Pros and Cons of eSIM and Physical SIM: Google ने २०१७ मध्ये जगातील पहिला स्मार्टफोन लॉन्च केला होता. ज्यामध्ये E- SIm ची सुविधा देण्यात आली होती. Google Pixel २ नंतर Apple ने २०१८ मध्ये iPhone XS या सिरीजमध्ये E- SIm ची सुविधा दिली. भारतामध्ये याचा वापर करणारे खूप कमी लोक आहेत. आज आपण आपले सिम कार्ड हे फिजिकल कार्डवरून ई-सिम कार्डवर स्विच करावे की नाही. याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.

भारतात सध्या Jio, Airtel आणि VI ग्राहकांना ई-सिमची सुविधा देतात. तुम्ही घरी बसल्या-बसल्या फिजिकल सिम कार्डला ई-सिममध्ये कन्व्हर्ट करू शकता. परंतु जर तुम्हाला ई-सिमला फिजिकल सिम कार्डमध्ये कन्व्हर्ट करायचे असेल तर तुम्हाला जवळच्या टेलिकॉम ऑपरेटरच्या स्टोअरमधे जावे लागणार आहे.

हेही वाचा : Airtel च्या ग्राहकांना मोठा धक्का! रिचार्ज प्लॅन महागणार, अध्यक्ष मित्तल म्हणाले “ही दरवाढ…”

जर का तुमचा आयफोन कुठे हरवला असेल तर तो तुम्ही ई-सिमच्या मदतीने शोधू शकता. तुमचा आयफोन बंद असला तरी तुम्ही तुमचा आयफोन find my iPhone द्वारे शोधू शकता. याचे कारण जर तुम्ही ई-सिम सुरु केले असेल तर तुमचा फोन ओपन झाल्याशिवाय ते बंद करता येत नाही. याच महत्वाच्या कारणामुळे अनेकांनी आयफोनमध्ये ई-सिम वापरण्यास सुरुवात केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही एका फोनवरून दुसऱ्या फोनमध्ये ई-सिमने डेटा ट्रान्सफर केल्यास भारतामध्ये या प्रक्रियेला २ तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. Apple ने आपल्या नवीन मॉडेलसाठी iOS १६ मध्ये वेगाने डेटा ट्रान्सफर करण्याची सुविधा दिली आहे पण ती सर्व्हिस भारतात चालत नाही. दुसरीकडे जर तुम्हाला फिजिकल सिम कार्ड एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर घ्यायचे असेल तर हे काम काही सेकंदातच होते.