Amazon prime Gaming launched india: अमेझॉन इंडियाने भारतात Amazon Prime Gaming लाँच केले आहे जे अमेझॉन प्राइम सब्सक्राइबर्सना लेटेस्ट आणि ट्रेंडिंग गेम्स खेळू देते. प्राइम सब्सक्राइबर्सना हे गेस्म अमेझॉनच्या अधिकृत संकेतस्थळावरून अ‍ॅक्सेस करता येतील. युजर्स फ्रीमध्ये विंडोज पीसीवर हे गेम्स डाऊनलोड करू शकतात.

लाँचच्या निमित्ताने कंपनीने अमेझॉन गेम अ‍ॅपच्या माध्यमातून ब्रदर्स: अ टेल ऑफ टू सन्स, द अमेझिंग अमेरिकन सर्कस, डोअर्स: पॅराडॉक्स आणि इतर गेम्स उपलब्ध केले आहेत. अमेझॉन गेम अ‍ॅप सध्या विडोज प्लाटफॉर्मसाठी उपलब्ध आहे.

मॉर्डन एएए टाइटल्स असलेल्या गेम्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, अमेझॉन कॉल ऑफ ड्युटी: वॉरझोन २.० आणि मॉडर्न वॉरफेअर २, डेस्टिनी २, फिफा २०२३, रोग कंपनी आणि इतर गेम्ससाठी इन गेम कंटेंट ऑफर करत आहे.

(अरे वा! आता फोटोमधील हवी ती वस्तू शोधता येईल, ‘असे’ वापरा गुगलचे Multisearch Feature)

अमेझॉन प्राइम गेमिंगवर तुमचा दावा असलेले सर्व गेम्स कायमस्वरुपी तुम्ही ठेवू शकाल. त्याचप्रमाणे, काही गेम्स आणि बोनसेसवर दावा करण्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी गेम्स स्टोअर्स जसे, एपिक गेम्स स्टोअर, बंजी, अ‍ॅक्टिव्हिजन किंवा रॉकस्टार गेम्समध्ये लॉगिन करावे लागेल. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, इन गेम कंटेट जसे, कॉल ऑफ ड्युटीमधील शोडाऊन बंडल, मेडन ३ मधील झिरो चील अल्टिमेट पॅक आणि फीफा २३ वर प्राइम गेमिंग पॅकचा वापर करण्यासाठी तुम्हाला हे गेम्स स्वतंत्रपणे खरेदी करणे आवश्यक आहे. प्राइम गेमिंगमधील हे इन गेम कंटेंट स्पेशल वेपन्स, फिचर्स आणि नवीन कॅपेबिलिटीज अनलॉक करतील.

प्राइम गेमिंगमध्ये जवळपास सर्व ट्रेंडिग एएए टाइटल्स जसे, जीटीए: व्ही ऑनलाइन, रेड डेड ऑनलाइन, पबजी, डेथलूप, बॅटलफिल्ड २०४२ आणि इतर गेम्समध्ये इन गेम कंटेंट असल्याचे दिसून येते.

(Christmas Tech Deals : टॉप ब्रांड्सचे Laptop, Smartphones आणि Headphones या गॅजेट्सवर मोठी सूट, कॅशबॅकपण मिळतंय)

अमेझॉन प्राइम गेमिंगची किंमत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेझॉन प्राइम गेमिंग हे प्राइम सब्सक्रिप्शनचा भाग आहे. तुम्ही आधीच प्राइम सब्सक्राइबर असाल तर तुम्ही भारतात प्राइम गेमिंग मोफत वापरू शकता. इतर लोक १७९ रुपयांचा अमेझॉन प्राइम मासिक सब्सक्रिप्शन प्लान, ४५९ रुपयांचा त्रैमासिक सब्सक्रिप्शन प्लान आणि १ हजार ४९९ रुपयांचा वार्षिक सब्सक्रिप्शन प्लान वापरू शकतात.