जो रूटच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचे २३० धावांचे लक्ष्य गाठले आणि स्पर्धेतील आव्हान कायम राखले. या सामन्याबाबत रुट म्हणाला की, ‘‘खरे सांगायचे तर या सामन्यात आमच्याकडून सर्वोत्तम कामगिरी पाहायाला मिळाली नाही, तरीदेखील आम्ही २३० धावांचे आव्हान पूर्ण करू शकलो. त्यामुळे हा विजय आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. या विजयामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे.’’ (Full Coverage|| Fixtures||Photos)

तो पुढे म्हणाला की, ‘‘ ट्वेन्टी-२० हे झटपट क्रिकेट आहे, असे आपण म्हणतो. सारे काही वेगाने सुरू असते. पण यामध्ये जेवढे शांत राहाल, तेवढाच फायदा तुम्हाला होतो. या सामन्यात आमच्यापुढे २३० धावांचे मोठे आव्हान होते, पण तरीदेखील संघामध्ये दडपणाचे वातावरण नव्हते. सारे खेळाडू शांतपणे सामन्याच्या विचार करत होते. माझ्या मते या सामन्यातील ही सर्वात चांगली गोष्ट होती.’’

गेलच्या फलंदाजीने विश्वास दिला.

वानखेडेच्या खेळपट्टीवर कितीही धावांचा पाठलाग होऊ शकतो, हे वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलने दाखवून दिले. त्यामुळे या सामन्यात मोठय़ा धावसंख्येचा पाठलाग करत असताना मी त्याची खेळी डोळ्यापुढे ठेवली होती. त्याच्या फलंदाजीने मला विश्वास दिला, असे रूट म्हणाला.