finolex pralhad short film premier tribute to pralhad chhabriya | Loksatta

फिनोलेक्सच्या ‘प्रल्हाद’ या पुरस्कार विजेत्या लघुपटाचा प्रीमियर – फिनोलेक्स ग्रुपचे संस्थापक श्री प्रल्हाद पी. छाब्रिया यांना श्रद्धांजली

प्रल्हाद, ही फिनोलेक्सच्या संस्थापकांच्या जीवनातील निर्णायक क्षण सांगणारी अशीच एक कथा आहे.

फिनोलेक्सच्या ‘प्रल्हाद’ या पुरस्कार विजेत्या लघुपटाचा प्रीमियर – फिनोलेक्स ग्रुपचे संस्थापक श्री प्रल्हाद पी. छाब्रिया यांना श्रद्धांजली
प्रल्हाद शॉर्ट फिल्मचा प्रिमियर

प्रल्हाद हा लघुपट म्हणजे एका 14 वर्षाच्या मुलाचा प्रेरणादायी प्रवास. ज्याने केवळ 10 रुपयांच्या सहाय्याने पहिले पाऊल टाकले आणि 10,000 कोटी रुपयांच्या कंपनीची निर्मिती केली. आपला दयाळू स्वभाव, उच्च विचार आणि संकल्प सिद्धीतून त्यांनी हे साध्य केले.

काही गोष्टी पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी एकदाच नाही तर पुन्हा-पुन्हा सांगणे आवश्यक आहे.प्रल्हाद, ही फिनोलेक्सच्या संस्थापकांच्या जीवनातील निर्णायक क्षण सांगणारी अशीच एक कथा आहे. उद्योगाच्या खडतर प्रवासात त्यांच्यासाठी ही कथा म्हणजे दीपस्तंभ आहे. दयाळू स्वभाव, उच्च आदर्श मूल्यांची जपणूक करुन निर्णय घेतल्यावर तो किती प्रभावी असतो, याचा प्रत्यय यातून येतो. हा लघुपट फिनोलेक्सच्या पायाभूत मूल्यांची मांडणी करतो आणि सुरुवातीच्या काळातील प्रत्येक भारतीय उद्योजकाच्या यशाची महती सांगतो. यात काही आश्चर्य वाटायला नको की, या कथेने याआधीच आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपट महोत्सवात 22 पुरस्कार जिंकले आहेत.

1945 मध्ये घडलेली, ही कथा आहे एका 14 वर्षाच्या मुलाची, जो त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अमृतसरमधील नोकरी सोडून फक्त रु. 10 त्याच्या शर्टच्या खिशात असताना, कमावण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतो. मुंबईला जाणारया ट्रेनमध्ये, तो प्रवाशांनी खचाखच भरलेल्या डब्यात बसतो; ज्यामध्ये भारताच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करणारे अनेकजण असतात. त्यातील प्रत्येकजण आशेने भरलेली बॅग घेऊन या प्रवासाला निघालेला असतो. काही जण, प्रल्हाद सारखे, काम करतात आणि पैसे कमवतात आणि घरी पाठवतात. काही जण त्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी प्रवास करतात. आणि काही असेच प्रवास करत आहेत कारण त्यांच्याकडे इतर कुठेही जाण्याचा मार्ग नाही.

ट्रेन मुंबईच्या दिशेने धावत असते, धुरांच्या रेषांतून वाटेत लागणाऱ्या छोट्या शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये थांबत असताना, तरुण प्रल्हाद त्याच्या सहप्रवाशांशी संवाद साधतो. आपल्या स्मितहास्याने तसेच लाघवी बोलण्यातून तो ट्रेनमधील सर्वांनाच आकर्षित करतो. हेच विचार आणि सहजता त्याच्या पाठीशी उभी राहते, त्याचवेळी तो जेव्हा शर्टचा खिसा तब्बल पंधराव्यांदा तपासतो, तेव्हा त्याला कळते की त्याची 10 रुपयाची नोट गहाळ झाली आहे.

या कथेचा गाभाच हा आहे की, तो ती दहा रुपयांची नोट कशी परत मिळवतो, तेही चांगुलपणाने वागून, इतरांचा आदर राखून, नैतिकता आणि करुणेची भावना प्रगट करुन. ही घटना त्याच्या लाडक्या फिनोलेक्स ग्रुपमध्ये मूर्त स्वरूप असलेल्या भारतीय उत्पादनाच्या अग्रस्थानी या तरुण मुलाच्या उर्वरित प्रवासासाठी एक मजबूत पायाच ठरते. चांगल्या दर्जाची उत्पादने तयार करणे. शेतकरी, डीलर्स, विक्रेते, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांशी मजबूत आणि चिरस्थायी संबंध निर्माण करण्यासाठी आदराचे आणि चांगुलपणाने व्यवसाय करणे. 10 रुपयांच्या नोटेपासून सुरू झालेला हा प्रवास श्री प्रल्हाद पी छाब्रिया यांचे निधन झाल्यानंतर 10000 कोटी रुपयांची कंपनी (बाजार मुल्य 2016) बनवण्यापर्यंत चालूच राहिला. त्यातून त्यांनी एक विनम्र असा वारसा मागे ठेवला जो आजही फिनोलेक्स ग्रुपमध्ये त्याच्या मुलांसह आणि नातवंडांसह जोपासला जात आहे.

दिवंगत श्री प्रल्हाद पी. छाब्रिया यांचे आत्मचरित्र ‘देअर इज नो सच थिंग अ‍ॅझ सेल्फ-मेड मॅन’ मधील सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने श्बँग मोशन पिक्चर्सने तयार केला आहे. पूर्वीचा काळ सुंदरपणे टिपून तो काळ जिवंत करणारी ही फिल्म आहे. प्रल्हाद पी. छाब्रियांची भूमिका ऋत्विक साहोरे (‘लाखों में एक’ फेम) यांनी साकारली आहे. इतर कलाकारांमध्ये आबिद शमीम, अन्नपूर्णा सोनी आणि चिनामय दास यांचा समावेश आहे. प्राग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, लंडन फिल्म अँड टेलिव्हिजन फेस्टिव्हल आणि मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधील पुरस्कारांसह 22 जागतिक आणि भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये समीक्षकांची प्रशंसा मिळवल्यानंतर, हा चित्रपट YouTube चॅनल, Humara movie वर – की जो एक प्रतिष्ठित मंच आहे, आणि ज्यावर स्वतंत्र भारतीय सर्वोत्तम सिनेमांची नोंद आहे, अशा ठिकाणी प्रीमियर शो होईल.

या चित्रपटावर भाष्य करताना, दिवंगत श्री प्रल्हाद छाब्रिया यांचे पुत्र श्री. प्रकाश पी छाब्रिया म्हणाले, “आम्हाला आशा आहे की हा लघुपट आजपासून भारतीय उद्योजक जगतात, तत्त्वांसह सुरुवात करणाऱ्या सर्व उद्योजकांना प्रेरणा देईल; ज्या मध्ये लोकांना समजून घेण्याच्या आणि दृढ भावनेच्या दृष्टिकोणाचा तपशीलवार परिपूर्ण मिलाफ आहे. आमचे संस्थापक स्वर्गीय श्री प्रल्हाद पी छाब्रिया हे याचा पुरावा आहेत. ही कथा त्या मूल्यांचे अतिशय प्रेमळपणे वर्णन करते.

चित्रपटाच्या संकल्पनेवर, चित्रपटाचे निर्माते आणि श्बँगचे संस्थापक हर्षिल कारिया म्हणाले, “आम्ही सतत शक्तिशाली कथा शोधत असतो ज्यांना सांगण्याची गरज असते, मग ते आम्ही ज्या ब्रँडसोबत काम करतो किंवा मानवतेसाठी काम करणारयांच्या सोबत का नाही? फिनोलेक्स ग्रुपचे संस्थापक श्री प्रल्हाद पी छाब्रिया यांच्या जीवनातून श्बांग मोशन पिक्चर्सला प्रेरणा मिळाली. त्यांच्या जीवनावर फिचर फिल्मही बनवता येईल याची खात्री असली तरी, “प्रल्हाद” हा लघुपट म्हणून ही एक घटना जगासोबत शेअर करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांनी तयार केलेली कंपनी भारतीय उद्योजकांसाठी प्रेरणादायी आणि अभ्यास करण्यासारखी आहे”

1981 पासून, फिनोलेक्सने पीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग्जमध्ये पूर्णत: एकात्मिक प्रस्तावासह ग्रामीण आणि शहरी ग्राहकांना दर्जेदार उत्पादने प्रदान करून भारताच्या कृषी क्षेत्रात तसेच प्लंबिंग आणि स्वच्छता क्षेत्रात देशात मोठे योगदान दिले आहे. प्रल्हाद पी. छाब्रिया यांचे उत्कृष्ट अभियांत्रिकीवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यातील संपूर्ण लोकांशी नातेसंबंध निर्माण करण्याची त्यांची क्षमता आणि त्यांची मजबूत पकड यामुळे फिनोलेक्स भारतीय उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित नावांपैकी एक बनले. 900 हून अधिक डीलर्स आणि 21,000 रिटेल टच पॉइंट्ससह, दिवंगत संस्थापकांनी फिनोलेक्सच्या उत्पादनांची हमी घेणारया, ग्राहकांना सेवा देण्यासाठी एक परिवार तयार केला, जो आज चेतनादायी आणि समृद्ध आहे. कंपनीला समृद्ध करण्यासाठी सततची गुंतवणूक मूल्य शृंखला आणि तांत्रिक सामर्थ्य वाढवणे कंपनीला भविष्यात वर्चस्व ठेवण्यासाठी तयार ठेवते आणि भारतीय अर्थव्यवस्थेत आपले योगदान चालू ठेवते.

स्वर्गीय श्री प्रल्हाद छाब्रिया हे त्यांच्या काळातील सर्वात उल्लेखनीय परोपकारी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी मुकुल माधव फाउंडेशनची स्थापना केली. होप फाउंडेशन आणि संशोधन केंद्राची निर्मिती केली. या माध्यमांतून तसेच सामाजिक कल्याणातून वंचितांसाठी वैद्यकीय सहाय्य, शिक्षण मिळते. त्यांनी रत्नागिरी येथे मुकुल माधव विद्यालय आणि फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी आणि हिंजवडी, पुणे, येथे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी संस्था स्थापन केल्या. श्री छाब्रिया नेहमी म्हणत, “ज्यांना औपचारिक शिक्षणाचा लाभ कधीच मिळाला नाही, तो लाभ आता शेकडो पात्र आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो, ही विडंबना निःसंदिग्ध आहे. माझे योगदान या तरुणांसाठी आणि देशासाठी कायमस्वरूपी काहीतरी देईल याचे मला खूप समाधान आहे.”

मराठीतील सर्व प्रायोजित ( Sponsored ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
या सणासुदीच्या हंगामात घरी नेण्यासाठी निवडा टाटा मोटर्सची कार!

संबंधित बातम्या

“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”, म्हणत उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा; म्हणाले, “आझाद मैदानात…!”
“तुम्ही जन्मत:च हिंस्र विकृत आहात की…” सुमीत राघवनला नेटकऱ्याचा प्रश्न; अभिनेत्याच्या आरे कारशेडवरील ‘त्या’ वादग्रस्त ट्वीटनंतर रंगले ट्विटर वॉर
“हे फक्त गडकरीच करू शकतात, तो काँग्रेसचा नेता असूनही…”, नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य
“सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हाला…”, संजय राऊतांचे मुख्यमंत्री बोम्मईंना प्रत्युत्तर
खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
FIFA World Cup 2022: आजपासून सुपर-१६ लढतींचा थरार, पाहा सर्व सामन्यांचे वेळापत्रक
रणवीर सिंगने सर्वांसमोर सिद्धार्थ जाधवला धक्का दिला अन्… पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ
“सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हाला…”, संजय राऊतांचे मुख्यमंत्री बोम्मईंना प्रत्युत्तर
“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”, म्हणत रायगडावरून उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा; म्हणाले, “आझाद मैदानात…!”
मेट्रोचा पहिला टप्पा मार्चअखेरपर्यंत पूर्ण; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती