एअरटेल ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. रिलायन्स जिओच्या आगमनानंतर एअरटेलला त्यांच्या रिचार्ज पॅकच्या किमती कमी कराव्या लागल्या आणि कंपनीने परवडणाऱ्या किमतीत डेटा आणि कॉल रिचार्ज पॅक देण्यास सुरूवात केली. जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल किंवा तुम्हाला एअरटेल सिम सक्रिय ठेवायचे असेल पण तुम्हाला डेटाची गरज नसेल, तर तुम्ही एअरटेलचा १,७९९ रुपयांचा प्लान रिचार्ज करू शकता. एअरटेलच्या १,७९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल सर्व काही जाणून घेऊया…

एअरटेलचा १,७९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलच्या १,७९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्रीपेड पॅकमध्ये ग्राहकांना २४ जीबी डेटा दिला जातो. तुम्हाला तुमचे सिम कार्ड सक्रिय ठेवायचे असेल आणि अनलिमिटेड कॉल्सची सुविधा हवी असेल, तर हा रिचार्ज प्लॅन परफेक्ट आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्सची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच, ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय प्लॅनमध्ये ३६०० एसएमएस मोफत देण्यात आले आहेत.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
should i file income tax
विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?

आणखी वाचा : iPhone 14 Pro Feature: तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये आयफोन 14 चे हे ५ फीचर्स आधीपासूनच आहेत

एअरटेलच्या या प्रीपेड पॅकमध्ये इतरही अनेक फायदे उपलब्ध आहेत. यामध्ये ३ महिन्यांसाठी Apollo 24|7 Circle ची सुविधा, Fastag रिचार्जवर १०० रुपये कॅशबॅक, मोफत HelloTunes आणि Wynk Music मोफत यांचा समावेश आहे.

आणखी वाचा : Vivo V25 5G First Impressions: रंग बदलणाऱ्या फोनची पहिली झलक, पाहा काय आहे खास ?

तुम्ही रिलायन्स जिओशी तुलना केल्यास, जिओकडे २५०० रुपयांपेक्षा जास्त वार्षिक वैधता असलेल्या सर्व प्लॅन आहेत. रिलायन्स जिओचा २,५४५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन असून त्याची वैधता ३३६ दिवस आहे. तसंच २,८७९ रुपयांचा प्लॅन ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. पण रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज अनुक्रमे १.५ जीबी आणि २ जीबी डेटा मिळतो. या व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड कॉल आणि १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत.

Jio च्या हे दोन्ही प्लॅन्स JioTV, JioSecurity, JioCloud आणि JioCinema चे मोफत सबस्क्रिप्शन देतात.