ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवत वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० महिला विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वेस्ट इंडिजला १४९ धावांचे आवाहन दिले होते.
विश्वविजेपदाची हॅट्ट्रिक साजरी केल्यानंतर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा महिला संघ चौथ्यांदा विश्वचषकाला गवसणी घालेल असे वाटत होते. मात्र, वेस्ट इंडिजच्या संघाने त्यांचे स्वप्न हे पूर्ण होऊ दिले नाही. सलामीवीर विलानी (५२) आणि लानिंग (५२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारीत वीस षटकात पाच बाद १४८ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून डॉटीनने दोन तर, मॅथ्यूज आणि अनिसा मोहम्मदचे प्रत्येकी एक गडी बाद केला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2016 रोजी प्रकाशित
वेस्ट इंडिजच्या महिला संघाने जिंकला ट्वेन्टी २० वर्ल्डकप
ऑस्ट्रेलियाचा महिला संघ चौथ्यांदा विश्वचषकाला गवसणी घालेल असे वाटत होते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 03-04-2016 at 17:43 IST
मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World t20 final west indies womens team beat australia