Apple iPad Pro Launch : अॅपलने नुकत्याच M4 चिपसेट असणाऱ्या आयपॅड प्रोची घोषणा केली आहे. टेक जायंटचा हा सर्वांत वेगवान आणि अत्यंत प्रगत टॅबलेट ११ आणि १३ इंच अशा दोन आकारांत उपलब्ध असणार आहे. ११ इंच आयपॉड प्रोची जाडी केवळ ५.१ एमएम इतकी आहे; तर १३ इंचांचा आयपॉड प्रो हा केवळ ५.३ एमएम इतक्या कमी जाडीचा आहे. त्यामुळे हे कंपनीचे आतापर्यंतचे सर्वांत स्लिम उत्पादन आहे, असे कंपनी म्हणते.

अॅपल कंपनीनुसार, हे नवेकोरे आयपॅड प्रो एम४ चिपसेट, सेकंड जनरेशनच्या ३ एनएम प्रोसेसरवर आधारित आहे. तसेच यामध्ये नेक्स्ट जनरेशनच्या एमएल ॲक्सिलरेटर्ससह, ४ परफॉर्मन्स कोर आणि ६ एफिशियन्सी कोर असल्याचे समजते. हे उत्पादन १६ कोर न्युरल इंजिनसह येत असून, ते व्हिडीओच्या बॅकग्राउंडमधील गोष्टी वेगळ्या करण्यासारख्या AI कार्यक्षमतांना मदत करण्यास समर्थ आहे. त्यात १०-कोर CPU सह १०-कोर GPU बसवला असल्यानं कंपनीचा दावा आहे की, हे उत्पादन अॅपल एम२ च्या तुलनेत चौपट कार्यक्षम आहे.

हेही वाचा : स्कॅम कॉल करणाऱ्यांना तुमचा नंबर कसा मिळतो? स्वतःच्या सुरक्षेसाठी ‘ही’ माहिती जाणून घ्या…

एम२ च्या तुलनेत एम४ हे अर्धी पॉवर वापरूनदेखील एकसमान काम करू शकत असल्याचे अॅपल कंपनीचे म्हणणे आहे. प्रथमच आयपॅडमध्ये एम४ चिप डायनॅमिक कॅशिंग आणि हार्डवेअर-बॅक्ड रे ट्रेसिंगसह येत असल्याचे समजते.

नवीन आयपॅड प्रो मॉडेल्स इन-हाऊस विकसित डिस्प्ले तंत्रज्ञानासह येते; ज्याला ‘टँडम OLED’ अशी टर्म वापरली जाते. ‘टँडम OLED’ म्हणजेच अल्ट्रा रेटिना XDR डिस्प्ले. या उत्पादनाचा स्क्रीन ब्राइटनेस हा SDR व HDR या दोन्हींसाठी १००० nits असून, कलाम ब्राइटनेस १६००nits पर्यंत जात असल्याने या आयपॅड प्रोचा वापर दिवसाढवळ्या, भरउन्हातही अगदी सहजपणे करता येऊ शकतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, टँडम OLED तंत्रज्ञानाच्या मदतीने, पिक्सेलसह रंग आणि ल्युमिनन्सवर ‘सब-मिलिसेकंद’ नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. परिणामी फोटो आणि व्हिडीओ नेहमीपेक्षा अधिक सुंदर आणि स्पष्ट दिसतात.

इतकेच नाही, तर अॅपलने आयपॅड प्रोमधील कॅमेरा सिस्टीमदेखील अपडेट केल्याचे समजते. आयपॉड प्रोमध्ये १२ एमपी रिअर कॅमेरा बसविलेला असून, तो कमी प्रकाशातदेखील HDR फोटो आणि व्हिडीओ काढण्यास सक्षम आहे. तसेच, फ्रंट कॅमेऱ्यामध्ये TrueDepth १२ एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा उपलब्ध असेल; जो व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या वेळी सुखद अनुभव देईल.

आयपॅड प्रो-कनेक्टिव्हिटीसाठी या उत्पादनात, USB-C कनेक्टर असून, तो थंडरबोल्ट ३ व USB ४ ला सपोर्ट करतो; ज्याचा वेग हा ४० Gb/s इतका आहे. थंडरबोल्ट पोर्टचा वापर करून, वापरकर्ते ६K रिझोल्युशनपर्यंतचे एक्स्टर्नल प्रो डिस्प्ले XDR जोडू शकतात. या नवीन आयपॅड प्रोचे सेल्युलर व्हर्जन ई-सिम [eSIM]नाही सपोर्ट देते.

हेही वाचा : Apple Event Highlights: नवीन आयपॅड, मॅजिक कीबोर्डची भारतात काय असणार किंमत? ॲपलने लाँच इव्हेंटमध्ये सांगितले फीचर्स

अॅपलचा हा नवीन आयपॅड प्रो चंदेरी [सिल्व्हर] व स्पेस ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे उत्पादन २टीबी कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. ११ इंचांचा आयपॅड प्रो हा ९९ हजार ९९० रुपयांपासून उपलब्ध होणार असून, १३ इंच आयपॉड प्रोची किंमत ही एक लाख २९ हजार ९९० रुपये आहे. सध्या आयपॅड प्रो हे उत्पादन ‘प्री बुकिंग’साठी उपलब्ध आहे. मात्र, १५ मेपासून हे दुकानांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या लेखावरून मिळते.