अफगाणिस्तानची आव्हान टिकवण्यासाठी धडपड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वानखेडेवरील पहिल्या सामन्यात २२९ धावांचे डोंगराएवढे आव्हान उभे करूनही इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागलेल्या दक्षिण आफ्रिकेला रविवारी विजयाची संधी आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्यांचा सामना पहिल्यांदाच मुख्य फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या दुबळ्या अफगाणिस्तानशी होणार आहे. कागदावर तुलनेने कमकुवत वाटणाऱ्या अफगाणिस्तानला नमवून पुन्हा विजयपथावर परतण्याची आफ्रिकेला ़संधी आहे. मात्र, सातत्यपूर्ण खेळ करून इथपर्यंत मजल मारणाऱ्या अफगाणिस्तानकडून चमत्काराची अपेक्षा ठेवायलाही हरकत नाही. (Full Coverage|| Fixtures||Photos)

साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने माजी विश्वविजेत्या श्रीलंकेला विजयासाठी कडवी टक्कर दिली होती. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला असून आफ्रिकेसमोर ते कडवे आव्हान उभे करू शकतात. दुसरीकडे २२९ धावांचे आव्हान उभे करूनही आफ्रिकेला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवातून धडा घेत विजयपथावर परतण्याचा आणि अफगाणिस्तानवर विजय मिळवून अंतिम चार संघांच्या शर्यतीत कायम राखण्यासाठी आफ्रिका प्रयत्नशील राहिल.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात २८ चेंडूंत ५४ धावांची खेळी करणारा आणि एक बळी टिपणारा आफ्रिकेचा जे.पी. डुमिनी म्हणाला, ‘‘पराभव मागे सोडून अफगाणिसतानविरुद्धच्या लढतीतवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. अधिक अवांतर धावा दिल्यामुळे आमचा पराभव झाला. त्यावर मेहनत घ्यायला हवी. फलंदाजीच्या दृष्टीने आम्ही सकारात्मक आहोत, परंतु गोलंदाजीत सुधारणेला वाव आहे.’’

सामना  क्र. र०

द. आफ्रिका वि. अफगाणिस्तान (गट पहिला)

  •  स्थळ :़़ वानखेडे स्टेडियम, मुंबई</li>
  • वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्

संघ

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), डेव्हिड मिलर, क्विंटन डी’कॉक, हशिम अमला, जे पी डय़ुमिनी, ए बी डी’व्हिलियर्स, इम्रान ताहिर, ख्रिस मॉरीस, आरोन फँगिसो, कागिसो रबाडा, रिली रोसोव, डेल स्टेन आणि डेव्हिड विस.

अफगाणिस्तान : असघर स्टॅनिकझाई (कर्णधार), मोहम्मद शाहजाद, नूर अली झार्दान, उस्मान घानी, मोहम्मद नबी, करिम सादीक, शाफिकउल्लाह शाफिक, रशिद खान, आमीर हम्जा, दवलत झार्दान, शापूर झार्दान, गुल्बदीन नायब, समिउल्लाह शेनवारी, नजीबुल्लाह झार्दान, हमीद हसन.

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africa vs afghanistan icc t20 world cup
First published on: 20-03-2016 at 00:46 IST