Xiaomi सब-ब्रँड पोकोने भारतीय बाजारपेठेत चार वर्षे पूर्ण केली आहेत. सप्टेंबर सुरू होताच, भारतात पोकोचे पाचवे वर्ष सुरू झाले आहे आणि कंपनी आपले पाचवे वर्ष POCO M5 स्मार्टफोनसह सुरू करणार आहे. Poco M5 स्मार्टफोन भारतात ५ सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. कंपनीने POCO M5 चे १०,००० ते १३,००० रुपयांच्या बजेटमधील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन म्हणून वर्णन केले आहे. POCO M5 लाँच Poco M5 पाच सप्टेंबर रोजी टेक प्लॅटफॉर्मवर पदार्पण करेल. हे एक जागतिक लाँच असेल ज्यासह POCO M5 देखील भारतीय बाजारात लाँच केला जाईल. ५ सप्टेंबर रोजी, Poco M5 लाँच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५.३० वाजता सुरू होईल. कंपनी Poco M5 ला “२०२२ मधील १०-१३k किंमत विभागातील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन” या शीर्षकासह वर्णन केले आहे. म्हणजेच Poco M5 हा या बजेटमधील सर्वात शक्तिशाली मोबाइल फोन असू शकतो. ( हे ही वाचा: Redmi 11 Prime 5G फोन भारतात ६ सप्टेंबरला होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही..) POCO M5 चे तपशील पाच सप्टेंबर रोजी लाँच होणारा Poco M5 हा ४जी स्मार्टफोन असल्याचे सांगितले जात आहे जो MediaTek Helio G99 चिपसेटवर लाँच केला जाईल. आतापर्यंत फक्त Infinix Note 12 Pro हा चिपसेट भारतात आला आहे आणि याशिवाय Vivo V25e बद्दल असे सांगितले जात आहे की यात MediaTek Helio G99 देखील असेल. POCO M5 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता, मिळालेल्या माहितीनुसार हा मोबाईल फोन ६.५८ इंच फुलएचडी + एलसीडी डिस्प्लेवर लाँच केला जाईल जो ९०hz रिफ्रेश रेटवर काम करेल. दुसरीकडे, Poco M5 मध्ये Android 12 आधारित MIUI 13 आवृत्ती पाहिली जाऊ शकते. Poco M5 फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सपोर्ट करेल. सध्या या कॅमेऱ्याची मेगापिक्सेल पॉवर समोर आलेली नाही. दुसरीकडे, पॉवर बॅकअपसाठी, POCO M5 मध्ये ३३वोल्ट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh बॅटरी दिली जाऊ शकते. हा फोन भारतात ६जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज वर लाँच केला जाईल अशी अपेक्षा आहे, ज्याची किंमत १३,००० रुपयांपेक्षा कमी असेल.