scorecardresearch

5G ला सपोर्ट करणारे स्वस्त मोबाईल कोणते? नवीन फोन घेण्याआधी ‘या’ गोष्टी तपासून पहा

Amazon व Flipkart सारख्या वेबसाईट्सवर स्वातंत्र्य दिन विशेष अनेक सेल सुरु आहेत.

5G ला सपोर्ट करणारे स्वस्त मोबाईल कोणते? नवीन फोन घेण्याआधी ‘या’ गोष्टी तपासून पहा

भारतात लवकरच 5G सेवा प्रत्यक्षात येणार आहे. सात दिवस रंगलेल्या चढाओढीच्या लिलावानंतर ५जी स्पेक्ट्रमची विक्री पूर्ण झाली आहे. जिओ, एअरटेल आणि वीआय टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांच्या 5G बँडमध्ये स्पेक्ट्रम घेतलेले असून येत्या महिन्यात या तीन कंपनीचे युजर्स हाय स्पीड 5G वापरू शकतील. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वीच्या नेटवर्क अपडेट प्रमाणेच, तुमचा फोन (किंवा टॅबलेट किंवा डेटा कार्ड) 5G अंतर्गत विशिष्ट बँड किंवा मोबाइल नेटवर्कशी कनेक्ट होण्यास सक्षम असावा. त्यामुळे, तुमचा सध्याचा फोन आधीच असा दावा करत नसल्यास तुम्हाला 5G ला सपोर्ट करणारा नवीन फोन खरेदी करावा लागेल. सध्या Amazon व Flipkart सारख्या वेबसाईट्सवर स्वातंत्र्य दिन विशेष अनेक सेल सुरु आहेत त्यामुळे आपणही जर नवीन फोन घेणार असाल तर फोनमध्ये कोणते महत्त्वाचे घटक असल्याची खात्री करून घ्यायला हवी हे आपण पाहणार आहोत..

प्रत्येक फोन मध्ये 5G सेवा काम कारणात नाहीत. गेल्या काही वर्षांत लॉन्च झालेल्या अनेक फोन मध्ये खर्च वाचवण्यासाठी आणि किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी 5G समर्थन वगळले आहे.जसे की Xiaomi चा Redmi Note 11 Pro फोन (किंमत ₹18,999 पासून सुरु) तसेच सर्वात Nokia C21 Plus (₹10,299 पुढे) हे फोन जर आपण घेणार असाल तर त्यात 5G सेवा काम करणार नाहीत.

4999 मध्ये घरी आणा OnePlus चा लेटेस्ट मोबाईल; Amazon Great Freedom Festival Sale च्या Deal विषयी जाणून घ्या

तुमच्या स्मार्टफोनमध्ये खरोखरच 5G आहे की नाही हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, तुम्ही Gsmarena या साईटवर मोबाईलचे नेटवर्क क्षमता पाहू शकाल. ही जगातील स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांचा सर्वात मोठा डेटाबेस असणारी साईट आहे. सर्च बारमध्ये तुमचे स्मार्टफोन मॉडेल एंटर करा आणि त्याची वैशिष्ट्ये स्क्रोल करा. नेटवर्क फील्ड अंतर्गत, 5G बँड नमूद आहेत की नाही ते पहा.

5G असणारे सर्वात स्वस्त फोन कोणते?

सर्वात परवडणाऱ्या 5G फोनमध्ये Samsung Galaxy M13 5G (किंमत सुमारे ₹13,999 आहे; एक 5G समर्थन नसलेला प्रकार देखील आहे), Vivo T1 5G (किंमत सुमारे ₹15,990) आणि OnePlus Nord CE 2 Lite 5G (सुमारे ₹19,999) हे सर्वात स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत

तुमच्या सध्याच्या फोन मध्ये 5G चालणार का?

तुमचा स्मार्टफोन 5G ला सपोर्ट करतो की नाही हे सांगण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे फोन सेटिंग्ज तपासा. अँड्रॉइड मध्ये सेटिंग्ज >> नेटवर्क आणि इंटरनेट >> मोबाइल नेटवर्क >> पसंतीचे नेटवर्क प्रकार वर टॅप करा. तुम्ही 2G, 3G, 4G आणि 5G सारख्या सर्व मोबाइल नेटवर्कला समर्थन असल्याची खात्री करून घ्या.

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्ही या तीनही मोबाईल सेवा प्रदाते 5G स्पेक्ट्रम च्या स्पर्धेत होते त्यात जिओने आघाडी घेतली आहे, त्यानंतर एअरटेल आणि व्ही यांनी सुद्धा स्पेक्ट्रम खरेदी केले आहे. अदानी डेटा नेटवर्क्स, या शर्यतीतील चौथा खेळाडू, हे घेतलेल्या स्पेक्ट्रमसह 5G वर खाजगी नेटवर्क सुरू करणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 5g supporting new mobiles at cheap price here is how to check if your phone supports high speed 5g svs

ताज्या बातम्या