हे काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण तुम्ही याला हवं ते म्हणा! जुन्या गोष्टींवरचं प्रेम, १२ वर्षांपूर्वी अवघ्या देशानं अनुभवलेल्या त्या अविस्मरणीय अनुभवाचा हिस्सा होण्याची धडपड किंवा निव्वन जुन्य आठवणींमध्ये रमण्याचं कारण! यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विजेतेपदाला गवसणी घालण्याच्या दिशेनं टीम इंडिया वेगाने घोडदौड करत आहे. भारताच्या प्रत्येक सामन्यात साकार होणाऱ्या विजयागणिक प्रत्येक भारतीय चाहत्याची उत्सुकता अधिकाधिक ताणली जात आहे. १२ वर्षांपूर्वीचे तेच क्षण पुन्हा अनुभवण्याच्या या संधीची सर्व भारतीय क्रिकेट चाहते आतुरतेनं वाट पाहात आहेत. होय, हे तेच जादुई क्षण आहेत जेव्हा एम. एस. धोनीच्या १५ धुरंधरांनी भारतीय क्रिकेट इतिहासाला विश्वचषक विजयाची अनमोल भेट दिली होती!

त्या दिवशी आख्ख्या देशानं बेभान होऊन उत्सव साजरा केला होता. मोठमोठ्या आवाजात गाणी, पराकोटीच्या आनंदानं उत्साहित होऊन नाचणारे क्रिकेट चाहते, रस्त्यावर उतरून आपल्या क्रिकेटवीरांच्या शौर्याचा उत्सव साजरा करणारे तमाम भारतयी, गल्लोगल्ली डौलाने फडकणारा देशाचा तिरंगा आणि जवळपास देशाच्या प्रत्येक घरात भरून राहिलेला विजयाता उत्साह!

LSG fan video viral at Chepauk Stadium
CSK vs LSG : चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या ‘त्या’ चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, VIDEO होतोय व्हायरल
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
kl rahul
विजयाचे खाते उघडण्यास लखनऊ उत्सुक! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान

अंतिम सामन्यातील भारताचा तत्कालीन कर्णधार एम. एस. धोनी आणि गौतम गंभीर यांची अविस्मरणीय खेळी कोण विसरू शकेल? देशातल्या प्रत्येक क्रिकेट चाहत्यानं तो विजय जल्लोषात साजरा केला होता. २०११च्या विश्वविजयाच्या आठवणी फक्त सामन्याच्याच नाही, तर विजयोत्सवाच्या रंगात एकरूप झालेल्या आख्ख्या स्टेडियमच्या आणि स्टेडियमच्याही बाहेर त्या विजयात जणूकाही एकरूप झालेल्या आख्ख्या भारत देशाच्या आहेत!

भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात विश्वचषकाला एक वेगळं असं स्थान आहे याची एअरटेलला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळेच एअरटेलनं चाहत्यांच्या मनातील विश्वविजयाच्या त्याच अढळ स्थानाला मानाचा सॅल्यूट करण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेचा भाग म्हणून एअरटेलनं २०११मधल्या वर्ल्डकपसंदर्भातल्या तेव्हाच्या ट्वीट्सवर रिप्लाय केले आहेत. यातून आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३साठीच्या चाहत्यांच्या भावना २०११मधल्या त्याच भावनांशी एकरूप करण्याचा, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आपल्या संघाचा उत्साह वाढवण्याचा हा एक प्रयत्न आहे. २०११मध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ज्याप्रकारे आपल्या संघाचा उत्साह वाढवला, त्यापेक्षाही कितीतरी पटींनी जास्त उत्साह यंदा दिसून येतोय याचीच यानिमित्ताने खात्री पटेल हे निश्चित!

आहे की नाही ही एक भन्नाट कल्पना? आम्ही ते सर्व जुने ट्वीट्स पाहताना ही गोष्ट लक्षात आली की क्रिकेटसाठी असलेलं भारतीयांचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. अर्थात, ते व्यक्त करण्याच्या माध्यमांमध्ये तंत्रज्ञानामुळे, सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर बदल घडले, विकास झाला, आधुनिकता आली. पण अजूनही हे असं एक सेलिब्रेशन आहे, ज्यात खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पिरिट दिसून येतं. जे चाहत्यांना एकत्र जोडून ठेवतं.

आयसीसी वर्ल्डकपशी जगभरातल्या चाहत्यांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. हीच बाब ध्यानात घेऊन एअरटेलनं २०११ मधल्या त्या जुन्या ट्वीट्सवर केलेले रिप्लाय म्हणजे खऱ्या अर्थाने कालातीत असणाऱ्या क्रिकेटप्रेमाला दिलेली अनोखी मानवंदनाच आहे. त्या अविस्मरणीय आठवणी पुन्हा जागवण्याची ही त्यांची अनोखी पद्धत आहे. पण त्याचवेळी यातून लोकांना याचीही आठवण निश्चितच केली जातेय की आजपर्यंत कधीही झालं नाही, इतकं चीअरिंग यावेळी टीम इंडियासाठी देशवासीयांनी करायचं आहे!

क्रिकेटचाहत्यांचा उत्साह अनेक पटींनी वाढवायला एअरटेल 5G आहे ना!

एअरटेल 5G प्लसच्या अविरत नेटवर्कमुळे क्रिकेट कधी नव्हे इतकं उत्तमरीत्या सर्वदूर पोहोचू लागलं आहे. एअरटेल 5G मुळे ग्राहकांना काही सर्वोत्तम नेटवर्कपैकी एक ठरलेली एक अत्याधुनिक व वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध होऊ शकली आहे. यामुळे ग्राहकांना अत्युच्च दर्जाचा अनुभव मिळू लागला आहे. ग्राहकांना खऱ्या अर्थाने अल्ट्रा हाय डेफिनेशन व्हिडीओ (4K) स्ट्रीमिंगचा अनुभव घेता येत आहे.

एअरटेल 5G प्लस नेटवर्कवर मोठ्या प्रमाणावर डाटा ट्रान्स्फर शक्य आहे. पण असं असलं, तरी एअरटेलच्या नेटवर्कवर कधीही ताण येत नाही. याचाच अर्थ असा की आयसीसी वर्ल्डकप स्टेडियम्स, नगरं, शहरं आणि अगदी गावागावांमधूनही ग्राहकांना इंटरनेट नेटवर्कचा उत्तम अनुभव घेता येईल. यामुळे अधिक चांगला अपलोड आणि डाऊनलोड स्पीड ग्राहकांना अनुभवता येईल. याचाच दुसरा अर्थ असा, की ग्राहक वर्ल्डकपमधील सामने अगदी कधीही आणि अगदी कुठेही पाहू शकतात!

एअरटेल 5G सह #ShareYourCheer!

एअरटेल 5G प्लस देशातल्या क्रिकेटचाहत्यांना अशी एक संधी उपलब्ध करून देत आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या जुन्या चीअरिंगच्या आठवणी जागवता येतील. क्रिकेट चाहत्यांना त्यांचा आवडता असा भन्नाट क्रिकेट चीअरिंगचा प्रसंग #ShareYourCheer या हॅशटॅगसह एअरटेलच्या ऑनलाईन कॅम्पेनसोबत शेअर करायचा आहे. मग वाट कसली बघताय? आता वेळ आली आहे! तुम्ही तुमचे असे क्षण शेअर करा आणि टीम इंडियाचा उत्साह वाढवा!

IMG_7573

टीम इंडियालाही दाखवून द्या की तुम्ही त्यांना किती सपोर्ट करत आहात!