१३ जुलै २०२२: दुसऱ्या महायुद्धानंतर कोरोनाव्हायरसचा उद्रेक हे जगातील सर्वात वाईट आणि आव्हानात्मक संकट होते. या महामारीने आपली विज्ञानावरील विश्वासाची चाचणी घेतली. कोरोना काळात कोणतीही विशिष्ट लस किंवा उपचार उपलब्ध नसताना, एक मटेरियल ज्याने शांतपणे योगदान दिले आणि साथीच्या रोगाशी लढा दिला तो म्हणजे “पॉलिमर”! होय, पॉलिमरने वैयक्तिक संरक्षण कीट (PPE Kits) आणि इतर अनेक वस्तू जसे की फेस मास्क, हॅन्ड ग्लोव्हस्, संरक्षणात्मक गॉगल्स, श्वसन यंत्र (respirators), फेस शील्ड, वैद्यकीय गाऊन, डॉक्टर आणि परिचारिकांचे संरक्षण करणारे ऍप्रन यासारख्या साहित्यांची अलौकिक सामग्री म्हणून या काळात योगदान दिले. थर्मल थर्मोमीटर, इतर वैद्यकीय उपकरणे आणि अगदी व्हेंटिलेटरच्या निर्मितीमध्ये सुद्धा पॉलिमरचा वापर महत्वाचा ठरतो.

पॉलिमर आपल्या दैनंदिन जीवनात नकळत खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. पॉलिमरपासून बनवलेले उत्पादन आपण नेहमीच वापरत असतो. उदा. सिंथेटिक फायबरपासून बनवलेले कपडे, टूथ ब्रश, पॉलिथिलीन कप, फायबरग्लास, पिशव्या, पेंट्स, इपॉक्सी ग्लू, पॉलीयुरेथेन फोम कुशन, नॉनस्टिक कुकवेअर, खेळणी, पॅकेजिंग, फर्निचर, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक साधने, ऑटोमोबाईल स्पेअर पार्टस, टायर, पीव्हीसी पाईप, कृत्रिम हार्ट व्हॉल्व्ह, कृत्रिम हाडांचे सांधे, कृत्रिम रक्त धमन्या, कृत्रिम हृदय, कॉन्टॅक्ट लेन्स, विमान, पाणबुडी, अंतराळ यान, बुलेट प्रूफ ग्लास, उपग्रह, रोबोट, लॅपटॉप/ मोबाईल/ एलसीडी टीव्ही स्क्रीन अशी अनेक अंतहीन उदाहरणे दिली जाऊ शकतात जिथे पॉलिमर चा वापर फार मोट्या प्रमाणात होतो.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
Railway Bharti 2024
Railway Bharti 2024 : रेल्वेमध्ये टेक्निशियनच्या ९००० पेक्षा अधिक पदासाठी होणार भरती, आजच करा अर्ज
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल

पॉलिमर उद्योगात व पॉलिमरच्या वापरात गेल्या सहा दशकांमध्ये नेत्रदीपक वाढ झाली आहे. पॉलिमर उद्योग पॅकेजिंग, इमारत आणि बांधकाम, कृषी, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस, कोटिंग, कंपोझिट, रबर, कापड, ऍडहेसीव्ह आणि ऑटोमोबाईल यासह अनेक उद्योगांना सेवा देते. पेट्रोकेमिकल्समध्ये पॉलिमरचा वाटा सुमारे ७०% आहे. हा रासायनिक उद्योगाचा एक भाग आहे आणि खनिज तेल हे पॉलिमरचे प्रमुख घटक असल्याने पेट्रोकेमिकल उद्योगाचाही एक भाग आहे. चक्रवाढ वार्षिक वाढ दरांत (CAGR) पॉलिमर क्षेत्रामध्ये 18% ची वाढ नोंदवली गेली आहे तर क्षमतांमध्ये 26% ची वाढ झाली आहे. पॉलिमर क्षेत्रात रोजगाराचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.

पॉलिमर सायन्स ही रसायनशास्त्रातून उदयास येणारी एक महत्वाची विद्याशाखा आहे. दैनंदिन जीवनात आणि उद्योगात पॉलिमरचे असंख्य उपयोग आहेत. गेल्या काही दशकांमध्ये पॉलिमरने आपली जीवनशैली पूर्णपणे बदलून टाकली आहे. कोणतीही तांत्रिक प्रगती जसे की कॉम्पुटर, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, ऑटोमोबाईल, एरोस्पेस, व इतर पायाभूत सुविधा पॉलिमरशिवाय शक्य नाहीत.

अभ्यासक्रमा विषयी:

M. Sc. इंडस्ट्रियल पॉलिमर केमिस्ट्री – हा दोन वर्षांचा, पोस्ट-ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रम उद्योगांच्या सध्याच्या गरजांनुसार तयार करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात प्लास्टिक, पेंट्स आणि कोटिंग्स, रबर्स आणि इलास्टोमर्स, अॅडेसिव्ह, फायबर आणि संमिश्र तंत्रज्ञान (Composite technology) यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम अद्वितीय आहे कारण यात 70% विज्ञान आणि 30% अभियांत्रिकीचे संयोजन आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार आणि कुशल बनवणे हाच आहे. पॉलिमर प्रक्रिया, चाचणी आणि संमिश्र उत्पादन इत्यादी प्रशिक्षण अभ्यासक्रमात उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त, विद्यार्थ्याला त्यांच्या अंतिम सत्रात 6 महिन्यांसाठी कठोर रिसर्च किंवा इंडस्ट्री इंटर्नशिप करावी लागते. पात्र विद्यार्थ्यांना सशुल्क (stipend) इंटर्नशिपची संधी देखील मिळू शकते. हा अभ्यासक्रम आंतरविद्याशाखीय, कौशल्य विकासावर आधारित आणि विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या (70:30) मिश्रणासह व्यापार / रोजगार / नोकरी देणारा आहे.

रोजगाराची व्याप्ती आणि क्षेत्रे:

तांत्रिक विकासामुळे भासणारी नवीन पॉलिमर मटेरिअलची आवश्यकता आणि त्याच्या नवनवीन वापरामुळे संशोधक, उद्योजक, औद्योगिक कर्मचारी आणि शिक्षणतज्ज्ञ यांसारख्या विद्वान मनुष्यबळाची गरज वाढली आहे. पॉलिमरचा वापर आगामी काळातही वाढतच राहणार आहे. पॉलिमर विज्ञान आपल्याला भविष्यातील आव्हानांना तोंड देण्याची एक अनोखी संधी प्रदान करते. रासायनिक उद्योगांमध्ये गुंतलेले 30% शास्त्रज्ञ पॉलिमरच्या क्षेत्रात काम करतात हे फार कमी ज्ञात असलेले सत्य आहे.

हा अभ्यासक्रम पॉलिमर, रबर आणि इलास्टोमर्स, पॉलिमर संश्लेषण, पेंट्स, टेक्सटाइल फायबर, कंपोझिट, नॅनोटेक्नॉलॉजी, पॉलिमर प्रक्रिया, कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर इत्यादीसारख्या विविध क्षेत्रातील उद्योगांची गरज पूर्ण करेल. रोजगाराच्या क्षेत्रांमध्ये बऱ्याच पॉलिमर-उत्पादक रासायनिक कंपन्यांचा समावेश आहे. पॉलिमर प्रक्रिया किंवा फॅब्रिकेशन कंपन्या, संशोधन आणि उत्पादन विकास केंद्रे, प्रक्रिया विकास केंद्रे, पेंट उद्योग, रबर आणि इलास्टोमर उत्पादन कंपन्या, टायर उत्पादन उद्योग, ऍडहेसिव्ह उत्पादन उद्योग, रेझिन उत्पादन युनिट्स, पेट्रोकेमिकल आणि पॉलिमर विज्ञान संशोधन उद्योग इत्यादींचा समावेश होतो. विद्यार्थ्यांना सुरुवातीला ग्रॅजुएट ट्रेनी इंजिनिअर, केमिस्ट, एक्सीक्युटीव्ह, सेल्स अँड मार्केटिंग, टेक्निकल सपोर्ट, अनॅलिस्ट, मार्केट रिसर्च, रिसर्च अँड डेव्हलोपमेंट, क्वालिटी कंट्रोल इ. क्षेत्रात / पदावर काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. या पदव्युत्तरांसाठी लहान किंवा मध्यम स्तरावरील पेंट, रबर, ऍडहेसिव्ह, रेसीन उत्पादन, पॉलिमर प्रोसेसिंग युनिट्सची उद्योजकता हा आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, बिर्ला, एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स, पीडिलाईट इंडस्ट्रीज, जैन इर्रीगेशन, डाऊ केमिकल्स, सॉलवे, सेबीक इंडस्ट्रीज, किंग्फा, एविएन्ट, नीलकमल, सुप्रीम इंडस्ट्रीज, एम आर एफ, अपोलो टायर्स अशा कितीतरी राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांना करियरच्या संधी उपलब्ध आहेत.

रसायनशास्त्राच्या इतर शाखांच्या तुलनेत पॉलिमर रसायनशास्त्र हि शाखा पॉलिमर चा वेगवेगळ्या क्षेत्रात वाढता वापर, रोजगाराच्या असंख्य संधी, कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम, वाढते औद्योगिकीकरण, इंडस्ट्री इंटर्नशिप व या शाखेची राष्ट्रीय पातळीवर मर्यादित उपलब्धता या कारणास्तव करिअर करण्यासाठी अत्यंत योग्य ठरेल यात शंका नाही.

पात्रता:

बीएससी रसायनशास्त्र किंवा TYBSc मधील स्पेशलायझेशनचा एक विषय म्हणून रसायनशास्त्र (किमान ५०% गुणांसह) प्रवेशासाठी पात्र आहेत. निवड BSc मध्ये मिळालेल्या गुणांवर आणि वैयक्तिक मुलाखतीवर आधारित आहे.

प्रा. डॉ. वसी शेख
पॉलिमर शाखा प्रमुख
प्रोफेसर, एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे</p>