Ai tool that predict heart failure : अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हार्ट फेल होऊन अनेकांचा जीव गेला आहे. मात्र, इस्राइलच्या संशोधकांनी तयार केलेल्या आर्टिफिशयल तंत्रज्ञानाने हार्ट फेलपासून होणारी जीवितहानी टाळण्यास मदत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रायलमधील संशोधकांनी एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल तयार केले आहे. हे टूल ईसीजी चाचण्यांचे विश्लेषण करते आणि काही आठवड्यांपूर्वीच ८० टक्के अचूकतेसह हार्ट फेल होण्याचा अंदाज लावते. हृदयरोग हे जगभरात मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. डब्ल्यूएचओच्या मते, दरवर्षी १७.९ दशलक्ष लोकांचा हृदयरोगामुळे मृत्यू होतो. हे तंत्रज्ञान हृदयरोगामुळे होणारी हाणी टाळण्यास मदत करू शकते.

(Instagram account उघडत नाहीये? ‘Hack’तर झाले नाही ना?खाते परत मिळवण्यासाठी तातडीने करा ‘हा’ उपाय)

टाइम्स ऑफ इस्राइलनुसार, नवीन तंत्रज्ञान सध्या मायोसिटिस किंवा स्नायूंमध्ये सूज असलेल्या रुग्णांसाठी वापरले जात आहे. हे आजार हृदय निकामी होण्याचा धोका वाढवतात. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स मॉडेलमध्ये २००० ते २०२० दरम्यान मायोसिटिसने ग्रस्त ८९ रुग्णांचा वैद्यकीय रेकॉर्ड आणि ईसीजी स्कॅन टाकून त्यास अपडेट करण्यात आले होते. त्यानंतर अल्गोरिदमने ईसीजीमध्ये सूक्ष्म रचना तयार केली जी हृदय निकामी होण्याच्या वाढीव शक्यतांशी संबंधित होती.

द आऊटलेशी बोलताना रॅमबॅम हेल्थकेअर कॅम्पसचे डॉ. शहर शेली ज्यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले त्यांनी या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. हे टूल त्यांच्यासाठी अद्वितीय असलेल्या हृदयाच्या नमुन्यांचे विश्लेषण करते आणि सध्या शक्य आहे त्याही पूर्वी शोध घेऊ शकते. अल्गोरिदमने यशस्वीरित्या मायोसिटिस रुग्णांच्या नमुन्यातील ८० टक्के हृदयविकाराच्या प्रकरणांचा यशस्वीपणे अंदाज लावला आहे, असे डॉ. शेली यांनी सांगितले.

(आता ‘Motorola’च्या या 10 स्मार्टफोन्सनाही मिळणार Android 13, यादीत तुमचा फोन आहे का? चेक करा)

आम्ही एआय मॉडेलच्या माध्यमातून ईसीजी चाचण्या चालवत आहोत. डॉक्टर सामान्यपणे शोधू शकत नाहीत असा तपशील त्याला दिसतो आणि नंतर कोणाला हृदय निकामी होण्याचा धोका आहे याचा अंदाज तो लावतो, अशी माहिती डॉ. शेली यांनी दिली.

हा आभ्यास डॉ. शेली आणि अमेरिकेतील मेयो क्लिनिक मेडिकल सेंटर येथील कार्डिओलॉजी विभागाच्या संशोधकांनी केला. हे नवीन तंत्रज्ञान रुग्णालयामध्ये तैनात केले गेले नसले तरी या मॉडेलच्या वापराने रुग्णांची वैद्यकीय स्थिती बिघडण्याआधीच प्रारंभिक टप्प्यावर उपचारांची तरतूद करणे शक्य होईल, असे डॉ. शेली यांचे मत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ai tool that predict heart failure developed by researchers in israel ssb
First published on: 17-12-2022 at 14:08 IST