काही दिवसांपूर्वीच Amazon चा प्राइम डे सेल संपला. या सेलमध्ये अनेक प्रॉडक्ट्सवर भरघोस डिस्काउंट खरेदीदारांना मिळाला. प्राइम डे सेल संपताच काही दिवसांतच ई-कॉमर्स दिग्गज आणखी एका सेलसह पुन्हा येत आहे. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अ‍ॅमेझॉन ५ ते ९ ऑगस्ट दरम्यान, Great Freedom Festival sale (ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल सेल) घेऊन येणार आहे. तथापि हा सेल प्राइम मेंबर्ससाठी हा सेल २४ तास आधीच सुरु होईल.

Amazon च्या या पाच दिवसांच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्ससह विविध प्रॉडक्ट्सवर चांगल्या डिल्स आणि डिस्काउंट देणार आहे. ऑफरमध्ये SBI बँकेचे क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या खरेदीदारांना १० टक्के झटपट डिस्काउंट मिळणार आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली iPhone 15 ची किंमत, iPhone १४ पेक्षा आहे ‘इतका’ महाग

Amazon च्या लिस्टनुसार, ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल सेलदरम्यान iPhone 14 वर मोठा डिस्काउंट मिळेल. याशिवाय वनप्लस नॉर्ड ३, सॅमसंग गॅलॅक्सी M14 5G, रिअलमी नाझरो ६० प्रो आणि अन्य फोन्स देखील सेलदरम्यान चांगल्या किंमतीमध्ये उपलब्ध असणार आहेत. आगामी रेडमी १२ ५जी देखील ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल सेल दरम्यान खरेदीसाठी उपलब्ध असणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच या ५ ते ९ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या सेलमध्ये स्मार्टफोन्स व्यतिरिक्त कंपनी लॅपटॉप आणि अ‍ॅक्सेसरीजवर काही उत्तम ऑफर असणार आहेत.त्यामुळे खरेदीदार HP 15s ३८,९९० रुपयांना उपलब्ध होऊ शकतो. तसेच Dell Vostro 3420 च्या किंमतीमध्ये देखील कपात केली जाऊ शकते व त्याची ४८,९९० रुपयांमध्ये किरकोळ विक्री होईल. याशिवाय बजेट स्मार्टवॉच, TWS, Android, टॅबलेट आणि पॉवर बॅंक्स सारख्या प्रॉडक्ट्सवर या ग्रेट फ्रिडम फेस्टिवल सेल २०२३ दरम्यान सावलीतच्या दरात उपलब्ध असणार आहेत.