Tech Layoffs: जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम जगातील नोकऱ्यांवर झाला आहे. अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात केली आहे. एका बाजूने नोकऱ्यांची संख्या कमी होत असतानाच कर्मचारी कपातीचा वेग दुपटीने वाढला आहे. गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple, Amazon अशा आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. मेटा,डिस्ने या कंपन्यांनी दुसऱ्या फेरीतील कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. आता यामध्ये आणखी एका दिग्गज कंपनीचा समावेश होणार आहे. Amazon कंपनीसुद्धा आपल्या दुसऱ्या फेरीतील कर्मचारी कपात करणार आहे.

Amazon कंपनीने या आधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आता दुसऱ्या फेरीमध्ये विविध विभागांमधील तब्बल ९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कर्मचारी कपात Amazon Web Services, People, Experience, Advertising आणि Tswitch या विभागांमध्ये करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Tech Layoff: आर्थिक मंदीचा मोठा फटका! ‘या’ दिग्गज टेक कंपनीमध्ये पुन्हा एकदा ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांची होणार कपात

याआधी नोव्हेंबर २०२२ मध्ये Amazon कंपनीने आपल्या विविध विभागांमधून सुमारे १८,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. या कपातीमुळे ग्रेड १ ते ग्रेड ७ स्तरातील सर्वच कर्मचारी प्रभावित झाले आहेत. Amazon व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमध्ये येणाऱ्या समस्या ओळखण्यास सांगितले होते. कंपनीचे जगभरात १.५ दशलक्ष कर्मचारी आहेत. कंपनीच्या इतिहासामधील ही पाचवी सर्वात मोठी कर्मचारी कपात असणार आहे.

कंपनीचे सीईओ अँडी जस्सी म्हणाले की, अर्थव्यवस्थेमधील आव्हानात्मक परिस्थिती कायम आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष कठीण बनले आहे. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात आम्ही मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली आहे. कंपनीसाठी खर्च कमी करणे खूप महत्वाचे असल्याचे सांगत ३० नोव्हेंबरला जस्सी यांनी NYT डीलबुक समिटमध्ये कर्मचारी कपातीचा बचाव केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : Tech Layoffs: ‘Disney’ मध्ये दुसऱ्यांदा होणार तब्बल ४ हजार कर्मचाऱ्यांची कपात; CEO म्हणाले…

गेल्याच आठवड्यात फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटानेसुद्धा १०,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. मेटाने पहिल्या फेरीमध्ये ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.