अॅपलने नुकतीच iPhone 14 Series लाँच केली असून कंपनीचा सर्वात परवडणारा ५जी iPhone SE २०२२ च्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत तब्बल ६ हजार रुपयांची वाढ केली आहे. भारतात आता या फोनची किंमत किती आहे, जाणून घेऊया…
मार्च २०२२ मध्ये लाँच झालेल्या या फोनची किंमत ४३,९०० रुपये होती. आता या किंमतीत ६ हजार रुपयाची वाढ करण्यात आल्यानंतर या फोनची किंमत ४९ हजार ९०० रुपये झाली आहे. iPhone SE २०२२ च्या इतर सर्व स्टोरेज प्रकारांच्या किमतीही वाढल्या आहेत. iPhone SE 3 १२८ जीबीची किंमत ४८,९०० रुपयांवरून ५४,९०० रुपये आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ५८,९०० रुपयांवरून ६४,९०० रुपयांवर गेली आहे.
आणखी वाचा : Iphone : आयफोनवरून ‘या’ देशाने अॅपलला ठोठावला २ कोटी डॉलर्सचा दंड; काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या
या वाढलेल्या किंमती Apple च्या वेबसाइटवर दिसत असून Apple ने iPhone SE 3 ची किंमत का वाढवली, हे अद्याप स्पष्ट नसले तरी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालेल्या रुपयामुळे असे होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच iPhone SE २०२२ खरेदी करण्यास उत्सुक असलेले वापरकर्ते Flipkart देखील किमती तपासू शकतात.
iPhone SE 2022 चे स्पेसिफिकेशन्स
iPhone SE 2022 मध्ये ४.७ इंचाचा रेटिना एलसीडी डिस्प्ले आहे. हे डिव्हाइस थिक बेझेल्ससोबत येते. बॉटममध्ये होम बटण देण्यात आले आहे. होम बटणमध्ये फिंगरप्रिंट सेंसर इंटीग्रेटेड आहे. सिक्युरिटीसाठी यूजर्सला फेसआयची देखील सुविधा मिळेल– तसेच iOS १५ तंत्रज्ञानावर काम करतो. फोटोग्राफीसाठी या डिव्हाइसमध्ये यूजर्सला सिंगल १२MP FaceTime कॅमेरा मिळेल. तर व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी देखील १२MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.