केवळ देशातच नव्हे तर जगात दिवाळी थाटामाटात साजरी होत आहे. जगातील दिग्गज व्यक्तिमत्वांकडून हा सण उत्साहात साजरा केला जात आहे. काल अमेरिकेच राष्ट्रपती जो बिडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांनी व्हाईटहाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. दोघांनीही सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जगातील नामांकित कंपन्यांच्या सीईओंनी देखील या सणाचा आनंद घेतला. अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

टिम कुक यांनी अशा दिल्या शुभेच्छा

अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी ट्विटरवर फोटो शेअर करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळीला प्रकाशाचा उत्सव का म्हटल्या जाते? याचे उत्तर या फोटोमधून मिळते. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा, असे टिम कुक यांनी पोस्टमध्ये लिहिले. तसेच त्यांनी फोटो काढणाऱ्याचे नाव दिले आहे. अपेक्षा मेकर यांनी हा फोटो काढला आहे.

(जीमेलचे ‘हे’ फीचर वापरा, अनावश्यक ईमेल्स आपोआप होतील डिलिट, स्टोअरेज स्पेसही वाचेल)

विशेष म्हणजे, शेअर केलेला फोटो हा आयफोनमधून काढण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून कुक हे आयफोनवरून काढलेला फोटो शेअर करून दिवाळी शुभेच्छा देत आहेत. यंदाही त्यांनी तसेच केले. ट्विटमध्ये त्यांनी फोट कोणी काढला याची माहिती दिली. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी त्यांनी ज्या आयफोनमधून हा फोटो काढण्यात आला, त्या मॉडेलचा उल्लेख केलेला नाही. केवळ आयफोन इतके लिहिले आहे.
अपेक्षा मेकर या मुंबईतील ‘द हाऊस ऑफ पिक्सेल्स’ या कंपनीच्या सह संस्थापक आहेत. आयफोनवरून त्यांनी काढलेल्या छायाचित्रांसाठी त्या प्रसिद्ध आहेत.

सुंदर पिचाई यांनी अशी केली दिवाळी साजरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही ट्विटरवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यात त्यांनी भारत पाकिस्तान संघादरम्यान झालेल्या सामान्याचा उल्लेख केला. पाकिस्तान आणि भारतीय संघादरम्यान मेलबर्न येथे टी २० वर्ल्डकप सामना घडला होता. यात भारताने पाकिस्तानवर जोरदार विजय मिळवला होता. शेवटचे तीन ओव्हर खूप रोमांचक होते. विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली होती. सामन्याचे शेवटचे तीन ओव्हर पुन्हा पाहून आपण दिवाळी साजरी केल्याचे सुंदर पिचाई यांनी ट्विटमधून सांगितले.