एअरटेलकडे ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किमतीत अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. कॉम्बो प्लॅन एअरटेल ग्राहकांसाठी १ GB, २ GB, २.५ GB, ३ GB डेटा प्रतिदिन आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह उपलब्ध आहेत. जर तुम्हाला प्रीपेड प्लॅन हवा असेल जो दीर्घकाळ टिकेल आणि वारंवार रिचार्ज करण्याची काळजी करण्याची गरज नाही. मग एअरटेलचा २,९९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बेस्ट आहे. या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता ३६५ दिवसांची आहे आणि यात बंपर डेटासह अनलिमिटेड कॉल्स मिळतात. एअरटेलच्या २,९९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल सर्व काही जाणून घेऊयात…

Airtel 2999 rupees plan
एअरटेलच्या २,९९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता ३६५ दिवसांची म्हणजेच १ वर्षाची आहे. एअरटेलच्या या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण ७३० हाय-स्पीड डेटा खर्च केला जाऊ शकतो. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Central Bureau of Investigation Bharti various vacant posts of Consultants job location is Mumbai
CBI Bharti 2024 : सल्लागार पदासाठी सीबीआयमध्ये पदभरती; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न

आणखी वाचा : मेडिकल ग्रेड देणारी जगातील पहिली भन्नाट स्मार्टवॉच भारतात लाँच, पाहा काय आहे खास?

याशिवाय, एअरटेलच्या या १ वर्षाच्या वैधतेच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेज कॉल्सची सुविधा देखील आहे. म्हणजेच ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय देशभरात लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा लाभ घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएसचीही सुविधा आहे.

याशिवाय, एअरटेलच्या २,९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये Apollo 24|7 सर्कल सुविधा ३ महिन्यांसाठी उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये Fastag वर १०० कॅशबॅक, मोफत HelloTunes आणि Wynk Music मोफत.

याशिवाय एअरटेलचा ३,३५९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील आहे. या प्लॅनची ​​वैधता देखील ३६५ दिवसांची आहे. यात अनलिमिटेड कॉल्स, एसएमएस सारख्या सुविधा आहेत. याशिवाय या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज २.५ जीबी डेटा दिला जातो. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे.

आणखी वाचा : आता स्मार्टफोनऐवजी साबण मिळणार नाही! Flipkart ने आणले हे खास फिचर

Reliance Jio 299 rupees plan
एअरटेलचा हा प्लॅन जिओच्या २,९९९ रुपयांच्या प्लॅनला टक्कर देतो. जिओच्या प्लॅनमध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंगचीही सुविधा आहे.