात जेलेपीनो मिरचीचे तुकडे टाकून ते हलवा. एका बेक डिशमध्ये ओतून त्यावर प्रोसेस्ड चीझ टाकून २५० अंश सेल्सिअसवर पाच ते सात मिनिटे बेक करा.

केळा कबाब

साहित्य :

तीन कच्ची केळी, एक बटाटा, दोन टीस्पून आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेल्या दोन-तीन मिरच्या, चार-पाच पुिदन्याची पानं, लिंबाचा रस,

अर्धा टीस्पून चाट मसाला, एक टीस्पून गरम मसाला, थोडय़ा शेवया.

कृती :
केळी व बटाटा उकडून घेऊन ते कुस्करून घ्या. एका कढईमध्ये तेल-जिऱ्याची फोडणी करा. कांदा परतून त्यात आलं-लसूण, मिरच्या टाकून परतून घ्या. थंड झाल्यावर केळी, बटाटा, इतर मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर त्याला पेढय़ाचा आकार देऊन शेवयामध्ये घालून गरम तेलात तळा. त्याला थोडा लालसरपणा येऊ द्या.
सीमा नाईक – response.lokprabha@expressindia.com