सध्या अनेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे किंवा कंपनीची पुनर्रचना करणे अशा अनेक कारणांमुळे कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. Amazon , मायक्रोसॉफ्ट, Apple अशा अनेक दिग्गज कंपन्यांनी कपात केली आहे. काही कंपन्यांनी दोन वेळा कपात केली आहे. Amazon पुन्हा एकदा कपात करत आपल्या फार्मसी विभागातील अनेक कमर्चाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Amazon फार्मसी विभागातील कर्मचाऱ्यांना गुलाबी स्लिप देण्यात आली होती. Amazon चे प्रवक्ते ब्रॅड ग्लासर यांनी याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, ”अनेक व्यवसायांप्रमाणे आम्ही नेहमी गुणवत्ता आणि कार्यक्षमता या दोन्हीसाठी आमच्या प्रक्रियांमध्ये नेहमी सुधारणा करत असतो. तसेच ग्राहकांना चांगला अनुभव कसा देता येईल हे पाहत आहोत.” या बाबतचे वृत्त cnbc ने दिले आहे.

हेही वाचा : boAt चे संस्थापक अमन गुप्ता यांनी फ्रान्स दौऱ्याबाबत केले विधान; म्हणाले, “आता माझ्यासारख्या…”

सेमाफोरच्या अहवालात असे दिसून आले आहे की अ‍ॅमेझॉनने ८० कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. ही कर्मचारी कपात तेव्हा झाली आहे जेव्हा कंपनीने नुकतीच आपल्या २९ वर्षांच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी कपात केली आहे. कंपनीने गेल्या वर्षी आणि या वर्षाच्या सुरूवातीच्या अनेक महिन्यांमध्ये १८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तर मार्च महिन्यात अतिरिक्त ९ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाईल अशी घोषणा केली. अ‍ॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी हे संपूर्ण कंपनीच्या खर्चात आक्रमकपणे कपात करत आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कमर्चारी कपातीमध्ये अ‍ॅमेझॉनचा आरोग्य-सेवा व्यवसायांवर परिणाम झाला. कंपनीच्या फार्मसी, डिजिटल हेल्थ टूल्स आणि हॅलो फिटनेस बँड युनिटमधील काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. CNBC ने यापूर्वी रिपोर्ट दिला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : Poco ने केली Airtel शी पार्टनरशिप; केवळ ५,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या

अ‍ॅमेझॉन कंपनीने आरोग्य-सेवा मार्केट क्रॅक करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. कंपनीने २०२० मध्ये स्वतःची ऑनलाईन फार्मसी सुरू केली. ही सेवा २०१८ मध्ये पिलपॅकच्या संपादनातून जन्माला आली. Amazon ने Amazon Care नावाची टेलिहेल्थ सेवा सुरू केली, नंतर बंद केली.