फ्लिपकार्ट एक ई-कॉमर्स वेबसाइट आहे. फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सेल आणि ऑफर्स लॉन्च करत असते. लवकरच म्हणजे ८ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट आपला बिग बिलियन डेज सेल २०२३ घेऊन येत आहे.  फ्लिपकार्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म हा वॉलमार्टच्या मालकीचे आहे. कंपनीने हे स्पष्ट केले आहे की ८ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या बिग बिलियन डेज सेल दरम्यान आयफोन १२ चे बेस व्हेरिएंट ३२,९९९ रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे.

बिग बिलियन डेज सेल दरम्यान , आयफोन १२ चे बेस व्हेरिएंट ६४ जीबी इंटर्नल स्टोरेजसह ३८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध केला जाईल. यामध्यें हजार रुपयांची बँक ऑफर आणि ३ हजारांचे अतिरिक्त एक्सचेंज मूल्य एकत्रित केल्यास आयफोन १२ च्या बेस व्हेरिएंटची किंमत कमी होऊन ३२,९९९ रुपये इतकी होईल. याबाबतचे वृत्त The Indian Express ने दिले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : Flipkart Big Billion Days 2023: मोटोरोलाच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळणार डिस्काउंट, ऑफर्स एकदा बघाच

आयफोन 12 च्या बेस व्हेरिएंटमध्ये ४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. जे सध्याच्या काळामध्ये वापरकर्त्यांसाठी कमी असू शकते. यामध्ये सगळ्या गोष्टी आहे ज्या एका आधुनिक फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये असतात. आयफोन १२ च्या बेस व्हेरिएंटमध्ये ५ जी कनेक्टिव्हीटी, IP68 रेटिंग, वायरलेस चार्जिंग , ४ के 60fps व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यासाठी ड्युअल कॅमेरा सेटअप असे फीचर्स मिळतात. हा फोन नवीन iOS 17 वर देखील चालतो.

डिस्काउंटसह उपलब्ध असलेल्या किंमतीत आयफोन १२ Apple चा सर्वात परवडणारा स्मार्टफोन म्हणून ओळखला जातो. आयफोन १५ लॉन्च केल्यानंतर कंपनी अधिकृतपणे आयफोन १२ सूट देत आहे. याचप्रमाणे शक्तिशाली A15 बायोनिक चिप असणाऱ्या आयफोन SE 3rd Gen च्या किंमतीत देखील फ्लिपकार्टवर कपात झाली आहे. त्यामुळे आता हा आयफोन ३२,६९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा : Flipkart Big Billion Days Sale 2023 : गुगलचा ‘हा’ ५२ हजारांचा स्मार्टफोन ८ हजारात खरेदी करण्याची संधी, काय आहे ऑफर?

आयफोन १२ शिवाय आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लस सारख्या अन्य मॉडेल्सवर देखील बिग बिलियन डेज सेल दरम्यान किंमतीमध्ये कपात झालेली बघायला मिळू शकते. फ्लिपकार्टने आयफोन १४ साठी १,४९९ रुपयांमध्ये वापरकर्त्यांना स्लॉट बुक करण्याचा पर्याय देखील सादर केला आहे. १,९९९ रुपयांमध्ये स्लॉट बुक करणे ही एक नॉन रिफंडेबल प्रक्रिया आहे. स्लॉट बुक केल्यानंतर तुम्हाला खरेदी करावी लागेल. खरेदी न केल्यास तुम्ही बुक केलेल्या स्लॉटचे १,९९९ रुपये तुम्हाला गमवावे लागतील.

Story img Loader